कमल देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११) या मराठीतील एक प्रयोगशील लेखिका आणि मराठीच्या अध्यापिका होत्या.

त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी येथे झाला. मिरजेत त्यांचे वडिलोपार्जित घर होते. त्यांचे बालपण व सुरुवातीचे शिक्षणही तिथेच झाले. पुढे एम.ए.च्या शिक्षणासाठी त्या मुंबईत आल्या. एम.ए.ला असतानाच त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली, आणि त्यांच्या कथा सत्यकथेत छापून यायला लागल्या. शिक्षण पूर्ण केल्यावर अहमदाबाद, धुळे, निपाणी, भिवंडी, कागल अशा अनेक ठिकाणी त्यांनी मराठीचे अध्यापन केले, पण त्या कुठेच स्थिर झाल्या नाहीत. जया दडकर, समीक्षक रा. भा. पाटणकर, विश्वास पाटील, दुर्गा भागवत, अशोक शहाणे अशांशी त्यांची मैत्री जमली होती, आणि या सगळ्यांशी त्यांच्या साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवाद, मिथक या विषयांसंदर्भात गप्पा होत असत.

देव, धर्म, आणि एकूण विश्व या विषयावर प्रामुख्याने त्यांनी लेखन केले आहे. लैंगिकता या विषयावर पुरुषी दृष्टिकोनाचे वर्चस्व हाही त्यांच्या लेखनाचा एक विषय असे.[१] १९७५ च्या कादंबरीतील हॅट गुलामानी बाई (वूमन वेअरिंग एट हॅट) या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे.

कमल देसाई यांच्या कथालेखनाची समीक्षा करणारा ’कमल देसाई यांचे कथाविश्व’ हा ग्रंथ रा.भा. पाटणकर यांनी लिहिला आहे.

कमल देसाई यांचे प्रकाशित साहित्य

त्यांचे इतर साहित्य[संपादन]

  • बर्नर्ड बोझांकिटच्या 'थ्री लेक्चर्स ऑन एस्थेटिक' या ग्रंथाचा मराठी अनुवाद
  • किरण नगरकर यांच्या 'द ककल्ड' (मराठी अनुवाद-प्रतिस्पर्धी) या कादंबरीला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना
  • प्रसिद्ध चित्रकार पॉल गोगॅच्या 'ओल्ड गोल्ड ऑन देअर बॉडी' या पुस्तकाच्या प्रभाकर कोलते यांनी केलेल्या अनुवादाला लिहिलेली प्रस्तावना

संदर्भ[संपादन]