Jump to content

"मकरसंक्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:संक्रांत वाण.jpg|इवलेसे|संक्रांत वाण]]
[[चित्र:संक्रांत वाण.jpg|इवलेसे|संक्रांत वाण]]
[[चित्र:तीळवडी.jpg|इवलेसे|तिळाची वडी ]]
[[चित्र:तीळवडी.jpg|इवलेसे|तिळाची वडी ]]
[[चित्र:संक्रांत सुगड आणि वाण.jpg|इवलेसे|सुगड आणि वाणाचे साहित्य]]मकरसंक्रांत हा [[भारत|भारतातील]] [[पौष]] महिन्यात येणारा एक शेती संबंधित [[सण]] आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mc6C5dVHbGAC&pg=PA4517&dq=makar+sankranti&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi_n4vxg9bfAhWaeisKHVNOAzUQ6AEINDAD#v=onepage&q=makar%20sankranti&f=false|title=The Indian Encyclopaedia: Mahi-Mewat|last=Kapoor|first=Subodh|date=2002|publisher=Cosmo Publications|isbn=9788177552720|language=en}}</ref> भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. [[हरबरा|हरभरे]], [[ऊस]], [[बोर|बोरे]], गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी [[सुगडे|सुगडात]] भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका [[उखाणे]] घेतात. हा सण [[जानेवारी]] महिन्यात येतो.
[[चित्र:संक्रांत सुगड आणि वाण.jpg|इवलेसे|सुगड आणि वाणाचे साहित्य]]मकरसंक्रांत हा [[भारत|भारतातील]] [[पौष]] महिन्यात येणारा एक शेती संबंधित [[सण]] आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mc6C5dVHbGAC&pg=PA4517&dq=makar+sankranti&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi_n4vxg9bfAhWaeisKHVNOAzUQ6AEINDAD#v=onepage&q=makar%20sankranti&f=false|title=The Indian Encyclopaedia: Mahi-Mewat|last=Kapoor|first=Subodh|date=2002|publisher=Cosmo Publications|isbn=9788177552720|language=en}}</ref> भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. [[हरबरा|हरभरे]], [[ऊस]], [[बोर|बोरे]], गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी [[सुगडे|सुगडात]] भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका [[उखाणे]] घेतात. हा सण [[जानेवारी]] महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.

मकरसंक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात.


==भौगोलिक संदर्भ==
==भौगोलिक संदर्भ==

१९:२८, १९ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

संक्रांत वाण
तिळाची वडी
सुगड आणि वाणाचे साहित्य

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.[] भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.

मकरसंक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात.

भौगोलिक संदर्भ

दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.[] इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.

मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखा

इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०

इसवी सन १६०० : ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१)

इसवी सन १७०० : १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१)

इसवी सन १८०० : ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१)

इसवी सन १८५० : १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१)

सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-

१३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.

१५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.

१४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.

१६ जानेवारी २१५० (पौष कृष्ण तृतीया शके २०७१)

१७ जानेवारी २२०० (पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१)

१८ जानेवारी २२५० (पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१)

१९ जानेवारी २३०० (पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१)

२० जानेवारी २४०० (पौष कृष्ण नवमी शके २३२१)

२१ जानेवारी २५०० (पौष कृष्ण पंचमी शके २४२१)

२२ जानेवारी २५५० (पौष शुक्ल तृतीया शके २४७१)

२३ जानेवारी २६०० (पौष कृष्ण द्वितीया शके २५२१)

प्राचीन ग्रंथातील उत्तरायण महत्त्व

महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.[]

संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.[]

महाराष्ट्रातील संक्रांत

महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडूल वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.

मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.

आहारदृष्ट्या महत्त्व

संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात..[] तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.

तिळवण व बोरन्हाण

नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.[]

लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात.[] चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात.[] अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.

बोरन्हाण
बोरन्हाण[]

प्रादेशिक विविधता

संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते. []

  • उतर भारतात,
    • हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
    • पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
    • पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात व शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो. या दिवशी लोहरीदेवीची पूजा करतात.[१०] 
  • पूर्व भारतात,
  • पश्चिम भारतात,
गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात.[११]
    • गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.[१२]
  • दक्षिण भारतात,
    • कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)
    • तमिळनाडू - पोंगल, (Pongal)
    • दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात.[१३] मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
    • शबरीमला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
  • भारताबाहेरील देशात-
  • नेपाळमध्ये,
    • थारू (Tharu) लोक - माघी
    • अन्य भागातमाघ संक्रान्ति (Maghe Sankranti), माघ सक्राति (Maghe Sakrati)
  • थायलंड - सोंग्क्रान (สงกรานต์ Songkran)
  • लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
  • म्यानमार - थिंगयान (Thingyan)

यात्रा

कोलकाता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.[१४]

  • हिमालयातील देवप्रयाग, मुनी की रेती, कीर्तीनगर, व्यासघाट या ठिकाणी संक्रातीच्या निमित्ताने मेळे भारतात.[१५]
  • या दिवशी केरळमधील शबरीमला डोंगरावर मकरज्योतीचे दर्शन घेण्यास अनेक भाविकांची गर्दी होते.[१६]

हे ही पहा

उत्तरायण

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ Kapoor, Subodh (2002). The Indian Encyclopaedia: Mahi-Mewat (इंग्रजी भाषेत). Cosmo Publications. ISBN 9788177552720.
  2. ^ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture in World Religions [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 9781610694124.
  3. ^ Adgadanand, Swami (1994-07-22). जीवनादर्श एवं आत्मानुभूति: Jeevanadarsh Evam Atmanubhuti (हिंदी भाषेत). Shree Paramhans Swami Adgadanandji Ashram Trust.
  4. ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
  5. ^ Bhatt, S. C. (2005). Land and people of Indian states and union territories : (in 36 volumes) (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178353562.
  6. ^ a b सरफरे, शलाका (१३. ११. २०१८). https://www.loksatta.com/thane-news/online-jewellery-market-in-thane-1615443/. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Sant, Indira Narayan (1997). Ghuṅguravāḷā. Snehavardhana Prakāśana.
  8. ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
  9. ^ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture in World Religions [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 9781610694124.
  10. ^ Shakti Gupta, Festivals, fairs and fasts in India
  11. ^ LLC, Books (2011-07-07). Gujarati Culture: Culture of Gujarat, Makar Sankranti, Gujarati Cinema, Gujarati People, Navratri, Gujarati Cuisine, Dandiya Raas, Diwali in Gujarat, Bhavai, Garba, Gujarati Comedy Group, List of Garba Events in Vadodara, Music of Gujarat, Sanedo, Murabba (इंग्रजी भाषेत). General Books LLC. ISBN 9781156488751.
  12. ^ Josh, Jagran. Current Affairs January 2016 Hindi eBook: by Jagran Josh (हिंदी भाषेत). Jagran Josh.
  13. ^ Verma, Priyanka (2014-10-27). Pongal: Festival Of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9789351654346.
  14. ^ Gangasagar Mela: A Pilgrim's Guide (इंग्रजी भाषेत). Office of the District Magistrate, 24-Parganas, Government of West Bengal : distributor, Firma K.L.M. 1976.
  15. ^ translator., सिंह, भगत, 1907-1931. Works. Selections. सिंह, भगत, 1907-1931. Works. Selections. Hindi. जैन, हरीश, 1951- editor. माथुर, नितिन,. भगत सिंह : जेल नोटबुक : संदर्भ और प्रासंगिकता : संपूर्ण नोटबुक और बहुत सी नई सामग्री के साथ. ISBN 9789352661398. OCLC 1010538438.CS1 maint: extra punctuation (link)
  16. ^ Guides, Rough (2016-10-03). The Rough Guide to India (इंग्रजी भाषेत). Rough Guides UK. ISBN 9780241295397.

बाह्य दुवे