"झाडीबोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:
झाडीबोलीचे स्वत:चे [[मासिक]] आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या संपादकत्वाखाली 'लाडाची बाई' हे बाल मासिक झाडीबोलीत (देवनागरी लिपीत) भाषेत जानेवारी २०१०पासून प्रकाशित होत आहे. हे झाडी भाषेतील पहिले आणि एकमेव मासिक आहे(इ.स.२०१२).
झाडीबोलीचे स्वत:चे [[मासिक]] आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या संपादकत्वाखाली 'लाडाची बाई' हे बाल मासिक झाडीबोलीत (देवनागरी लिपीत) भाषेत जानेवारी २०१०पासून प्रकाशित होत आहे. हे झाडी भाषेतील पहिले आणि एकमेव मासिक आहे(इ.स.२०१२).
==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
झाडी बोलीत सर्व प्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जातो. 'पवनपर्व' या साकोली येथून दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या ’रविवासरी’ नावाच्या साप्ताहिकात 'वद्राचा देव खाल्या आला' ही त्यांची झाडीबोलीतील [[कथा]] १६ मार्च १९८० च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कथा होय. तसेच याच नियतकालिकात 'अडचा घुटाची भूक' ही त्यांची झाडीबोलीतील कविता २० मार्च १९८१ च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित [[कविता]] समजली जाते.
झाडीबोलीत सर्व प्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जातो. 'पवनपर्व' या साकोली येथून दर रविवारी प्रकाशित होणार्‍या ’रविवासरी’ नावाच्या साप्ताहिकात 'वद्राचा देव खाल्या आला' ही त्यांची झाडीबोलीतील [[कथा]] १६ मार्च १९८०च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कथा होय. तसेच याच नियतकालिकात 'अडचा घुटाची भूक' ही त्यांची झाडीबोलीतील कविता २० मार्च १९८१ च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित [[कविता]] समजली जाते.

*'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' ह्या विषयावर डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी पीएच.डी.चा प्रबंध लिहिला होता.
'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' ह्या विषयावर डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी पीएच.डी.चा प्रबंध लिहिला होता.

झाडीबोली साहित्य मंडळाने मराठी बोली साहित्य संघ ही संस्था १५ ऑगस्ट २००३ रोजी स्थापली.

==कविता संग्रह==
==कविता संग्रह==
* सपनधून (कवी ना.गो. थुटे-१ जानेवारी २०००) हा झाडीबोलीतील पहिला प्रकाशित [[कवितासंग्रह]].
* सपनधून (कवी ना.गो. थुटे - १ जानेवारी २०००) हा झाडीबोलीतील पहिला प्रकाशित [[कवितासंग्रह]].
* अंजनाबाईची कविता (कवयित्री अंजनाबाई खुणे-९ जाने २०००)
* अंजनाबाईची कविता (कवयित्री अंजनाबाई खुणे - ९ जाने २०००)
* आदवा (चारोळीसंग्रह-कवी राजन जयस्वाल -९ जानेवारी २०००)
* आदवा (चारोळीसंग्रह-कवी राजन जयस्वाल - ९ जानेवारी २०००)
* हिरवा पदर (कवितासंग्रह कवी हिरामन लांजे(रमानंद)-२००२)
* हिरवा पदर (कवितासंग्रह कवी हिरामन लांजे(रमानंद) - २००२)
* रूप झाडीचा (वा.चं. ठाकरे-२००२)
* रूप झाडीचा (वा.चं. ठाकरे - २००२)
* कानात सांग (डॉ. हरिश्चंद्र बोरकर-२००२)
* कानात सांग (डॉ. हरिश्चंद्र बोरकर - २००२)
* माज्या मुलकाची कता (विठ्ठल लांजेवार-२००२)
* माज्या मुलकाची कता (विठ्ठल लांजेवार -२ ००२)
* झाडीपट्टीचा बारसा (रामचंद्र डोंगरवार-२००३)
* झाडीपट्टीचा बारसा (रामचंद्र डोंगरवार - २००३)
* झाडी भुलामाय (प्र.ग. तल्लारवार(प्रगत)-२००६)
* झाडी भुलामाय (प्र.ग. तल्लारवार(प्रगत) - २००६)
* आदवा(कवितासंग्रह कवी राजन जयस्वाल-२००४)
* आदवा(कवितासंग्रह कवी राजन जयस्वाल - २००४)
* अंजनाबाईची गाणी(अंजनाबाई खुणे-२००५)
* अंजनाबाईची गाणी(अंजनाबाई खुणे - २००५)
* सोनुली (पांडुरंग भेलावे-२००६)
* सोनुली (पांडुरंग भेलावे - २००६)
* मातीत मिरली माती' (मुरलीधर खोटेले-२००७)
* मातीत मिरली माती' (मुरलीधर खोटेले - २००७)
* माजी मायबोली (बापुराव टोंगे-२००८)
* माजी मायबोली (बापुराव टोंगे - २००८)
* झाडीची माती (मिलिंद रंगारी-२००८)
* झाडीची माती (मिलिंद रंगारी - २००८)
* मोहतेल (प्रल्हाद मेश्राम)
* मोहतेल (प्रल्हाद मेश्राम)
* रंगल्या तांदराचा सडा (मनराज पटेल)
* रंगल्या तांदराचा सडा (मनराज पटेल)
ओळ ५७: ओळ ६१:
==कथासंग्रह==
==कथासंग्रह==
* वास्तुक (घनश्याम डोंगरे.१९९८) झाडीबोलीतला पहिला [[कथासंग्रह]].
* वास्तुक (घनश्याम डोंगरे.१९९८) झाडीबोलीतला पहिला [[कथासंग्रह]].
* पोरका (मा.तु. खिरटकर-२००१
* पोरका (मा.तु. खिरटकर - २००१
* गंप्याची बंडी (दिवाकर मोरस्कर-२००१)
* गंप्याची बंडी (दिवाकर मोरस्कर - २००१)
* विश्वंभरा (सुमिता कोंडबत्तुनवार-२००२)
* विश्वंभरा (सुमिता कोंडबत्तुनवार - २००२)
* चटनीचा पेंड (वा.चं. ठाकरे-२००८)
* चटनीचा पेंड (वा.चं. ठाकरे - २००८)
* कवितेत रंगल्या कता (बापुराव टोंगे-२००९)
* कवितेत रंगल्या कता (बापुराव टोंगे - २००९)
* झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल-२००१)
* झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल - २००१)

==कादंबऱ्या/चरित्रे==
==कादंबर्‍या/चरित्रे==
* भाराटी (घनश्याम डोंगरे)
* झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे - २०१२)
* बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
* बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
* भाराटी (घनश्याम डोंगरे)
* झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे-२०१२)

==अन्य साहित्य==
==अन्य साहित्य==
* झाडीबोली मराठी [[शब्दकोश]] (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
* झाडीबोली भाषा आणि अभ्यास (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
* झाडी बोली भाषा आणि अभ्यास (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
* झाडीबोली-मराठी [[शब्दकोश]] (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)

==पुरस्कार==
==पुरस्कार==
* ’भाराटी' ला [[नाशिक]] येथील प्रतिष्ठेचा बंधुमाधव पुरस्कार मिळाला.
* ’भाराटी' ला [[नाशिक]] येथील प्रतिष्ठेचा बंधुमाधव पुरस्कार मिळाला.
*”बाप्तिस्मा ते धर्मांतर’ला महाराष्ट्र­ शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार लाभलेले आहेत.
* ”बाप्तिस्मा ते धर्मांतर’ला महाराष्ट्र­ शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार लाभलेले आहेत.
* डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या 'झाडी बोली : भाषा आणि अभ्यास' आणि 'भाषिक भ्रमंती' या दोन ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.
* डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या 'झाडी बोली : भाषा आणि अभ्यास' आणि 'भाषिक भ्रमंती' या दोन ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.

==झाडीबोली साहित्य संमेलने==
==झाडीबोली साहित्य संमेलने==
*१९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले. आजतागायत(इ.स.२०१२) शासकीय मदतीशिवाय या मंडळाने अठरा [[साहित्य संमेलन|साहित्य संमेलने]] घेतली आहेत.
* १९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले. आजतागायत(इ.स.२०१५) शासकीय मदतीशिवाय या मंडळाने बावीस [[साहित्य संमेलन|साहित्य संमेलने]] घेतली आहेत.
* इ.स. १९९५च्या सेंदूरवाफा येथील तिसऱ्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कै.प्रा.[[द.सा.बोरकर]] यांनी भूषविले होते.
* इ.स. १९९५च्या सेंदूरवाफा येथील तिसर्‍या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिवंगत प्रा. [[द.सा.बोरकर]] यांनी भूषविले होते.
* २२वे झाडीबोली साहित्य संमेलन १० जानेवारी २०१५ रोजी गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा या गावी झाले. साहित्यिक धनंजय ओक या संमेलनाचे (बहुधा) अध्यक्ष असावेत.
* झाडीबोली साहित्य मंडळाने मराठी बोली साहित्य संघ ही संस्था १५ ऑगस्ट २००३ रोजी स्थापली.


==झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन==
==झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन==
* १ले : येरंडी(तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया); २३-३-२०१२
* १ले : येरंडी(तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया); २३-३-२०१२

==हे ही पहा==
==हेही पहा==
* [[वऱ्हाडी बोलीभाषा]]
* [[वर्‍हाडी बोलीभाषा]]
* [[अहिराणी]]
* [[अहिराणी]]
* [[मराठी साहित्य संमेलने]]
* [[मराठी साहित्य संमेलने]]

{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[वर्ग:बोलीभाषा]]
[[वर्ग:बोलीभाषा]]

१८:४६, ११ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

महाराष्ट्र राज्याच्या पूर्व प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली म्हणजे झाडीबोली होय. महाराष्ट्र­ाच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली 'झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्गराजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषिक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात.

झाडीबोलीची वैशिष्ट्ये

  • झाडीबोलीत प्रमाण मराठीतील सर्व स्वर आहेत.
  • या बोलीत छ, श, ष, आणि स या चार व्यंजनांचे कार्य एकटे स हे व्यंजन पार पाडते.
  • न आणि ण ऐवजी फक्त न वापरला जातो.
  • उच्चाराच्या संदर्भात झाडीबोलीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या बोलीत च, ज आणि झ या व्यंजनांचा केवळ तालव्य उच्चार ऐकायला मिळतो. म्हणजे चमच्यातला च, जसामधला ज आणि झग्यातला झ नाही.
  • 'ळ' या व्यंजनचा उच्चार 'र' असा होतो. त्यामुळे काळा, कावळा, पोळा हे शब्द कारा, कावरा, पोरा असे कानावर पडतात.
  • या बोलीत केवळ पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आहेत. प्रमाण मराठीतील नपुंसकलिंग या बोलीत आढळत नाही.
  • शिवाय अनेक शब्दांचे लिंग मराठीपेक्षा वेगळे आहे. उदाहरणार्थ या बोलीत नाटक हा शब्द स्त्रीलिंगी आहे, तर जागा पुल्लिंगी आहे.
  • मराठीप्रमाणेच या बोलीत उली हा प्रत्यय लघुत्ववाचक आहे. उदा० कोटा-कोटुली, मारा-मारुली, गाडा-गाडुली इत्यादी.
  • नामाच्या लिंगानुसार एकवचनात 'हा', 'ही', 'हे' आणि अनेकवचनात 'हे', 'ह्या', 'ही' अशी सर्वनामे प्रमाण मराठीत वापरली जातात. अशी वेगवेगळी सर्वनामे न वापरता झाडीबोली केवळ 'ह्या' हे एकच सर्वनाम वापरून आपला कारभार पार पाडते.
  • प्रथम पुरुषी एकवचनात मी केलू, मी धरलू अशी उकारांत क्रियापदे वापरण्याची या बोलीची लकब प्राचीन ओव्यांची आठवण करून देणारी आहे.
  • प्रथम पुरुषी अनेकवचनातील आमी केलून, आमी धरलून अशी वाक्यरचना होते.
  • करजो, देजो, पायजो ही आज्ञार्थी रूपे आहेत.
  • 'मी जावासीन ना तो मरावासीन'(मी गेलो आणि तेव्हाच तो मेला) ही सामान्य क्रियापदाची वेगळी रचना या बोलीत आढळते.

झाडीबोलीतील काही खास शब्द

शेतीचा माल इकडून तिकडे नेण्याकरिता जे साधन वापरतात त्यास ‘बंडी' असे संबोधले जाते. अन्यत्र हाच शब्द पुरुषाच्या अंगातील वस्त्राकरिता वापरत असले, तरी गोंडी व माडिया या आदिवासींच्या भाषांसह दक्षिणेतील तामीळ, तेलगू, मल्याळम इत्यादी सर्वच भाषांमध्ये ‘बंडी' हा शब्द ‘मालवाहतुकीचे साधन' याच अर्थाने रूढ आहे. यावरून ‘बंडी' या शब्दाचे प्राचीनत्व कळून येऊ शकते. शेतातून तनीस किवा गवत घरी आणणे, कापलेल्या धानाचे भारे खळ्यावर आणणे, चुरलेल्या धानाची रास खळ्यावरून घरी आणणे, तोडलेल्या झाडाची लाकडे आणणे, घर बांधण्याकरिता विटा, रेती वगैरे साहित्य आणणे अशा अवजड वस्तूंना वाहून नेण्याकरिता बंडी वापरली जाते. बाजारात विक्रीकरिता धान्य किवा इतर उत्पादने घेऊन जाण्यासाठीदेखील बंडी उपयुक्त ठरते.

बंडीला दोन चाके असतात. तिच्या झाडीपट्टीमध्ये माल वाहून प्रत्येक चाकास ’भोवरी' हा शब्द आहे, तर या भोवरीवर जी लोखंडी धाव असते तिच्याकरिता झाडीबोलीत ‘येट' हा पर्याय वापरला जातो. ती ज्या दोन लांब लाकडांवर आधारलेली असते त्यांच्यापैकी प्रत्येक लाकडास ‘धुरा' म्हणतात. तिचे जे जू असते त्याचा नामविस्तार करून त्यास ‘जुवाडा' हा शब्द झाडीबोलीने प्रचारात आणला आहे. हा जुवाडा खाली ठेवणे अनेकदा शक्य नसते. त्याकरिता जो तिपाया वापरण्यात येतो त्यास ‘ढिरा' हा शब्द प्रचलित आहे. बंडीच्या बैलांना हाकण्याकरिता जो जाड आसूड किवा चाबूक वापरला जातो त्याला ‘सटका' असे नाव आहे. पूर्वी महाशिवरात्रीला महोदवास जाणारा जो पोवा असायचा त्यातही अशा अनेक बंड्यांचा समावेश असे. म्हणूनच लोकनाट्यात गायल्या जाणाऱ्या ‘पोवाडा' या शब्दाची व्युत्पत्ती झाडीबोलीतल्या पोवा या शब्दावरून असावी.

प्रवासाकरिता झाडीपट्टीत जे वाहन वापरले जाते त्यास ‘खाचर' किवा ‘खासर' असे नाव आहे. तिचे स्वरूप बंडीसारखेच असले, तरी तिचा आकार मात्र बंडीपेक्षा लहान असतो. शिवाय निर्मितीच्या दृष्टीने बंडी ही ओबडधोबड असते, तर खासर ही त्यामानाने व्यवस्थित असते. पूवी परगावी नातेवाईकांकडे जायला खासर हेच साधन उपलब्ध होते. तेव्हा विवाहाकरिता खासरानेच जावे लागायचे. किबहुना लग्नाला अथवा वरातीला किती खासरा येणार आहेत त्यावरून त्या सोयऱ्याचा दर्जा ठरविण्याची पद्धती त्या काळी रूढ होती. खासरेच्या पुढल्या भागात धुऱ्यावर एक टोपली ठेवलेली असे. या टोपलीत किरकोळ साहित्यासह खाजाचा झोलना असे. लहान मुलांना पाहुण्यांकडून मिळणारा स्वादिष्ट उपहार म्हणून या झोलन्याकडे मुलांचे अधिक लक्ष असायचे. खासरेच्या बैलांना हाकण्याकरिता जी पराणी वापरली जाते तिला झाडीबोलीत ‘तुतारी' हा शब्द आहे. बैलांना टोचण्याकरिता त्या तुतारीला जे लोखंडी खिळ्याचे टोक असते त्यास ‘आरू' असे संबोधले जाते.

नेहमीची खासर ही ‘बोडकी खासर' होय. पुरुष मंडळी अशा खासराने प्रवास करणे योग्य समजत असत. विशेषत: जंगलात शिकारीकरिता जायचे म्हटले की, सभोवतालचे निरीक्षण करणे हे आलेच. म्हणून या कामी बोडकी खासर अतिशय उपयुक्त समजली जायची. कांबीपासून करंडी म्हणजे बुरुड या स्थानिक बलुतेदार कारागिराने तयार केलेले आवरण होय. बांबूला झाडीपट्टीत येरू, बासकरक हे अन्य तीन पर्याय वापरले जातात आणि बांबूचे जे रान असते त्यास ‘रांजी' हा खास झाडी शब्द वापरला जातो. आवरण असलेली ‘चापेची खासर' ही खास महिलांची मक्तेदारी असते. शिवाय या बासाच्या चापेवरही रंगीत कापडाचे आवरण असलेली नवरीसारखी सजलेली ‘पडद्याची खासर' खास नववधूकरिता वापरली जाते. कुटुंबाने जायचे असल्यासदेखील चापेची खासर पूर्वी वापरायचे. लग्नास जाण्याकरिता महिलांना अशाच खाचरांची गरज असे. खाचर बोडकी असो की चापेची, खाचरेत बसून पाच-सहा व्यक्ती सहज प्रवास करू शकतात.

पण, पटाकरिता एवढे मोठे साधन वापरणे येथील जाणकारांना अजिबात पसंत नाही. त्याकरिता त्यांनी केवळ एक अथवा जास्तीत जास्त दोन माणसे वाहून नेणारे नवीन साधन सिद्ध केले. त्यास झाडीबोलीत ‘सेकडा' किवा छकडा' हे नाव आहे. स्थानिक वाढई म्हणजे सुतार याच्या कारागिरीचा विशेष नमुना म्हणून हा सेकडा पाहण्यासारखा असतो. बंडी, खासर व सेकडा यांचा आकार व उपयोग याचा विचार करता ट्रक, कार व फटफटी या आज उपलब्ध असलेल्या यांत्रिक वाहनांची झाडीपट्टीतील परंपरागत वाहनांशी तुलना करावयाची झाल्यास येथील बंडी म्हणजे मालवाहू ट्रक असून, खासर ही चारचाकी कारसारखी उपयोगात आणली जाते, तर सेकडा म्हणजे केवळ एकट्यादुकट्याने प्रवास करण्यास योग्य अशी फटफटी म्हणता येईल. वाहनांच्या अधिक नावांसाठी पहा - प्राणिचलित वाहतूक साधने

लोकसाहित्य

झाडीबोलीत लोकसाहित्याचे अपार भांडार आहे. क्रीडागीते, पाळणागीते, सासुरवाशिणीची गीते असे अनेक प्रकार आहेत. धानाची रोवणी करताना बायकांच्या मुखातून रोवण्याची गाणी ऐकू येतात. महाशिवरात्रीला महादेवाच्या यात्रेला जाणाऱ्या भक्तांच्या मुखांतून महादेवाची गाणी उमटतात. पोळयाला अकरावर गायल्या जाणाऱ्या झडत्या आणि घोडा नाचताना गायले जाणारे बिरवे त्या त्या प्रसंगीच ऐकायला मिळतात. झाडीबोलीमध्ये भिंगीसोंग आणि दंडीगान सादर करणारे भिंगी व दंडी कितीतरी वर्षांपासून झाडीपट्टीतील जनतेचे रंजन करीत आहेत. दंडार, खडीगंमत, गंगासागर, डाहाका आणि गोंधड हे लोकरंजनासोबत लोकप्रबोधनाचा वसा घेतलेले काव्यप्रकार आहेत.

नियतकालिके

झाडीबोलीचे स्वत:चे मासिक आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या संपादकत्वाखाली 'लाडाची बाई' हे बाल मासिक झाडीबोलीत (देवनागरी लिपीत) भाषेत जानेवारी २०१०पासून प्रकाशित होत आहे. हे झाडी भाषेतील पहिले आणि एकमेव मासिक आहे(इ.स.२०१२).

प्रकाशित साहित्य

झाडीबोलीत सर्व प्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जातो. 'पवनपर्व' या साकोली येथून दर रविवारी प्रकाशित होणार्‍या ’रविवासरी’ नावाच्या साप्ताहिकात 'वद्राचा देव खाल्या आला' ही त्यांची झाडीबोलीतील कथा १६ मार्च १९८०च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कथा होय. तसेच याच नियतकालिकात 'अडचा घुटाची भूक' ही त्यांची झाडीबोलीतील कविता २० मार्च १९८१ च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कविता समजली जाते.

'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' ह्या विषयावर डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी पीएच.डी.चा प्रबंध लिहिला होता.

झाडीबोली साहित्य मंडळाने मराठी बोली साहित्य संघ ही संस्था १५ ऑगस्ट २००३ रोजी स्थापली.

कविता संग्रह

  • सपनधून (कवी ना.गो. थुटे - १ जानेवारी २०००) हा झाडीबोलीतील पहिला प्रकाशित कवितासंग्रह.
  • अंजनाबाईची कविता (कवयित्री अंजनाबाई खुणे - ९ जाने २०००)
  • आदवा (चारोळीसंग्रह-कवी राजन जयस्वाल - ९ जानेवारी २०००)
  • हिरवा पदर (कवितासंग्रह कवी हिरामन लांजे(रमानंद) - २००२)
  • रूप झाडीचा (वा.चं. ठाकरे - २००२)
  • कानात सांग (डॉ. हरिश्चंद्र बोरकर - २००२)
  • माज्या मुलकाची कता (विठ्ठल लांजेवार -२ ००२)
  • झाडीपट्टीचा बारसा (रामचंद्र डोंगरवार - २००३)
  • झाडी भुलामाय (प्र.ग. तल्लारवार(प्रगत) - २००६)
  • आदवा(कवितासंग्रह कवी राजन जयस्वाल - २००४)
  • अंजनाबाईची गाणी(अंजनाबाई खुणे - २००५)
  • सोनुली (पांडुरंग भेलावे - २००६)
  • मातीत मिरली माती' (मुरलीधर खोटेले - २००७)
  • माजी मायबोली (बापुराव टोंगे - २००८)
  • झाडीची माती (मिलिंद रंगारी - २००८)
  • मोहतेल (प्रल्हाद मेश्राम)
  • रंगल्या तांदराचा सडा (मनराज पटेल)
  • घामाचा दाम (डोमा कापगते)
  • कविता झाडीची (झाडीबोलीतील २५ उत्कृष्ट कवितांचा संग्रह - संपादक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ना. गो. थुटे-२००२)इत्यादी.

कथासंग्रह

  • वास्तुक (घनश्याम डोंगरे.१९९८) झाडीबोलीतला पहिला कथासंग्रह.
  • पोरका (मा.तु. खिरटकर - २००१
  • गंप्याची बंडी (दिवाकर मोरस्कर - २००१)
  • विश्वंभरा (सुमिता कोंडबत्तुनवार - २००२)
  • चटनीचा पेंड (वा.चं. ठाकरे - २००८)
  • कवितेत रंगल्या कता (बापुराव टोंगे - २००९)
  • झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल - २००१)

कादंबर्‍या/चरित्रे

  • झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे - २०१२)
  • बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
  • भाराटी (घनश्याम डोंगरे)

अन्य साहित्य

  • झाडीबोली भाषा आणि अभ्यास (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
  • झाडीबोली-मराठी शब्दकोश (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)

पुरस्कार

  • ’भाराटी' ला नाशिक येथील प्रतिष्ठेचा बंधुमाधव पुरस्कार मिळाला.
  • ”बाप्तिस्मा ते धर्मांतर’ला महाराष्ट्र­ शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार लाभलेले आहेत.
  • डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या 'झाडी बोली : भाषा आणि अभ्यास' आणि 'भाषिक भ्रमंती' या दोन ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.

झाडीबोली साहित्य संमेलने

  • १९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले. आजतागायत(इ.स.२०१५) शासकीय मदतीशिवाय या मंडळाने बावीस साहित्य संमेलने घेतली आहेत.
  • इ.स. १९९५च्या सेंदूरवाफा येथील तिसर्‍या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिवंगत प्रा. द.सा.बोरकर यांनी भूषविले होते.
  • २२वे झाडीबोली साहित्य संमेलन १० जानेवारी २०१५ रोजी गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा या गावी झाले. साहित्यिक धनंजय ओक या संमेलनाचे (बहुधा) अध्यक्ष असावेत.


झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन

  • १ले : येरंडी(तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया); २३-३-२०१२

हेही पहा