Jump to content

चर्चा:केतकी मोडक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आक्षेप : मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल. कारण: स्वतःच स्वतःचे पान केले आहे. जाहिरातबाजी

खुलासा : विनम्रपणे मी माझी भूमिका मांडू इच्छिते. कृपया गैरसमज नसावा. नमस्कार, मी विकिपीडियाची पूर्वीपासून सदस्य आहे. फार सक्रिय नाही पण त्याविषयी आस्था नक्की आहे. काल काही कामानिमित्त मी विकिपीडियाला भेट दिली असता अचानकपणे माझ्या पाहण्यात माझ्या नावाचा लेख (त्याच्या निर्मितीनंतर वर्षभराने) मला आढळला. हे पान मी तयार केलेले नव्हते. पण माझ्या वाचनात ते पान आल्यावर मी त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या. व अधिकचा तपशील लिहिला इतकेच.

जाहिरातबाजी म्हणत असाल तर, त्याबाबत असे म्हणावेसे वाटते, माझा तसा कोणताही हेतू नाही. उलट माझी online पुस्तके link स्वरुपात open source मध्ये खुली केलेली आहेत. विकीपिडिया मध्ये लिखाण करताना ते स-संदर्भ असावे, या दृष्टीनेहि त्याचे विकिपीडियामध्ये महत्त्व आहे असे मला वाटले.

फार फार तर अभीप्सा या ब्लॉगच्या link बाबत आपले म्हणणे रास्त आहे कारण त्यात वर्गणी इ.तपशील दिला आहे. आपल्यास योग्य वाटल्यास ती link delete करावयास हरकत नाही. पण इतर दोन links बाबत मात्र वाचकांची सोय यापलीकडे कोणताही हेतू माझ्या मनात नाही हे मी नम्रपणे नमूद करू इच्छिते. कारण मुक्ताबाई वरील पुस्तक आता out ऑफ प्रिंट आहे व त्याला अजूनही मागणी आहे. तर दुसरे अजून पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले नाही. त्या आधीच मी ते खुले केले आहे असे मला वाटते.

धन्यवाद. केतकी मोडक

@Ketaki Modak: आपण या लेखात सुधारणा करून लेख समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद. तथापि, लेखात इतर प्राथमिक माहिती गरजेची आहे. जसे, चित्र, जन्मदिनांक, संपूर्ण नाव इ. कृपया आपण ह्या माहितीची लेखात भर घालून लेख अधिक समृद्ध बनवावा, धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ००:३६, २१ जून २०१८ (IST)[reply]


@Ketaki Modak:

@Ketaki Modak: मला आपलं लिखाण(पुस्तके आणि इतरत्र) बरेच आहे हे माहित आहे. विकीवर प्रश्न येतो तो निम्नोक्त बाबींचा,

  • उल्लेखनियता - ज्याच्या नावाने लेख लिहीला जातोय, त्याची उल्लेखयनीता काय आहे? आणि ती विश्वकोशात लेख असण्या इतपत आहे का?
  • पडताळून पाहता येण्यासारखे वैध संदर्भ - लेखाची उल्लेखनीयता सिध्द करण्यासाठी भक्कम विविध ठिकाणचे संदर्भ उपलब्ध आहेत का?
  • इतरांनी लिहिणे - तुमचे कार्य उल्लेखनीय आहे असे इतरांना वाटणे आणि त्यांनी असा लेख लिहीणे किंवा त्यात भर घालणे योग्य आहे पण तुम्ही स्वत:च आपल्या पुस्तकांविषयी किंवा प्राथमिक संशोधनाविषयी लिहीणे जाहिरातबाजी म्हणून विचारात घेतात.
  • शिवाय आपली पुस्तके जर मुक्तपणे उपलब्ध असतीलच तर विकी स्त्रोत, किंवा विकी पुस्तके ह्या प्रकल्पावर ती घेता येऊ शकतात. तशी विनंती तुम्ही प्रचालकांना करा आणि ती पुस्तके कॉमन्सवर द्या.
  • सध्या आपण लिहीलेला भाग काढून टाकला जाईल किंवा नाही त्याचा निर्णय प्रचालक घेतील.
  • माझीही काही पुस्तके प्रकाशित झालीत आणि अनेक प्रकाशनाच्या मार्गावर आहेत, पण त्याचा उल्लेख मी स्वत:हून विकीवर, कुठल्याही लेखात मी करु शकत नाही. तो इतरांनी जर त्यांना वाटलं, त्याला योग्य संदर्भ देता आले तर तो ते करतील.
  • पान काढा साचा मी काढला आहे, आणि लेखाचा इतिहास पहाता ह्या लेखाचे संदर्भ मी स्वत:च सुधारलेले आहेत हे दिसते. असो, WikiSuresh (चर्चा) १४:३४, २१ जून २०१८ (IST)[reply]