"ताडोबा राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या |
No edit summary |

ओळ १: | ओळ १: | ||
'''ताडोबा राष्ट्रीय उद्यान''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील प्रमुख [[राष्ट्रीय उद्यान]] असून ते [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्हयात]] आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात |
'''ताडोबा राष्ट्रीय उद्यान''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील प्रमुख [[राष्ट्रीय उद्यान]] असून ते [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्हयात]] आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणार्या [[मगर|मगरी]]-[[सुसर|सुसरी]] आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. |

अलीकडेच याचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण |
अलीकडेच याचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होऊन त्याचे नाव [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प]] झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे. |

आजमितीस(सप्टेंबर २०११) अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेतच, त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे [[वाघ|वाघांचे]] आकर्षणही वाढले आहे. सध्या उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर [[बिबट्या]] , [[अस्वल]] , जंगली कुत्री अथवा [[कोळसून]] , [[तरस]] , [[उदमांजर]] आणि विविध प्रकारच्या [[रानमांजर | रानमांजरी]]. हरणांच्या जातीत, [[नीलगाय]] , [[सांबर]] , [[चितळ]] , [[भेकर]], कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी [[पिसुरी]] नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते

इथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाहता येतात. मच्छिमार, [[गरुड]], [[करकोचा|करकोचे]], [[बगळा|बगळे]], ससाणे, रानकोंबड्या, [[धनेश]], भृंगराज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, [[मोर]] हे त्यापैकी काही.

ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. [[साग]], [[बांबू]], ऐन, हलई, धावडा, बिबळा, [[तेंदू]], [[मोहा]], [[खैर]] अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते.<ref>आपली सृष्टी आपले धन भाग- ४ निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे
[[माझी मुलुखगिरी]], [[मिलिंद गुणाजी]]</ref>. |

==पाणी== |

ताडोबा, मोहर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात एकूण छोटे मोठे अनेक तलाव आहेत. त्यांपैकी ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलीया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्त्वाचे तलाव आहेत. |

अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ ताडोबा असे म्हटले जाते. खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे. . अंधारी नदीच्या प्रवाहातील वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम हे पाणवठे आहेत. |

या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक छोटे मोठे नालेसुद्धा आहेत. यात उपाशा नाला, जामून झोरा, तेलीया डॅमचा प्रामुख्याने समावेश आहे. कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा आंबा, चिखलवाही, सांबर डोह, कासरबोडी, जांबून झोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा हेही वॉटर होल ताडोबा जंगलात आहेत. |

== हेही पहा == |
== हेही पहा == |

* [[भारतातील राष्ट्रीय उद्याने]] |
* [[भारतातील राष्ट्रीय उद्याने]] |
२३:२६, ९ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणार्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे.
अलीकडेच याचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होऊन त्याचे नाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे.
आजमितीस(सप्टेंबर २०११) अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेतच, त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांचे आकर्षणही वाढले आहे. सध्या उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर बिबट्या , अस्वल , जंगली कुत्री अथवा कोळसून , तरस , उदमांजर आणि विविध प्रकारच्या रानमांजरी. हरणांच्या जातीत, नीलगाय , सांबर , चितळ , भेकर, कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी पिसुरी नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते
इथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाहता येतात. मच्छिमार, गरुड, करकोचे, बगळे, ससाणे, रानकोंबड्या, धनेश, भृंगराज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, मोर हे त्यापैकी काही.
ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. साग, बांबू, ऐन, हलई, धावडा, बिबळा, तेंदू, मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते.[१].
पाणी
ताडोबा, मोहर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात एकूण छोटे मोठे अनेक तलाव आहेत. त्यांपैकी ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलीया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्त्वाचे तलाव आहेत.
अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ ताडोबा असे म्हटले जाते. खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे. . अंधारी नदीच्या प्रवाहातील वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम हे पाणवठे आहेत.
या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक छोटे मोठे नालेसुद्धा आहेत. यात उपाशा नाला, जामून झोरा, तेलीया डॅमचा प्रामुख्याने समावेश आहे. कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा आंबा, चिखलवाही, सांबर डोह, कासरबोडी, जांबून झोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा हेही वॉटर होल ताडोबा जंगलात आहेत.
हेही पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ आपली सृष्टी आपले धन भाग- ४ निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे
माझी मुलुखगिरी, मिलिंद गुणाजी