चितळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सांबर
Axis axis Kanha 4kl.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: सारंगाद्य
उपकुळ: सारंग हरीण
जातकुळी: ॲक्सिस
जीव: ॲ. ॲक्सिस
शास्त्रीय नाव
ॲक्सिस ॲक्सिस
Chital range map.png
इतर नावे

ॲक्सिस ॲक्सिस ॲक्सिस
ॲक्सिस ॲक्सिस सिलोनेन्सीस

चितळ हे भारतात सर्वाधिक आढळणारे हरीण आहे. हे हरीण दिसावयास अतिशय सुंदर असून वीटकरी रंग व त्यावरील पांढरे टिपके यावरून हे हरीण सहज ओळखू येते. चितळ हे हरीण हरीणांच्या सारंग कुळातील असून त्यांच्या नरांनाच शिंगे असतात. तसेच शिंगे ही भरीव असून ती दरवर्षी उगवतात व गळून पडतात. चितळांच्या मादीला शिंगे नसतात.

वावर चितळांचा वावर मुख्यत्वे भारतातील सर्व कमी दाट ते अतिशय घनदाट जंगलात आहे. कमी ते मध्यम दाट जंगलात कुरणे असल्यास यांची संख्या चांगलीच वाढते.मध्य भारतातील जंगलात चितळांची संख्या लाक्षणीय आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यानात २० ते २५ हजार चितळे असल्याचा अंदाज आहे व संपूर्ण भारतभरात लाखाहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

चितळ हे वाघाचे प्रमुख भक्ष्य आहे. चितळ भरपूर असलेल्या जंगलात वाघांची संख्याही वाढते असे दिसते. तसेच बहुतांशी मोठ्या शिकारी प्राण्याचेही चितळ हे आवडते खाद्य आहे. रानकुत्री, बिबट्या हे चितळांचे इतर प्रमुख शत्रू आहेत.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Duckworth, J.W., कुमार, N.S., Anwarul Islam, Md., Hem Sagar Baral & Timmins, R.J. (2008). Axis axis. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 8 April 2009ला बघितले.