Jump to content

"यशवंतराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ६३: ओळ ६३:
ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.[ओंकार घोरपडे]
ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.[ओंकार घोरपडे]


==यशवंतराव चव्हाणांचे चरित्र सांगणारी पुस्तके ==
==यशवंतराव चव्हाणांचे चरित्र किंवा व्यक्तिचित्रण वर्णन करणारी पुस्तके ==
* आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के.जी. कदम)
* आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के.जी. कदम)
* यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
* यशस्वी यशवंतराव (रा.द.गुरव)
* यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
* यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
* यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (परमार रंजन)
* आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
* आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
* कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
* यशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
* घडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)
* Chavan,The Man of Crisis (B.B.Kala)
* Chavan and the Trouble Decade (T.V. Kunnikrishnan)
* Chavan and the Trouble Decade (T.V. Kunnikrishnan)
* Chavan,The Man of Crisis (B.B.Kale)
* Yashawantrao Chavan (Chandulal Shah)
* नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
* भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
* Man of Crisis (Baburao Kale)
* Man of Crisis (Baburao Kale)
* YB Chavan: A PoliTical Biography (D.B. Karnik)
* यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
* सोनेरी पाने (भा.वि.गोगटे)
* यशवंतराव : इतिहासाचे एक पान (रामभाऊ जोशी)
* घडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)
* ही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)
* यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)
* मुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के. पवार)
* मुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के. पवार)
* यशवंतराव : इतिहासाचे एक पान ([[रामभाऊ जोशी]])
* नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
* यशवंतराव : एक इतिहास ([[रामभाऊ जोशी]])
* कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
* यशवंतराव चव्हाण (प्रा. डॉ. कायंदे पाटील)
* वादळ माथा (राम प्रधान)
* Yashawantrao Chavan (Chandulal Shah)
* यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)
* यशवंतराव चव्हाण - चरित्र (अनंतराव पाटील)
* यशवंतराव चव्हाण - चरित्र (अनंतराव पाटील)
* भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
* यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
* यशवंतराव चव्हाण (प्रा.डॉ.कायंदे पाटील)
* यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
* यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
* यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
* यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (हिंदी, परमार रंजन)
* यशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
* यशवंत स्मृतिसुगंध ([[रामभाऊ जोशी]])
* यशस्वी यशवंतराव (रा.द. गुरव)
* वादळ माथा (राम प्रधान)
* YB Chavan: A PoliTical Biography (D.B. Karnik)
* सह्याद्रीचा सुपुत्र (डॉ. [[न.म. जोशी]]) (मराठी, इंग्रजी, हिंदी, सिंधी, गुजराती भाषेत.)
* सह्याद्रीचा सुपुत्र (डॉ. [[न.म. जोशी]]) (मराठी, इंग्रजी, हिंदी, सिंधी, गुजराती भाषेत.)
* सोनेरी पाने (भा.वि. गोगटे)
* ही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)


==यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा==
==यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा==

१९:१२, ४ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

यशवंतराव चव्हाण

कार्यकाळ
मे १, इ.स. १९६० – नोव्हेंबर १९, इ.स. १९६२
राज्यपाल श्रीप्रकाश
(१९५६–१९६२)
पी. सुब्बरायण
(१९६२)
पुढील मारोतराव कन्नमवार

जन्म मार्च १२, इ.स. १९१३
देवराष्ट्रे जि. सातारा महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर २५, इ.स. १९८४
दिल्ली
प्रिती संगम कराड
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय काँग्रेस
अपत्ये नाही
निवास कराड
गुरुकुल टिळक हायस्कूूल,कराड.
व्यवसाय राजनीतिज्ञ
धर्म हिंदू

यशवंतराव बळवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.

जीवन

इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.

यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात

योजना

- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)

- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)

- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)

- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)

- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)

- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)

- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

    ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.[ओंकार घोरपडे]

यशवंतराव चव्हाणांचे चरित्र किंवा व्यक्तिचित्रण वर्णन करणारी पुस्तके

  • आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के.जी. कदम)
  • आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
  • कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
  • घडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)
  • Chavan and the Trouble Decade (T.V. Kunnikrishnan)
  • Chavan,The Man of Crisis (B.B.Kale)
  • नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
  • भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
  • Man of Crisis (Baburao Kale)
  • मुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के. पवार)
  • यशवंतराव : इतिहासाचे एक पान (रामभाऊ जोशी)
  • यशवंतराव : एक इतिहास (रामभाऊ जोशी)
  • यशवंतराव चव्हाण (प्रा. डॉ. कायंदे पाटील)
  • Yashawantrao Chavan (Chandulal Shah)
  • यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)
  • यशवंतराव चव्हाण - चरित्र (अनंतराव पाटील)
  • यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
  • यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
  • यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
  • यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
  • यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (हिंदी, परमार रंजन)
  • यशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
  • यशवंत स्मृतिसुगंध (रामभाऊ जोशी)
  • यशस्वी यशवंतराव (रा.द. गुरव)
  • वादळ माथा (राम प्रधान)
  • YB Chavan: A PoliTical Biography (D.B. Karnik)
  • सह्याद्रीचा सुपुत्र (डॉ. न.म. जोशी) (मराठी, इंग्रजी, हिंदी, सिंधी, गुजराती भाषेत.)
  • सोनेरी पाने (भा.वि. गोगटे)
  • ही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)

यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा

  • आपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)
  • ॠणानुबंध (ललित लेख) (१९७५)
  • कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४) हे पुस्तक बोलके पुस्तक या स्वरूपातही आहे.
  • भूमिका (१९७९)
  • महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)
  • विदेश दर्शन
  • सह्याद्रीचे वारे (१९६२) ‌- भाषण संग्रह
  • युगांतर (१९७०) स्‍वातंत्र्यपूर्व व स्‍वातंत्र्योत्‍तर हिंदुस्‍थानच्‍या प्रश्‍नांची चर्चा

यशवंतराव चव्हाणांचे भाषण संग्रह/पुस्तिका

  • असे होते कर्मवीर (भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख - १९६८)
  • India's foreign Policy - १९७८
  • उद्याचा महाराष्ट्र - (चव्हाण यांची भाषण पुस्तिका -१९६०)
  • काँग्रेसच्या मागेच उभे राहा - औरंगाबाद येथील भाषण - पुस्तिका
  • कोकण विकासाची दिशा (कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन - पुस्तिका -१९६०)
  • ग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये ’प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्र’ या विषयावरील व्याख्यान, (पुस्तिका - १९६१)
  • जीवनाचे विश्वरूप : काही श्रद्धा, काही छंद (पुस्तिका - १९७३)
  • पत्र - संवाद (संपादक: स.मा.गर्गे - २००२)
  • पक्षावर अभंग निष्ठा (राजकारणातील माझी भूमिका- पुस्तिका )
  • महाराष्ट्र- म्हैसूर सीमा प्रश्न (पुस्तिका - १९६०)
  • महाराष्ट्राची धोरण सूची - (पुस्तिका - १९६०)
  • यशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे - सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ - १९७१
  • The Making of India's Foreign Policy - १९८०
  • युगांतर (निवडक भाषणांचा संग्रह - १९७०)
  • लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका- १९५७)
  • वचनपूर्तीचे राजकारण - अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका - १९६९))
  • विचारधारा - (भाषण संग्रह - १९६०)
  • Winds of Change - १९७३
  • विदर्भाचा विकास (महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे) - (भाषण पुस्तिका - १९६०)
  • विदेश-दर्शन (परदेशांतून पत्नीला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह, संपादक - रामभाऊ जोशी, २०१७)
  • शब्दाचे सामर्थ्य ( भाषणे - २०००; संपादक: राम प्रधान)
  • शिवनेरीच्या नौबती (भाषण संग्रह) - तळवळकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक - पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१
  • सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह - १९६२)
  • हवाएँ सह्याद्रि की (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)

चित्रपट

  • यशवंतराव चव्हाण - बखर एका वादळाची. (मार्च २०१४) (दिग्दर्शक जब्बार पटेल)

यशवंतराव चव्हाण नावाच्या संस्था

  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे)
  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन, मुंबई
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्‍नाथ भोसले रोड, मुंबई
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
  • यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे
  • यशवंतराव चव्हाणांचे पुतळे - कऱ्हाड, पिंपरी(पुणे), फलटण, सातारा, लातूर (महापालिका प्रवेशद्वार), संसद भवनाच्या लॉबीत(नवी दिल्ली)
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
मे १, इ.स. १९६० - नोव्हेंबर १९, इ.स. १९६२
पुढील
मारोतराव कन्नमवार