"खासगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८६: ओळ ८६:
== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

== बाह्य दुवे ==
* [[https://m.youtube.com/watch?v=eoiPuwyuyRk स्वच्छ भारत मिशन - खासगांव गाव]]


[[वर्ग: महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]
[[वर्ग: महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]

१५:२६, १९ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

  ?खासगांव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

२०° १५′ २०.८८″ N, ७६° ०३′ २९.५२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर जाफ्राबाद
विभाग औरंगाबाद
जिल्हा जालना
तालुका/के जाफ्राबाद
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
३,५७३ (२०११)
९०३ /
भाषा मराठी, हिंदी

खासगांव हे जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील एक विकसनशील गाव आहे. जाफ्राबाद पासून या गावाचे अंतर ९ कि.मी. आहे.

लोकसंख्या

खासगाव येथे इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार ७३८ कुटुंब असून लोकसंख्या ३,५७३ आहे. पैकी पुरूष लोकसंख्या १८७८ तर स्त्रीयांची संख्या १६९५ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ४९४ (पुरूष २८१ तर स्त्री २१३) असून ते एकूण लोकसंख्येच्या १३.८३ % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या २१२ असून त्यात १०६ पुरूष व १०६ स्त्रीयां आहेत तर अनुसूचित जमातीचे १० लोक असून त्यात ६ पुरूष व ४ स्त्रीया आहेत. [२]

साक्षरता

  • एकूण साक्षर लोकसंख्या: ७४.३७ %
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ८६.१६ %
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ६१.६७ %

शैक्षणिक सुविधा

गावांमध्ये अनेक शाळा आहेत. गावात एक जिल्हा परिषद प्रशाला ही शासकीय माध्यमिक शाळा, एक शासकीय केंद्रिय प्राथमिक शाळा, एक अभिजीत कला व वाणिज्य हे कनिष्ठ माध्यमिक विद्यालय, जिजाऊ इंग्लिश स्कूल व इतर काही शाळा आहेत.

वैद्यकीय सुविधा

शासकीय

  • खासगांव येथे एक मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुद्धा आहे.

अशासकीय

गावात 2 पेक्षा अधिक वैद्यकीय सुविधा असलेले दवाखाने आहे.

पिण्याचे पाणी

या गावात शुद्ध पाणी उपलब्ध आहे, ५ रू मध्ये १५ लिटर तसेच १ रू मध्ये १ लिटर अशी अशी व्यवस्था गावांत केलेली आहे. गावात पिण्याचे पाण्याचे विविध स्त्रोत आहे. गावात एका दुर्गा देवीच्या मंदिराजवळ पाण्याची हापसा आहे. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा, झऱ्याच्या पाण्याचा आणि नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे.

स्वच्छता

खासगांव हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे. गावात कुठेही उघडी गटारव्यवस्था उपलब्ध नाहीत. रोज सकाळी ग्रामपंचायतीची कचरा गाडी उपलब्ध आहे.

हगनदारी मुक्त

गावात जवळजवळ ९९% जणांनी शौचालये बांधलेली असून हे गाव हगनदारी मुक्त आहे.

संपर्क व दळणवळण

खासगांव येथे पोस्ट ऑफिसची सुविधा उपलब्ध असून त्याचा पिन कोड ४३१ २०६ आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात शासकीय बस सेवा तसेच ऑटोरिक्षा, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहे.


बाजार व पतव्यवस्था

गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध असून तो गुरूवार या दिवशी असतो. गावच्या बाजारात गाय, बैल, म्हैस, शेती इत्यादी पशूंचीही खरेदी विक्री केली जाते.

लोकजीवन

गावांत अनेक जाती - धर्माचे लोक राहतात त्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्यानंतर गोंधळी, मुस्लिम, धनगर, माळी यांची संख्या सर्वाधिक आहे. हिंदू व इस्लाम या धर्मांव्यतिरिक्त बौद्ध धर्माचे लोक ही गावात अल्प प्रमाणात आहेत.

धार्मिक स्थळे

गावात अनेक देवस्थाने आहेत, हनुमान मंदिर, विठ्ठल रूक्माई मंदिर - शिवमंदिर, दुर्वादेवी मंदिर ही हिंदूंची प्रमुख धर्मस्थळे आहेत. गावांत दोन मस्जिदी व बौद्ध विहार सुद्धा आहे.

आरोग्य

गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात पाच अंगणवाड्या (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहेत. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे.

गावात कपड्डीचे क्रिंडागण उपलब्ध आहे. गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.

साने गुरूजी सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.

वीज

प्रतिदिवस २४ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे.

उत्पादन

खडकदेवळा ह्या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या क्रमाने): कापूस, गहू, बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, तूर, मूग

संदर्भ

बाह्य दुवे