Jump to content

रंजना देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रंजना देशमुख
जन्म रंजना देशमुख
इ.स. १९५५
मृत्यू ३ मार्च, इ.स. २०००
शिवाजी पार्क, मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
आई वत्सला देशमुख

रंजना देशमुख (-, १९५५ - मार्च ३, २०००; मुंबई) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री होती. भारताचे भूतपूर्व अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांची ती नात होय. इ.स. १९७०-१९८० च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ही रंजनाची मावशी होय. आपल्या मावशीप्रमाणेच रंजना हिने व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनाला राज्यसरकारचा १९८० सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. सन १९८३ साली हाच पुरस्कार तिला गुपचुप गुपचुप या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.

इ.स. १९८७ साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. इ.स. २००० साली, मुंबई येथे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला.[१]

प्रमुख चित्रपट[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मराठी अ‍ॅक्ट्रेस डेड (मराठी अभिनेत्रीचे निधन)" (इंग्लिश भाषेत). १७ जुलै २०११ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]