"मकरसंक्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) दुवे |
|||
ओळ १२: | ओळ १२: | ||
==मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखा== |
==मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखा== |
||
[[ग्रेगरीय दिनदर्शिका|इंग्लिश]] महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ [[जानेवारी]] रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही तारीख एकएक दिवस पुढे जाते. |
[[ग्रेगरीय दिनदर्शिका|इंग्लिश]] महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ [[जानेवारी]] रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा० |
||
इसवी सन १६०० : ९ जानेवारी |
इसवी सन १६०० : ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१) |
||
इसवी सन १७०० : १० जानेवारी |
इसवी सन १७०० : १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१) |
||
इसवी सन १८०० : ११ जानेवारी |
इसवी सन १८०० : ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१) |
||
इसवी सन १८५० : १२ जानेवारी |
इसवी सन १८५० : १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१) |
||
सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :- |
सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :- |
१६:५६, २२ मे २०१९ ची आवृत्ती
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे.सौर कालगणनेशी संबंधित हा महत्वाचा भारतीय सण आहे.[१] भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.बायका उखाणे घेतात.हा सण जानेवारी महिन्यात येतो.
भौगोलिक संदर्भ
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.[२] इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
उत्तरायण' शब्द, दोन संस्कृत शब्द उत्तर (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा संधी आहे.
मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखा
इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०
इसवी सन १६०० : ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१)
इसवी सन १७०० : १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१)
इसवी सन १८०० : ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१)
इसवी सन १८५० : १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१)
सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-
१३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.
१५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.
१४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.
प्राचीन ग्रंथातील उत्तरायण महत्व
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. त्यांनी या दिवशी उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केला.. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.[३]
संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.[४]
महाराष्ट्रातील संक्रांत
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात.
पंढरपूरमधील संक्रांत
या दिवशी भोगी करणे, वाण- वसा, वोवसायला जाणे या सारख्या रिती, परंंपरा आजही जोपासल्या जातात. महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये महिला वाण-वसा देतात. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा सकाळपासून महिला भाविकांची एकच गर्दी दिसून येते. रुक्मिणी माता मंंदिरात महिला एकमेकीना वाण - वसा मोठ्या श्रद्धेने देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.
आहारदृष्ट्या महत्त्व
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात..[५] तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.
तिळवण व बोरन्हाण
नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.[६]
लहान बालकांंनाही संंक्रांंती निमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे, हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात.[६] चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर घातले जाते. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
प्रादेशिक विविधता
संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते. [८]
- उतर भारतात,
- हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
- पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
- पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात व शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो. या दिवशी लोहारीच्या देवीची पूजा करतात.[९]
- पूर्व भारतात,
- बिहार - संक्रान्ति
- आसाम - भोगाली बिहु, (Bhogali Bihu)
- पश्चिम बंगाल - मकर संक्रान्ति
- ओरिसा - मकर संक्रान्ति
- पश्चिम भारतात,
- गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात.
- गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.
- दक्षिण भारतात,
- कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)
- तमिळनाडू - पोंगल, (Pongal)
- दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात. मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
- शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
- भारताबाहेरील देशात-
- नेपाळमध्ये,
- थारू (Tharu) लोक - माघी
- अन्य भागातमाघ संक्रान्ति (Maghe Sankranti), माघ सक्राति (Maghe Sakrati)
- थायलंड - सोंग्क्रान (สงกรานต์ Songkran)
- लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
- म्यानमार - थिंगयान (Thingyan)
यात्रा
कोलकाता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.[१०]
- हिमालयातील देवप्रयाग, मुनी की रेती, कीर्तीनगर, व्यासघाट या ठिकाणी संक्रातीच्या निमित्ताने मेळे भारतात.[११]
- या दिवशी केरळमधील शबरीमाला डोंगरावर मकरज्योतीचे दर्शन घेण्यास अनेक भाविकांची गर्दी होते.[१२]
चित्रदालन
-
पतंग
-
बिहू
-
पूर्व भारतातील संक्रांत
-
पोंगलचा मेळा
संदर्भ
- ^ Kapoor, Subodh (2002). The Indian Encyclopaedia: Mahi-Mewat (इंग्रजी भाषेत). Cosmo Publications. ISBN 9788177552720.
- ^ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture in World Religions [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 9781610694124.
- ^ Adgadanand, Swami (1994-07-22). जीवनादर्श एवं आत्मानुभूति: Jeevanadarsh Evam Atmanubhuti (हिंदी भाषेत). Shree Paramhans Swami Adgadanandji Ashram Trust.
- ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
- ^ Bhatt, S. C. (2005). Land and people of Indian states and union territories : (in 36 volumes) (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178353562.
- ^ a b सरफरे, शलाका (१३. ११. २०१८). https://www.loksatta.com/thane-news/online-jewellery-market-in-thane-1615443/.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
- ^ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture in World Religions [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 9781610694124.
- ^ Shakti Gupta, Festivals, fairs and fasts in India
- ^ Gangasagar Mela: A Pilgrim's Guide (इंग्रजी भाषेत). Office of the District Magistrate, 24-Parganas, Government of West Bengal : distributor, Firma K.L.M. 1976.
- ^ translator., सिंह, भगत, 1907-1931. Works. Selections. सिंह, भगत, 1907-1931. Works. Selections. Hindi. जैन, हरीश, 1951- editor. माथुर, नितिन,. भगत सिंह : जेल नोटबुक : संदर्भ और प्रासंगिकता : संपूर्ण नोटबुक और बहुत सी नई सामग्री के साथ. ISBN 9789352661398. OCLC 1010538438.CS1 maint: extra punctuation (link)
- ^ Guides, Rough (2016-10-03). The Rough Guide to India (इंग्रजी भाषेत). Rough Guides UK. ISBN 9780241295397.
बाह्य दुवे
- http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-articles/aali-makar-sankranti/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - मकर संक्रान्ति का? इंग्रजीत
- मकर संक्रान्ति व हिंदू समाज इंग्रजीत
- जगातील वेगवेगळ्या भागातील मकरसंक्रांतीच्या तारखा
- गुजरातमधील संक्रातीची चित्रे