भोगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भोगी

भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात.[१]

आहार[संपादन]

यावेळेस मटर, गाजर तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात.विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.

स्वरूप[संपादन]

भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते. या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते.[२][३]

पोंगल

हे ही पहा[संपादन]

मकरसंक्रांत

संदर्भ[संपादन]

  1. ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera (mr मजकूर). 
  2. ^ जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड सहा. भारतीय संस्कृतिकोश मंडळ प्रकाशन. 
  3. ^ नवभारत टाईम्स (१०. १. २०१९). "जानें क्या है भोगी पोंगल, किस देवता को समर्पित है यह पर्व".