Jump to content

"चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १४९: ओळ १४९:
या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात. मात्र, हल्ली दसऱ्याला श्रीखंड-पुरी करावयाची पद्धत रूढ झाली आहे. दसरा आणि सीमोल्लंघन हे सण महाराष्ट्रातील सर्व जाती एकसारखेच साजरे करतात.
या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात. मात्र, हल्ली दसऱ्याला श्रीखंड-पुरी करावयाची पद्धत रूढ झाली आहे. दसरा आणि सीमोल्लंघन हे सण महाराष्ट्रातील सर्व जाती एकसारखेच साजरे करतात.


==बोडण==
बोडण : हे धार्मिक कार्य जे फक्त चित्पावन समाजात केले जाते, त्याबद्दलची माहिती :-


लग्न, मुंज यांसारखे मंगल कार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थांतील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास पौष व चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम करता येतो.


तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नान होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठरावीक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारिकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा व नंतर आलेल्या महिलांची व कुमारिकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात.
बोडण : हे धार्मिक कार्य जे फक्त चित्पावन समाजात केले जाते, त्याबद्दल माहिती समाविष्ट करावी.

लग्न, मुंज यांसारखे मंगल कार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते.
आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी, प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृताने पूजा करतात. कणीक साखर घातलेल्या दुधात भिजवून तिचे देवीकरिता छोटे छोटे दागिने करतात. त्या कणकेचेच सिंहासन व दुधासाठी हराडेरा करतात. आरतीसाठी कणकेचे पाच छोटे छोटे दिवेही करतात.

देवीची पूजा घरच्या मालकिणीने पंचामृत वापरून करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्यासाठी पुरण घातलेच पाहिजे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणतात.. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवतात. घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे एक ते दोन भांडी पंचामृतही (दूध, दही, तूप, मध, साखर) लागते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालतात. नंतर घराची मालकीण सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतर लोक बोडण कळवण्यास सुरुवात करतात. आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते, व नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात ’थांबवते’. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते, तसेच टाकून द्यायचे नसते.

बोडण हा धार्मिक कुलाचार चित्पावन ब्राह्मणांमध्ये असून इतर कोणत्याही ब्राह्मण पोटजातीत तो आढळत नाही.


===खानपान===
===खानपान===

१७:०१, १४ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

या लेखातील सध्याचे काही लेखन मूळ लेखन या स्वरूपात मोडते. जोपर्यंत हे लिखाण विकिस्रोत या भावी सहप्रकल्पास उपयुक्त आहे, तोपर्यंत हे लेखन ही सूचना लावून मराठी विकिबुक्समध्ये साठवता येईल. मराठी विकिपीडियात या लेखनातील भाग ठेवण्याकरिता संपादकास सुयोग्य असे स्वतःच्या लेखनाचे सोडून इतर संदर्भ[ संदर्भ हवा ] देणे अपेक्षित आहे.

एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने "मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे.) [] त्यापैकी एक पोटजात म्हणजे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या पूर्वाश्रमीच्या ऐतिहासिक परंपरेमुळे त्यांच्या ऐतिहासिक उदयाबद्दल आणि महत्त्वाकांक्षांबद्दल त्यांचे अनुयायी, समर्थक आणि विरोधकांत या समुदाय विशेषाबद्दल कुतूहल आढळते.

चित्तपावन शब्दाचा अर्थ आणि व्युत्पत्ती आणि दंतकथा

बऱ्याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मूळपुरुष हे अग्नी चयन करत व अग्नि(चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन केले आहे(म.श्री. दीक्षित संपादित ’आम्ही चित्पावन’).

’दंतकथा:परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करून घेतले, या दंतकथेची संगती ते लावतात. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे.[]

अरुण क. घोष यांच्या मतानुसार चित्पावन पोटजात सातवाहनाच्या काळात निर्माण झाली.[]

अद्यापि संशोधनाने सिद्ध/शास्त्रीय आधार नसलेल्या काही मतांनुसार चित्पावन ब्राम्हणांच्या प्रथा चाली-रीती पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारी भूमिहार ब्राम्हण, पंजाबचे मोह्यळ ब्राम्हण, केरळातील नंबुद्री ब्राम्हण, आंध्रप्रदेशातील हव्यक ,गुजरातेतील अन्विक ,उत्तराखंडाचे कुमाऊं ब्राम्हणांशी मिळत्याजुळत्या आहेत आणि या सर्व समुदायात परशुरामास विशेष सन्मान आहे. कोकणस्थ ब्राम्हणांचा त्रोटक उल्लेख कोब्रा असाही केला जातो.

अनुवंशशास्त्र आणि शरीरयष्टी

सर्वसाधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका यामुळे चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण वेगळे ओळखता येतात.

युरोपीय वैज्ञानिकांनी ब्राम्हणांच्या विविध गटांबद्दल जे अभ्यास केले त्यात, अनुमानांच्या अपेक्षेप्रमाणे कोकणस्थ ब्राम्हण, वाय गुणसूत्र परीक्षणांवरून इतर भारतीय ब्राम्हणी गटांपेक्षा वेगळे, आणि दक्षिणी युरोपातल्या, प्रामुख्याने फ्रेंच, इटालियन, ग्रीक, लायबेरियन, आणि आयरिश लोकांच्या गुणसूत्रांशी जवळीक दर्शवणारे आढळले.[]

कोकणस्थ ब्राम्हणांप्रमाणे दक्षिण इंग्लंडात बरेच जण अजूनही अंशतः मूळ आयरिश आणि फ्रेंच वाय हेप्लोग्रुप गुणसूत्रांचे आढळतात. कोकणच्या सागरी किनाऱ्यावर प्रथमतः पोहोचणारे गोरे, उत्तम तब्येतीचे, मध्यम बांध्याचे, सौम्य तपकिरी ते लाल केसांचे आणि घाऱ्या अथवा हिरव्या डोळ्यांचे असावेत. असेच कोकणस्थ ब्राम्हण आजही असेच असतात.

अलीकडील अभ्यास (किविसिल्ड एट अल २००३,गायकवाड एट अल २००५), पोर्तुगीज आणि फ्रेंचांनी भारतातील काही भागावर राज्य केल्याच्या काळापासून, चित्पावनांच्या युरोपीय मूळाबद्दल शंका व्यक्त केली जात असे. तरीपण चित्पावनात इतरही वैविध्यपूर्ण गुणसूत्रांचाही प्रभाव आढळतो.

(Sahoo et al. 2006) नुसार चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बऱ्याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा् हेप्लोग्रूप उत्तरी भारतीयांतसुद्धा सामन्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.

मिडल ईस्टर्न ओरिजिनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बऱ्याच उच्चजातीय भारतीयात आढळतो. (Sahoo et al. 2006).त्या अनुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रुपांचे अस्तित्व प्राबल्याने मूळचे भारतीय समजल्या जाणाऱ्या आणि पश्चिम व दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांत आढळते.

त्यामुळे उपलब्ध पुराव्यावरून उपरोल्लेखित वर्णीय वैशिष्ट्ये आईच्या बाजूने आल्याची जास्त शक्यता आहे.[]

गोत्रे

चित्पावनांची १४ गोत्रे आहेत. गोत्रांची नावे ही त्या गोत्रांचा मूळपुरुष असलेल्या विद्वान ऋषींची नावे आहेत. प्रत्येक गोत्रात अनेक उपनामांचा समावेश आहे. काही उपनामे ही एकापेक्षा जास्त गोत्रात आढळतात.[]

गोत्रे प्रवर
अत्रि आत्रेयार्चनानसश्यावाश्चेति
कपि आंगिरसामहीवोरुक्षयसेति
काश्यप काश्यपावत्सारनैध्रुव
कौंडिण्य वासिष्ठमैत्रावरुणकौंडिण्येति
कौशिक वैश्वामित्रघमर्षणकौशिकेति
गार्ग्य आंगिरसशैन्यगार्ग्येति
जामदग्न्य भार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति
नित्युंदन आंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति
बाभ्रव्य वैश्वमित्रदेवरातौदसेति
भारद्वाज आङि्गरसबार्हस्पत्यभारद्वाजेति
वत्स भार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति
वासिष्ठ वासिष्ठेन्द्रप्रमदाभरद्वस्विति
विष्णुवृद्ध आंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति
शाण्डिल्य शाण्डिलासितदैवलेति

कुलदेवता आणि पूजाअर्चा

वर सांगितल्याप्रमाणे चित्पावनांत १४ गोत्रे आहेत, व मूळ कुळे(आडनावे) ६० समजली जातात[ संदर्भ हवा ].साठे(साठ्ये) हे साठावे आडनाव. मराठवाड्यातल्या अंबेजोगाई येथील योगेश्वरी ही कोंकणस्थांची मूळ कुलदेवता आहे[ संदर्भ हवा ] महालक्ष्मी, वज्राई या मागाहून[ संदर्भ हवा ] कुलदेवता म्हणून स्वीकारल्या गेल्या.

सर्व गोत्रे आणि त्यांतील मूळ आडनावे

१. अत्री : आठवले, चितळे, भाडभोळे. (एकूण तीन) २. कपि : खांबेटे, जाईल, माईल, लिमये. (एकूण चार) ३. काश्यप : गानू, गोखले, जोग, लवाटे, लेले. (एकूण पाच) ४. कौंडिन्य : पटवर्धन, फणसे(फणशे). (एकूण दोन) ५. कौशिक : आपटे, गद्रे, बाम, भावे(भाव्ये), वाड. ((एकूण चार) ६. गार्ग्य : कर्वे, गाडगीळ, दाबके, माटे, लोंढे (एकूण पाच) ७. भारद्वाज : आचवल, गांधार, घांघुरडे, टेणे, दर्वे, रानडे(रानड्ये). (एकूण सात) ८. जामदग्नि : कुंटे, पेंडसे. (एकूण दोन) ९. नित्युंदन : भाडभोके, वैशंपायन. (एकूण दोन) १०. बाभ्रव्य : बाळ, बेहेरे. (एकूण दोन) ११. वत्स : मालशे. (एकूण एक) १२. वासिष्ठ : ओक, गोगटे, गोवंड्ये, धारू, पोंगशे, बागल. बापट, बोडस, दाते (दात्ये), भाभे, विंझे, साठे(साठये, साठ्ये). (एकूण बारा) १३. विष्णुवर्धन : किडमिडे, नेने, परांजपे(परांजप्ये), मेहेंदळे. (एकूण चार) १४. शांडिल्य : गणपुले, गांगल, जोशी, दामले, परचुरे, भाटे, सोमण. (एकूण सात)

अशी चौदा गोत्रे, आणि साठ आडनावे(कुळे).

चित्पावनांची आडनावे यज्ञविषयक कार्यावरून बनली. 'खांडल विप्र महासभा का इतिहास' या ग्रंथातील सूचीत प्रथमसंस्कृत अधिकारनामे व नंतर त्यांचे राजस्थानी व मराठी अपभ्रंश दिले आहेत. []

संस्कृती, सामाजिक आणि आर्थिक

पेशवाईतील पगडी
पेशवाईतील पगडी

सर्व साधारणतः कोकणस्थ कुटुंबे सभ्य, उच्चशिक्षित, साध्या परंतु नीटनेटक्या राहणीमानाची, काटकसर करणारी, अंथरूण पाहून पाय पसरणारी म्हणून ओळखली जातात. सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरूषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे व धोतर आणि स्त्रियांचा नऊवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकात त्यांची जागा पुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रियांची सहावारी साडी यांनी घेतली. आधुनिक काळात कोंकणस्थ स्त्रियांनी पंजाबी सलवार कमीज किंवा क्वचित पाश्चिमात्य पोशाखाचा स्वीकार केलेला आढळतो. कोंकणस्थांना नाटकाची आणि भावसंगीताची विशेष आवड असते.

चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विविध चळवळीचे पहिले लक्ष्य ठरत आला. सुरुवातीस सौम्य विरोध झाला तरी हा समाज नव्या आधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम असा झाला की आज कोकणस्थ स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जीवनातील सर्व क्षेत्रांत आघाडीवर दिसतात.

कुलाबा गॅझेटियर CHITPAVANS are returned as numbering 8337 souls and as found in most parts of the district. Most of them are said to have been settled where they now are for several generations, and probably came to Kolaba during the time of the Peshwa's supremacy. They are about the middle size, fair, and their women graceful. They speak Marathi, and are clean, neat, thrifty, and orderly. A few are traders, but most are landlords, Government servants, and religious beggars. They own mud and stone built houses surrounded by gardens. Their every day food is rice, rice and wheat bread, pulse, vegetables, butter, and curds. They take two meals a day. The men wear a round peaked turban, coat, waistcloth and shouldercloth, and square toed shoos, and the women a robe and bodice. In religion they are Smarts, and observe the regular Hindu fasts and feasts. As a class they are well-to-do.[]

As a class Chitpavans are notable for their cleannes & for their neatness & taste in dress;their stingness,hardness & craftiness are also proverbial.Chitpavans are beyond doubt one of the ablest class in Western India.They were the mainstay of the Maratha power when the maratha power was as its highest. in 1727 the nizam foundevery place filled with konkan brahmans;in 1817 Mr.Elphinstone found all leading brahmans in the poona Government connected with konkan.Under English they have lost much of the power which for the century they enjoyed.still their superior intellect, their eagerness for education & the high position they hold in government service enable them to maintain their superemacy in all marathi-speaking districts.beyond the limits of western india. their talents are admired & respected.[]

पूजा अर्चा पद्धती

सण

या विभागातील ज्या चालीरिती इतर भारतीय / ब्राम्हण / हिंदू चालीरितींशी मिळत्या जुळत्या असतील त्या येथून इतर संबंधित लेखांत हलवण्यात सहकार्य करावे व येथे केवळ चित्पावन कोकणस्थांच्या पुरत्या मर्यादित चालीरितींचा समावेश करावा इतर भाग वगळावा.

नवरात्र

नवरात्रात (अष्टमीला) कोकणस्थ ब्राह्मणांत घागरी फुंकल्या जातात. सकाळी सोवळ्यात सुवासिनी महालक्ष्मीची पूजा करतात. तिन्हीसांजेला महालक्ष्मीचा मुखवटा तयार करून त्याची पूजा करण्यात येते. आणि त्यानंतर घागरी फुंकण्याला सुरुवात होते. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा अष्टमीचा खेळ चालतो.

संक्रांत

संक्रांतीचे वाण पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगडे असेही म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणे सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ व एक तुळशीजवळ ठेवले जाते. व मग तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला 'सुगडे' म्हणतात. बहुतेक कोकणस्थ ब्राह्मणांकडे सुगडे देण्याची प्रथा आहे.

लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला 'पाटावरची वाणे' देतात. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुगडी, तिळगूळ व हळदकुंकू घेतात आणि तीन सवाष्णींच्या घरी जाऊन त्यांच्या घरांतील देवासमोर पाट मांडून त्यावर या वस्तु ठेवतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका आपापल्या घरी हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी आलेल्या स्त्रियांना वस्तु दिल्या जातात. या वस्तु 'लुटल्या' गेल्या असे म्हणायची पद्धत आहे.. पूर्वी काही ठिकाणी 'सोरट' करत असत. 'सोरट'मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तु त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.[१०]

गौरी-गणपती

गौरी[११] मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी हात असलेल्या तर काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने( न बोलता) चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी, ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर कोमट पाणी घालून, हळदकुंकू लावून, मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदुळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींसाठी खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णी गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील व मागील दारांपासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी 'गौरी कशाच्या पाऊली आली ग सोन्यामोत्याच्या पाऊली आली' असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.

गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबऱ्याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळदकुंकू, गंध, फूल, अक्षता, दूर्वा, आघाडा, गेजवस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळदकुंकू, साखर देतात. दुसऱ्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात.

तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी 'उतरवतात' म्हणजे त्यांचे विसर्जन करतात.

अनंत चतुर्दशी (भाद्रपद शुद्ध चतुर्दशी)

अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंत।अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने ताम्रकलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल गुंडाळतात. त्यावर दर्भ।दर्भाचा शेज तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधतात. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मंत्रजागर, गाणी इ. कार्यक्रम करतात. अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. त्याने इच्छीत फळ प्राप्त होते असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.

दसरा - सीमोल्लंघन (आश्विन शुद्ध दशमी)

नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा येतो. पौराणिक कथेनुसार देवांविरुद्ध राक्षसांचे घनघोर युद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला. तो दिवस होता आश्विन शुद्ध दशमीचा. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा पवित्र अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा श्रीगणेशा या दिवशी करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीपूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात.

या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी विशेष महत्त्व आहे.उत्तर भारत।उत्तरभारतात या दिवशी रावण।रावणाची प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे. वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार आपटा।आपट्याच्या झाडामधे ठेवले होते असे मानतात. म्हणून आपट्याची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात. या दिवशी वाहनांचीही पूजा करतात. रघूने कुबेरावर स्वारी करायची धमकी दिल्यानंतर कुबेराने पृथ्वीवर सोन्याचा पाऊस पडला, तो सर्व पाऊस रघूच्या अंगणातील आपट्याच्या झाडावर पडला, म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांची सोने म्हणून देवघेव होते. हे सोने बरोबरीच्या लोकांनी एकमेकांत, किंवा लहान मुलांनी मोठ्यांना द्यावयाचे असते.

या दिवशी घरातील कर्त्या पुरुषांनी सीमोल्लंघन करावयाचे असते. आपट्याची सोनेरूपी पाने घेऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे. घरी आल्यावर बहिणीकडून अथवा घरांतील मुख्य सवाष्ण स्त्रीकडून ओवाळून घ्यायचे असा प्रघात आहे. पूर्वी, साम्राज्य-वर्धनाच्या दृष्टीने ज्या मोहिमा आखल्या जात त्यांची सुरुवात या दिवशीच्या सीमोल्लंघनाने होत असे.

या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात. मात्र, हल्ली दसऱ्याला श्रीखंड-पुरी करावयाची पद्धत रूढ झाली आहे. दसरा आणि सीमोल्लंघन हे सण महाराष्ट्रातील सर्व जाती एकसारखेच साजरे करतात.

बोडण

बोडण : हे धार्मिक कार्य जे फक्त चित्पावन समाजात केले जाते, त्याबद्दलची माहिती :-

लग्न, मुंज यांसारखे मंगल कार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थांतील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास पौष व चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम करता येतो.

तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नान होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठरावीक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारिकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा व नंतर आलेल्या महिलांची व कुमारिकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात.

आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी, प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृताने पूजा करतात. कणीक साखर घातलेल्या दुधात भिजवून तिचे देवीकरिता छोटे छोटे दागिने करतात. त्या कणकेचेच सिंहासन व दुधासाठी हराडेरा करतात. आरतीसाठी कणकेचे पाच छोटे छोटे दिवेही करतात.

देवीची पूजा घरच्या मालकिणीने पंचामृत वापरून करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्यासाठी पुरण घातलेच पाहिजे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणतात.. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवतात. घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे एक ते दोन भांडी पंचामृतही (दूध, दही, तूप, मध, साखर) लागते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालतात. नंतर घराची मालकीण सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतर लोक बोडण कळवण्यास सुरुवात करतात. आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते, व नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात ’थांबवते’. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते, तसेच टाकून द्यायचे नसते.

बोडण हा धार्मिक कुलाचार चित्पावन ब्राह्मणांमध्ये असून इतर कोणत्याही ब्राह्मण पोटजातीत तो आढळत नाही.

खानपान

खालील दुवा अधिक माहिती करिता वापरता येईल उकडीचे मोदक,उकडीच्या करंज्या

भाषा

चित्पावनांची स्वतःची चित्पावनी नावाची कोकणी भाषेची उपबोली भाषा होती [१२]. १९५०च्या दशकानंतर ह्या भाषेत बोलणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असली तरी, आजही गोवा आणि कर्नाटकाच्या दक्षिण कानडा जिल्ह्यातील चित्पावन आपल्या कुटुंबांमध्ये ही बोली टिकवून आहेत. ऑर्कुटसारख्या माध्यमातून चित्पावनी भाषेचे पुनरज्जीवन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. देशावरील चित्पावन ब्राम्हणांनी सर्वसाधारणतः चित्पावनी आणि कोकणीचा उपयोग सोडून मराठी भाषेचा अवलंब सुरू केला.चित्पावन ब्राम्हणांचे संस्कृत भाषेवरसुद्धा लक्षणीय प्रभुत्व असे. चित्पावनी भाषेतील मूळ सानुनासिक उच्चारांचा प्रभाव चित्पावनांच्या मराठी बोलण्यावर आढळतो. अर्थात हा मुद्दा वगळल्यास चित्पावन बोलत असलेली मराठी प्रमाण मराठी भाषेच्या जवळपास असते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र चित्पावनांनी स्वतःच्या शालेय शिक्षणाकरिता प्राथमिक स्तरापासूनच्या इंग्रजी शिक्षणाचा वापर प्रामुख्याने चालू केला. तसेच एकूण ब्राम्हण समाजाला भारतात मिळणाऱ्या सापत्‍न वागणुकीला कंटाळून चित्पावन मोठ्या प्रमाणावर पाश्चिमात्य देशांत स्थलांतर करू इच्छितात, निदान तशे स्वप्ने पाहतात. अशाने मराठी भाषेचा वापर नवीन पिढीत बोलीभाषेपुरता मर्यादित होत चाललेला आहे.

चित्पावनी बोलीतील काही शब्द

चेड (मुलगी), बोड्यो (मुलगा), कें (कुठे), कितां (काय), सां (आहे), में (मी), विन्चां (संध्याकाळ), नय (नदी), थेयलां (ठेवले), घेव्नी (घेऊन), येचां (येणारा), हाड (आण), ओखद (औषध), चखोट (चांगले), पेख (थांब), आत्वार (स्वयंपाकघर), नाकां (नको), यठां (ईथे), कई (कधी), बोलसें (बोलतो).

[१३]

व्यवसाय आणि अर्थकारण

पेशवाईपूर्व काळात कोकणविभागात मुख्यत्वे स्थानिक समुदाय शेती व भिक्षुकी वर निर्भ्रर होता तुरळक प्रमाणात प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा समावेश असे. पेशवाई काळात थोडा बदल होऊन सरदारकी तसेच सैन्यातील कामे वाढली, प्रशासनातील कारकुनी कामातही वाढ झाली व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भिक्षुकांची स्थिती सुधारली. सुधारलेल्या स्थितीचा उपयोग करून अपवादात्मक उद्योग व्यवसाय करण्याचे जे प्रयत्‍न झाले ते तात्कालिक स्वरूपाचे ठरले.

आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेला हा समाज पेशवाईनंतर आलेल्या इंग्रजी प्रशासनात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून शासकीय क्षेत्रात रमला. इंग्रजांनीसुद्धा सुरुवातीला थोडा संशय बाळगला तरी लौकरच त्यांना प्रशासनात सामील करून घेतले.

हा समाज स्वातंत्र्यानंतर पहिली २०-२५ वर्षे पर्यायी पुरेशा प्रशिक्षित माणूसबळाच्या अभावी, राजकीय चळवळीतून बाहेर पडलेल्या लोकसंख्येसहित शासकीय नौकऱ्यांवर अधिकच अवलंबित झाला. परिणामी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अशा क्षेत्रातील आपला प्रभाव टिकवण्याकरिता या समाजाने मुलांना कमालीच्या शैक्षणिक स्पर्धेत लोटून शैक्षणिक उच्चांक प्रस्थापित केले. पण, ऐंशीच्या दशकानंतर राजकीय दृष्ट्या जागरूक झालेल्या व पुरेसे शिक्षण उपलब्ध नसलेल्या बहुसंख्य समाजाने ब्राम्हणेतर राजकीय चळवळीच्या माध्यमातून शासकीय क्षेत्रात आरक्षणे पदरात पाडून घेतली. त्याच वेळी शून्याधारित अर्थसंकल्पांच्या आणि खासगीकरणच्या संकल्पना शासकीय क्षेत्रात राबवल्या गेल्यामुळे इतर ब्राम्हणांसमुदायासमवेत चित्पावन समाजाने शासकीय नोकऱ्यांवरील लक्ष काढून घेतले. उच्चशिक्षण उपलब्ध होऊ शकलेल्या बहुसंख्यांनी परदेशाचे रस्ते पकडले. सन १९९० नंतर भरभराटीला आलेल्या खासगी क्षेत्राने, बहुसंख्य चित्पावनांना जरी खासगी क्षेत्रातील नोकरीत सामावून घेतले, तरी पाश्चात्त्य देशात स्थानांतर हे त्यांचे ध्येय होत गेले आहे. अत्यल्प प्रमाणात स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचाही मार्ग चित्पावनांनी चोखाळला. या प्रयत्‍नांतही त्यांना यश आले तरी भारतातील आणि परदेशातील बहुतेक चित्पावनांचा ओढा नोकरी-व्यवसायाकडेच रहात आला आहे.

या समुदायाचे बरेच लोक बँकिंग, विपणन, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात आढळतात.

इतिहासाचा मागोवा

पेशवाई पूर्व

कोकणस्थ पहिल्यापासून बुद्धिमान, आहेत व कोकणात १८०० वर्षांपासून राहात आहेत, तर त्यांचे नाव इतिहासात पेशवाईपूर्वी का दिसत नाहीत, याच्या कारणाबद्दल बरीच चर्चा होते. पूर्वी ब्राह्मण राजकारणात जात नव्हते. कोकणस्थांत वेदाध्ययन करून स्नानसंध्येत काल घालवणारे व चरितार्थाकारिता शेती करणारेच पुष्कळ होते.[१४] या संदर्भात वि. का. राजवाडे लिहितात,

'चित्पावन ब्राह्मण भारतवर्षाच्या राजकीय क्षितिजावर एकोकी व अकस्मात उगवलेले स्थूलदृष्टीला दिसतात. सामान्यत: असाही समज आहे की, कोणत्याही प्रकारचे पूर्वचिन्ह न दाखविता किंवा कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता हा समाज दैवयोगाने ऐश्वर्यारुढ झाला, पण असा चमत्कार इतिहासाला परिचित नाही. इतकेच काय सृष्टीलाही परिचित नाही. वास्तविक सूक्ष्म शोध घेतला असता असे आढळून आले आहे की, चित्पावनांची उद्योन्मुखता आस्ते आस्ते व क्रमाक्रमानेच होत आली आहे. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावनांना परशुरामाने कोकणात आणून बसवले तेव्हा ते फक्त १४ जण होते. शकपूर्व १२०० ते शकोत्तर १२०० पर्यंतच्या २५०० वर्षांत चित्पावनांची लोकसंख्या इतकी थोडी होती की, हिंदुस्थानच्या राजकारणांत हात घालण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. त्यांची लोकसंख्या चार-पाच हजार असावी. प्रजावृद्धी होण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. शके १२०० नंतर मुसलमानी अमलात लौकिक व्यवहार चित्पावन उचलू लागले, तसतसे त्यांचे आर्थिक सामर्थ्य वाढू लागले व जास्त प्रजा पोसण्याची शक्ती त्यांच्या ठायी आली. बुद्धी तर होती व या बुद्धीला काही प्रमाणात संपत्तीची व प्रजावृद्धीची जोड मिळाली, तेव्हा हिंदुस्थानच्या राजकारणात हात घालण्याची शक्ती उत्पन्न झाली. ही शक्ती संधीची वाट पाहत होती व ती संधी राजाराम छत्रपतींच्या मृत्यूनंतर चित्पावनांना सापडली व तिचा त्यांनी यथायोग्य उपयोग केला.'[१५]

पेशवाई

चित्पावनांचे मूळपुरुष साधारण ३००० वर्षांपूर्वी कोकणात स्थायिक झाले असावेत[ संदर्भ हवा ]. उत्तरेतून ६२ कुळे यज्ञाच्या निमित्ताने पैठण, कर्नाटक व अखेर कोकणात आली.

शिलाहार कालीन ताम्रपटात अथवा शिलालेखात "घैसास" हे चित्पावनी आडनाव आले आहे. त्याचा "घळीसास" असा अपभ्रंशदेखील मिळतो[ संदर्भ हवा ]. या नंतर कशेळीतील कुलकर्ण्याचे दफ्तरात जामिनकीच्या कागदावर काही साक्षी आहेत, हा कागद शके १५२०/२२ च्या दरम्यानचा आहे[ संदर्भ हवा ]. त्यात भानजी गणपुला, सिवाभट रानडीया, गणो विठ्ठल पराणजप्या, गाव खडीकर व ढवळे ही नावे दिसतात. हे पाच जण फणशे आणि सेजवळकर या दोन कऱ्हाड्यांना २१५२/- रुपयांना जामीन राहिले होते. याचाच अर्थ या घटनेतील ३ चित्पावन हे सुस्थितित आणि समाजात मान असलेले होते[ संदर्भ हवा ].

या पेक्षा जुना उल्लेख चिपळूणच्या कुलकर्ण्याचा आहे, यावरून गावातले ’कुलकर्णीपद’ हे चित्पावन सांभाळत होते[ संदर्भ हवा ]. हे चित्पावन काळे नामक असून नरसीपंत काळे यांच्यापासून १४७० च्या सुमारास सुरू झालेली वंशावळ विनजी नरसी(१५००), पर्शराम विनजी(१५३०), काळो पर्शराम ते अंतो काळो(१५८०) इथपर्यंत मिळते. याचाच अर्थ शके १४७० किंवा त्या अगोदर पासूनच नरसीपंत काळे यांनी चिपळूणचे कुलकरणपद सांभाळले होते[ संदर्भ हवा ].

याच बरोबर पावस येथे जोश्यांच्या कागदपत्रात शके १५४० मधील कौलनाम्यात म्हंटले आहे - "पावसच्या जोश्य़ांचे जोसपण कदीम मिरास आहे." म्हणजे ते किमान २५०-३०० वर्षांपूर्वीचे असावे. याच जोश्यांच्या कागदपत्रात १५५० मधील खरेदीपत्रावर काही चित्पावनी नावे आहेत - विश्वनाथ भट, दादभट देसाई, बामनभट देसाई, बाल सोवनी सराफ, हरीभट अभैकर(अभ्यंकर), गणेसभट महाजनी. म्हणजे १५५० मध्ये गावातील सराफ, महाजन, देसाई हे चित्पावन होते. १५५६ मधील ह्याच जोश्यांच्या एका कागदावर खालील सह्या आहेत - हरभट अभैकर(अभ्यंकर), कानभट फडका, माद जोशी. म्हणजे १५५६ मध्ये चित्पावन गावच्या खोताचे काम करत असत, कारण हा कागद ’हजरमजालसीचा’ आहे.

राजापूर जवळ मीठगव्हाणे येथील त्या मीठगव्हाणाचे देसाईपण चित्पावनांकडे आहे. हा कागद १५५२ मधील आहे[ संदर्भ हवा ]. दंडाराजपुरी व श्रीवर्धन येथील’भटांच्या’ घराण्यातील देशमुखी अशीच पुरातन आहे. ती त्यांना १४०० च्या आसपास मिळाली असावी, असे पेशव्यांच्या नंतरच्या पत्रव्यवहारातून दिसून येतो[ संदर्भ हवा ]. तात्पर्य चित्पावन अगदीच ’धूमकेतू’ प्रमाणे प्रकट झाले अशातला भाग नक्कीच नाही. शिवछत्रपतींच्या हाताखाली देखील ’केळकर’ नामक बांधकामातील तज्‍ज्ञाचा उल्लेख मिळतो[ संदर्भ हवा ]. शिवाय ’मोकाशी’ नामक एका मनसबदाराची नोंद मिळते[ संदर्भ हवा ]. त्यांच्या वकील आणि दफ्तरी कामात देखील काही चित्पावनी नावे आहेत[ संदर्भ हवा ]. सिंधुदुर्गाचे भूमिपूजन ’अभ्यंकर’ नामक गुरुजींनी केल्याचा उल्लेख आहे[ संदर्भ हवा ]. याच बरोबर दिवे-आगार येथील ’बापट’ यांना जंजिऱ्याच्या सिद्दीने मनसब दिल्याचे समजते. आजही त्यांचे वंशज एकविसाव्या शतकातही स्वतःची वाडी आणि वाडा सांभाळत उत्तम संसार करत आहेत{{हे वाक्य काल निरपेक्ष कसे करता येईल ते पाहावे)[ संदर्भ हवा ]. म्हणजेच नेहमीच्या पंचा-पळी-पात्राच्या बरोबर चित्पावनांनी साधारण शके १२०० नंतर शिलाहार राजाच्या शेवटच्या काळात कुलकरण, जोसपण, खोती, महाजनकी, देशमुखी, सराफी व देसपांडेपण सांभाळत होते.

शिवकालात ज्या चित्पावनांचा उल्लेख मिळतो ते सुभेदार, तंत्रज्ञ, खोत, कुलकर्णी, देसाई असे आढळतात[ संदर्भ हवा ]. मात्र दरबारी ऊठबस करणाऱ्यात चित्पावन दिसत नाहीत[ संदर्भ हवा ]. या शिवाय नाशिक पैठण येथील ब्रह्मवृंदात देखील चित्पावनांचा उल्लेख क्वचितच आढळतो[ संदर्भ हवा ]. बाळाजी विश्वनाथापूर्वी वैद्यविलास, छंदोरत्नावली, कविकौस्तुभ इत्यादि ग्रंथ रचणाऱ्या चंपावतीच्या(चौल)रघुनाथ मनोहर नामक चित्पावनाचा उल्लेख मिळतो,हा रघुनाथ मनोहर शिवरायांच्या काळातला आहे[ संदर्भ हवा ].

बाळाजी विश्वनाथाच्या इतिहासापासून चित्पावनांच्या इतिहासाची ठळक नोंद मिळते.

’चित्पावनांचा’ भाग्योदय

१७०७पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले, अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले. इथूनच ’चित्पावनांचा’ भाग्योदय झाला.

ब्रिटिश काळ स्वातंत्र्य लढा आणि चित्पावन

१८५७च्या स्वातंत्र्यसमराची तयारी किमान ३-४ वर्षे आधीच चालू होती आणि आम्हाला याची कुणकुण मंगल पांडे यांच्या फाशीनंतरच आली असे खुद्द ब्रिटिशांनीच कबूल केले. म्हणजे यात किती सुसूत्रता होती हे समजेल. मात्र ३१ मे १८५७ ऎवजी १० मे १८५७ रोजीच ही आग भडकली. मंगल पांडे हा सैनिक या युद्धातील पहिला हुतात्मा ठरला. सुरुवातीला भारतीयांना मोठे विजय मिळत गेले, झाशीची राणी, तात्या टोपे, कुंवरसिंह यांनी अतुल पराक्रम केला. सर्वांनी बहादुरशहा यांस आपला नेता बनवले व दिल्लीच्या तख्तावर बसवले. मात्र हा उठाव नंतर विस्कळीत झाला. दुर्दैवाने हे स्वातंत्र्यसमर इंग्रजांनी अतिशय निर्दयपणे चिरडून टाकले. क्रांतिकारकांचे जथ्थेच्या जथ्थे फासावर जात होते, तोफेच्या तोंडी जात होते. झाशीच्या राणी सारखे धुरेचे वीर आणि वीरांगना धारातीर्थी पडल्या, या संपूर्ण उठावात पेशव्यांचे सेनापती असलेले आणि काल्पीचा किल्ला ज्यांनी सर केला ते तात्या टोपे पकडले गेले. इंग्रजांनी त्यांना फासावर दिले, बहादुरशहा काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठवण्यात आले. सगळीकडे परत अंधार पसरला. नानासाहेब कानपूर येथुन निसटून नेपाळ येथे गेले. पुढे नानासाहेब शेवट्पर्यंत भूमिगत राहून परत सगळ्याची जुळवाजुळव करत होते याचे अनेक पुरावे आज प्रकाशात आले आहे. मात्र त्यात फारसे यश आले नाही. नानासाहेबांचे स्वातंत्र्यसमरानंतरचे वास्तव्य नेपाळात कुठे होते ते परत भारतात येऊन गेले का, या बाबत इतिहास मूक आहे. मात्र नानासाहेब पेशवे अखेरपर्यंत अपराजित ठरले. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी जंग जंग पछाडले पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. या युद्धात नानासाहेबांचे बंधू बाबासाहेब आणि पुतणे रावसाहेब त्यांच्या मदतीस होते, त्याच बरोबर ग्वाल्हेरचे सरदार आपटे, ग्वाल्हेरचे प्रधान रावराजे दिनकरराव राजवाडे यांनी मदत केली. अगदी नानासाहेबांना सटकता यावे म्हणून तात्या टोप्यांचे सहकारी "श्री भागवत" यांनी स्वतःला नानासाहेब भासवून अटक करवून घेतले आणि फासावर गेले. परत जुळवाजुळव करताना एखादा प्रांत आपल्या ताब्यात असावा म्हणून नानांनी त्रयस्थाकडून वऱ्हाडात जागा घेण्याचा प्रतत्न देखील केला. पुढे १८८० मध्ये अण्णासाहेब पटवर्धनांनी असाच प्रयत्न केला होता. या सगळ्या उल्लेखांच्या मागचा उल्लेख १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात व नंतर चित्पावनांचा सहभाग लक्षात यावा.

स्वतंत्र्य लढ्यातील चित्पावनांचा जहाल दृष्टिकोण आणि सशस्त्र प्रतिकार

चित्पावनांचा सनदशीर मार्गाने राजकीय उद्योग चालू होताच, परंतु चित्पावनात 'जहाल दृष्टिकोण असलेले लोक पण बरेच होते त्यांचा सशस्त्र प्रतिकारावर अधिक विश्वास होता. चाफेकरबंधूंनी रॅन्डचा काटा काढला व नथुराम गोडसे हा बहुधा शेवटचा जहाल असावा.[१६]

वासुदेव बळवंत फडके

फारच निष्ठूरपणे १८५७चे स्वतंत्र्यसमर चिरडल्यावर इंग्रजांना वाटले की चला "वणवा" विझला. पण "वासुदेव बळवंत फडके" नावाचा अंगार धगधगू लागला. १८७६ मध्ये काही रामोशांना हाताशी घेऊन त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरू केले. फडक्यांना पकडून देणाऱ्यासाठी सरकारने बक्षीसे जाहीर केली, याला प्रत्युत्तर म्हणून या "आद्यक्रांतिकारकाने" इंग्रज अधिकाऱ्यांच्याच डोक्यावर दुपटीने बक्षीस लावल्यावर मात्र ब्रिटिश हादरले. दुर्दैवाने २७ जुलै १८७९ रोजी मेजर डॅनिअल याने देवरनावडगी येथे एका देवळात झोपलेल्या या नरकेसरीस अटक केले. त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून ’एडन’ येथील कारागृहात पाठवले. तिथेही ते तुरुंगातून निसटले, मात्र अनोळखी मुलूख, भाषा अनोळखी म्हणून ते लगेच पकडले गेले. १७ फेब्रुवारी १८८३ रोजी तुरुंगातच त्यांचे निधन झाले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

१८५७ च्या झळीने ब्रिटिश सावध झाले होते. दाबून ठेवलेला राग अशा भयानक स्वरुपात बाहेर येतो हे समजल्यावर मिस्टर ह्यूम यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना केली, आणि भारतीयांचा लोकशाही पद्धतीत प्रवेश झाला. इथे देखील राजकारणात चित्पावन तडफेने पुढे आले. अर्थात पहिले नाव "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक." बृहस्पतीनेही शिष्यत्व पत्करावे अशी अनेक नररत्ने चित्पावनांत जन्माला आली, त्या सगळ्यांचे हे मुकुटमणी ठरावेत इतकी प्रचंड आणि अलौकिक बुद्धिमत्ता टिळकांपाशी होती. यांनी केसरी वृत्तपत्राची स्थापना करून त्याचे संपादकपद सांभाळले, पत्रकारितेने काय घडवले जाऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. ’उजाडले पण सूर्य कुठे?, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे विचारून सरकारला वारंवार धारेवर धरून ताळ्यावर आणले. यांचा जनमानसावर इतका प्रभाव होता की टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली तेव्हा भारतातील पहिला संप मुंबईत घडून आला. टिळकांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, ब्रह्मदेशात रंगूनच्या उत्तरेस मंडालेत त्यांची रवानगी झाली. त्याकाळी कुठे पुण्यात काहीही घटना घडली की त्यास टिळक आणि कंपनी जबाबदार आहेत याची पूर्ण कल्पना इंग्रजांना असायची पण ते पुराव्यानिशी शाबीत करू शकत नसत. काहीबाही करून आरोप लावावेत तर भर कोर्टात "स्वराज्याच्या जन्मसिद्ध हक्काची" गर्जना व्हायची, म्हणजे परत सरकारचीच लक्तरे. त्यामुळे इंग्रज "लाल पगडीला" फारच वचकून राहू लागले. ह्या माणसाचे डोके कधी-कुठे चालेल याचा नेम नव्हता - इंग्रजांनी भारतीयांना संपूर्णपणे निशस्त्र करण्यासाठी फतवा काढला की "कोणीही कोणतेही विनापरवाना शस्त्र किंवा अगदी लाठी देखील जवळ बाळगू नये." लोकांना आपल्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली, सल्ल्यासाठी ते टिळकांकडे गेले त्यांनी विचार करून सांगितले - "शस्त्र नाही? लाठी देखील नाही? बरे, खाण्याच्या कोणत्या गोष्टीवर नाहीना आलिये बंदि? मग "ऊस" बाळागत जा! लाठीचे काम देखील होइल, कायदा देखील नाही अडवू शकणार!". यांच्या असामान्य बुद्धिमत्तेविषयी अजून एक उदाहरण म्हणाजे सुरुवातीला "गीतारहस्य" हा इंग्रजांनी तपासकामासाठी आपल्या ताब्यत घेतला नंतर त्यात आक्षेप घ्यावा असे काहीही न आढळल्याने ते हस्तलिखित परत करण्यात आले, तेव्हा त्यांना जवळच्या सहकाऱ्याने विचारले "तो त्यांनी जप्त केला असता तर?" त्यावर टिळक उत्तरले - "तर काय? सिंहगडावर २ महिने राहून जसाच्या तसा उतरवून काढला असता!"

चित्पावनांबद्दल तर इंग्रजात इतकी दहशत बसली होती की "चित्पावन" म्हणजे काहीतरी भयंकरच, अतिशय घातकी माणसे असे इंग्रज चित्पावनांचे वर्णन करत. कारण त्यांना माहीत होते की सहसा आपल्या खिशाला हात न लागू देणारी ही माणसे, देशासाठी मात्र गळ्याला फास लावून घेउ शकतात. एकाच घरातील ३ बंधूंनी बलिदान करायची परंपरा "चापेकरांनी" चालू केली व चापेकरांच्या बलिदानाने प्रभावित होऊन तीच परंपरा "मारता मारता मरेतो झुंजेन" या निश्चयाने सावरकर बंधूंनी चालू ठेवली. विश्वनाथ वैशंपायन उर्फ बच्चन हे भगतसिंगाचे महत्त्वाचे सहकारी होते. जॅक्सन वधाच्या केसमध्ये सुद्धा "मित्रमेळा" अथवा "अभिनव भारत" या संघटनेशी संबधित क्रांतिकारक - वि.दा.सावरकर, अनंत कान्हेरे, त्र्यंबक मराठे, गोपाळ पाटणकर, सोमण, केळकरशास्त्री, वामन जोशी, वैद्य, कर्वे, दांडेकर, गोरे, भट, केतकर, बाळ, वर्तक असेच होते. जॅक्सन खटल्याची सुरुवातच ’एक सोडून सर्व ब्राह्मण असलेले आरोपी’ अशीच आहे. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी शाहू छत्रपतींनी स्टॅन्ले एजरली यांना पत्र लिहून ’नाशिक, कोल्हापूर बेळगाव व पुणे जिल्ह्यातील ब्राह्मणांच्या दृष्टिकोनाची परीणती भयानक हिंसक कृत्यात होईल,’ असा धोक्याचा इशारा दिला होता. ब्राह्मणेतर कटवाला आढळला तर त्याचे नावीन्य फार होते! असे शेरेहि काहींनी मारले आहेत. या घटनांमुळे इंग्रजांच्या पायाखालची जमीन सरकली. १८५७ मध्ये नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधू, मग वासुदेव बळवंत फडके, मागोमाग चापेकर बंधू ही अशी मारुतीची शेपूट वाढतच होती आणि इंग्रजांच्या लंकेला ती जाळत सुटली होती. एक वेळ वहाबी मुस्लिम परवडले पण हे पुणेरी चित्पावन नकोत. आणि या सगळ्यांचे प्रेरणास्रोत "टिळक".

आधीच ब्राह्मण, त्यात पुणेकर, त्यातहि कोकणस्थासी धरा। यांनी गोरा ठार मारिला कोणाला तरी कैद करा॥

असे एक पद इंग्रजांच्या तोंडी घालून मित्रमेळ्यात गाजले होते.

इंग्रजांनी या पुणेरी चित्पावनांचा धसका घेतला होता. १८८२ मधील मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल "men & events of my times in India" या आपल्या ग्रंथात लिहितो - "ते आपल्याकडून नवनवीन विषय शिकतील, ते आत्मसात करतील आणि तरीहि स्वतःची वैयक्तिकता टिकवतील. सार्वजनिक सभा नावाचा हा गट दांभिक असेलही पण निश्चित्पणे अभिनव आहे."

बामफिल्ड फुलर हे पूर्व बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर होते "Studies in Indian life & sentiments" या पुस्तकात ते म्हणतात - "एका शतकापूर्वी आपण मराठा मंडळींच्या चलनवलनाचे चैतन्य होतो हे विसरू शकत नसलेले पश्चिम किनारपट्टीवरील ब्राह्मणच या शत्रुत्वाचे खरे पुरोहित आहेत."

रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी "The aweaking of India" मध्ये लिहिले आहे "आपण याची आठवण ठेवली पाहिजे की, मराठि ब्राह्मणांमध्ये त्यांच्या सत्तेचा विनाश होऊन शतकहि उलटले नसल्याची तीव्र भावना अद्यापही वसत आहे. त्यांनी जिंकलेल्या लढाया आद्याप त्यांच्या स्मरणात ताज्या आहेत आणि प्रत्येक डोंगरावरून वाकुल्या दाखवणारे त्यांचे किल्ले या आठवणी हिरव्यागार ठेवत आहेत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवाद हा अन्य कोणत्याही गटापेक्षा अधिक व्यक्तिगत आणि अधिक कडवट आहे."

मराठ्यांचे साम्राज्य तर ’चित्पावन साम्राज्य होते असे नमूद करून व्हॅलेंटाइन चिरोलनी ’Indian unrest' मध्ये चित्पावनांबद्दल म्हणतात - "नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचा फायदा करून घेण्यात ते तत्पर आहेत. नाना फडणवीसांच्या काळाप्रमाणे आजही दक्षिणेतील प्रत्येक सरकारी कचेरीत चित्पावनांनीच गर्दी केली आहे. ते न्यायासनांवर बसतात, वकील मंडळींत त्यांचेच वर्चस्व, शाळांत शिक्षक तेच, एतद्देशीय पत्रसृष्टीवर नियंत्रण ठेवतात. पश्चिम भारतातील आधुनिक नाटक आणि साहित्य त्याचप्रमाणे राजकारणात तळपणारी नावे त्यांनीच पुरवली आहेत."

टिळकांच्या लोकमान्यतेचा प्रत्यय १९०८ च्या खटल्यात पुरेपूर आला. "राजद्रोही" तो "लोकमान्य" आणि "राजमान्य" तो "लोकद्रोही" असा समज तेव्हा रूढ झाला. आणि "राजद्रोह्यांमध्ये" बहुसंख्य अर्थातच चित्पावनच होते.

संपूर्ण चित्पावनांची परंपरा बघितल्यास "लोकमान्य, असंतोषाचे जनक, आद्यक्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर, हिंदुहृदयसम्राट" अशी बिरुदे वागवणाऱ्यांची नावे मिळतील, त्याच बरोबर "महर्षी, न्यायमूर्ती, शिक्षणमहर्षी, आचार्य, भारताचार्य, इतिहासाचार्य" अशी समाजिक आब राखणारी नावे देखील मिळतील. चित्पावनांनी खरोखर चहूबाजूंनी शरादपि-शापादपि करून दाखवली आहे. अगदी राजकारण-समाजकारण-साहित्य यात एकहाती चळवळ चालवणारे वीर सावरकर हे तर याचे सर्वोत्तम उदाहरण ठरावेत. अगदी फाळणीला त्यांनी कडाडून केलेला विरोध किंवा अस्पृश्यमुक्ती चळवळ आणि वेळोवेळी शस्त्र सामर्थ्याचा केलेला गौरव हा समस्त जनांना माहीत आहेच.

चित्पावनांचा राजकारण सहभाग


बहुसंख्य चित्पावन हे हिंदुत्वाचे अभिमानी व राष्ट्रीय मनोवृत्तीचे असतात. विशेष असा की, पुरोगामित्वातही ते मागे नाहीत. गांधीवादी, समाजवादी आणि साम्यवादी चित्पावन नेते कितीतरी होऊन गेले, अद्याप आहेत.' चित्पावनांमध्ये हिंदुत्ववादी जास्त आहेत हे अगदी खरे आहे. पण हिंदुत्ववादी संघटनांमध्ये 'संघ परिवार' मोठा आहे व या संघटनेत अनेक चित्पावन आहेत. पण माझे निरीक्षण असे आहे की, या परिवारात चित्पावनांना नेतृत्व दिले जात नाही. या परिवारात देशस्थ अथवा कऱ्हाडे यांना नेतृत्व दिले जाते. उदाहरण म्हणजे, महाराष्ट्रत प्रमोद महाजन, पुण्यात प्रकाश जावडेकर व माजी खासदार अण्णा जोशी व नागपूर विदर्भात नितीन गडकरी, पण दुर्दैवाने संघ- परिवारातील चित्पावनांना आपण डावलले जातो व आपल्याला जास्त पुढे येऊ दिले जात नाही, हे राजकारण लक्षातच येत नाही!

[१७]

चित्पावनांचा समाजकारण सहभाग

सामाजिक चळवळीत देखील चित्पावन नेहमीच पुढे राहिले आहेत. गणेशोत्सव आणि शिवजयंती ह्या दोन चळवळी चालू करणाऱ्या टिळकांचे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. भाषणबंदी, रोटीबंदी सारख्या बेड्यांनी जखडलेल्या समाजाला जागे करण्याचे काम सावरकरांनी रत्नागिरीत राहून केले. जात्योच्छेदनाची चळवळ सावरकरांनी मोठ्या दणक्यात चालवली होती. शिवाय आगरकर, लोकहितवादींनी केलेले समाजकार्य कौतुकास्पद आहे. राष्ट्रसेविका लक्ष्मीबाई केळकर हे देखील स्त्री-सबलीकरणाचे उत्तम उदाहरण आहे, ज्या काळात स्त्रिया सहसा बाहेर पडत नसत त्या काळात त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली "राष्ट्रसेविका मंच" स्थापन केला. आज १०,००० पेक्षा जास्त स्त्रिया या संस्थेचा डोलारा सांभाळत आहे.

आमरावतीजवळ तपोवन येथे प्रख्यात समाजसेवी डॉ. शिवाजीराव पटवर्धन या चित्पावन ब्राह्मणाने कुष्ठरोग्यांसाठी एक आश्रम काढला होता.[१८] महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळीला पुण्यातील चित्पावन भिडेशास्त्री यांनी सर्वतोपरी मदत केली. पुढे लोकमान्य टिळकांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला त्यांनी आंतरशाखीय विवाहाचे समर्थन केले.

आगरकर आणि गोखले रानडे

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाजकारण

चित्पावन स्वातंत्र्य उत्तरकाल विसावे शतक

चित्पावन स्वातंत्र्य उत्तरकाल एकविसावे शतक

चित्पावनांची आडनावे

आडनावांच्या निर्मिती बद्दल माहिती या विभागात लिहावी .चित्पावन आडनावांची यादी येथे स्थानांतरित केली आहे.

चित्पावनांच्या संस्था आणि उपक्रम

प्रसिद्ध चित्पावन

सत्पुरुष स्वामी स्वरूपानंद, मामा दांडेकर, दासगणू महाराज, केळकर महाराज, प्रल्हाद महाराज काळे, केवलानंद सरस्वती, पांडुरंगशास्त्री आठवले, नारायण दीक्षित ते अगदी विनोबा भावे शंकर अभ्यंकर ,

राजवाडे , गंगाधर गाडगीळ, य.दि. फडके, वि.ग. कानिटकर.

पत्रकार द्वारकानाथ लेले, अरविंद गोखले, कुमार केतकर, श्रीकांत परांजपे, मिलिंद गाडगीळ, वैजयंती आपटे, राही भिडे

समाजसुधारकांत लोकहितवादी(गोपाळ हरी देशमुख), गोपाळ गणेश आगरकर, र. धों कर्वे, देहदान चळवळ चालवणारे सोहोनी, साने गुरुजी, वीर सावरकर

भारतरत्न मिळवणारे महर्षी कर्वे, महोपाध्याय काणे आणि आचार्य विनोबा भावे

[१९]

इरावती कर्वे,

माधुरी दिक्षित

चित्पावनांचे आंतरधर्मीय/जातीय/शाखीय/भाषीय/प्रांतीय विवाह

लोकमान्य टिळकांचे १९०० सालातील 'कोकणस्थ, देशस्थ व कऱ्हाडे' या मथळ्याचे केसरीतील दोन अग्रलेख आहेत. यात लोकमान्यांनी कोकणस्थ, देशस्थ व कऱ्हाडे यांनी आपापसात विवाह करावेत, असे स्पष्टपणे लिहिले आहे. लोकमान्य टिळकांनी साली दैनिक केसरीत अग्रलेख लिहून देशस्थ,कऱ्हाडे आणि कोकणस्थांना आंतरशाखीय विवाह करावेत असे सुचवले.[२०] नवीन पिढीत अशा आंतरधर्मीय/जातीय/शाखीय/भाषीय/प्रांतीय विवाहांमुळे काळाला अनुसरून चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला जातो.

चित्पावनांचे काही प्रसिद्ध बिगरचित्पावन जावई त्यापैकी काही -

शंतनुराव किर्लोस्कर, ग. दि. माडगुळकर, प्रा. राम शेवाळकर, रत्नाकर मतकरी, खासदार प्रकाश आंबेडकर, प्रा. डॉ. अ. रा. कुळकर्णी, इ.[२१]

चित्पावनांच्या काही प्रसिद्ध बिगरचित्पावन स्नुषा मृणाल गोरेपुष्पा भावे

चित्पावनांचे आपापसातील वाद विवाद आक्षेप

जातीचा अहंगंड ‘चित्पावन ब्राह्मण जन्मजात बुद्धिमान असतात,‘ यासारख्या वाक्यातून दिसून येई[२२]

चित्पावन हे स्वांतत्र्यपूर्व ब्राम्हणेतर चळवळीचे खास लक्ष्य असे. वेदोक्त प्रकरणानंतर त्यांची भूमिका विशेषत्वाने टीकेचे लक्ष्य बनली. तसेच शासकीय नौकऱ्यातील त्यांचे वर्चस्व हा विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत टीकेचा विषय असे. ....... अधिक जाणून घ्याया म्हणीनुसार "नव्याने ब्राह्मण समाजात आलेले अधिक आक्रमक असतात". कोकणस्थ ब्राह्मण किंवा ज्यांना चित्पावन म्हटले जाते त्यांच्या आक्रमकपणामुळे ब्राह्मणद्वेष वाढला असावा.[२३]

कोकणस्थ देशस्थ ब्राम्हणांवर "देशस्थ आणि गैरशिस्त" अशी टीका करतात तर देशस्थ कोकणस्थांच्या काटकसरीला व आतिथ्यात हात आखडता घेण्यास नावे ठेवतात.[२४]

चित्पावनांवरील शेजवलकरांची टिप्पणी

"या महाराष्ट्रातील चित्पावनद्वेषी जे लोक आहे त्यांच्यात जोवर एखादा राजवाडे, एखादा वासुदेव शास्त्री खरे, एखादा टिळक, एखादा आगरकर, फार काय एखादा दत्तोपंत आपटेही निर्माण होत नाही, तोवर त्यांनी कितीही दात चावले, कितीही निंदा केली, कितीही दोष दाखविले, किंवा कितीही बोटे मोडली तरी त्यामुळे चित्पावनांचे काहीही वाकडे होण्याचा संभव नाही. कावळ्यांच्या शापांचा किंवा म्हातारीच्या हात चोळण्याचा जेवढा परिणाम होण्याचा संभव तेवढाच तसाच उपयोग अशा वृथा जळफळाटांचा आहे. चित्पावनांचे खरे यश रावबहादुरे, प्रोफेसरे, किंवा मोटारवाले हवेल्यावाले किंवा बडे नोकरीवाले यांनी वाढवलेले नाही. त्यांची पैदास इतर जातीतही भरपूर आहे. चित्पावनांचे यश त्यांच्या त्यागाच्या पराकाष्ठेत, एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवण्याच्या चिकातीत, एकांतिक अढळ निष्ठेत, अविश्रांत उद्योगात, व सुखलालसेच्या विन्मुखतेत आहे. जोवर या गुणांची योग्यता जगात मोठी मानली जात आहे तोंवर त्यांचे यश चिरंजीव आहे."[२५]

संदर्भ

  1. ^ http://www.dainikgomantak.com/Gomantak/03092009/NT000844EA.htm गूगल् कॅश आहे. 11 Mar 2009 05:42:30 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  2. ^ ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल
  3. ^ Oroon K. Ghosh. The changing Indian civilization: a perspective on India.
  4. ^ http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtrian-Konkanastha-Brahmins २७ मे २००९ ११.१५ सकाळी संदर्भाकरिता वापरले त्याप्रमाणे
  5. ^ इंग्रजी विकिपीडियातील chitpavan लेख दिनांक २७ मे २००९ ला भाषांतरित
  6. ^ http://web.archive.org/web/20071227160923/http://www.chitpavans.in/marathi/gotra.htm तारीख २६/५/२००९ १६.५० वाजता घेतेलेला आंतरजालीय संदर्भ
  7. ^ http://www.karmarkarfoundationmumbai.org/karmarkar/html/Kulach6.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Kolaba/population_brahmans.html#1
  9. ^ chitpavans in 'bombay gazetteer' - by Dr. anghavi (Maharashtra State Gazetteer, Maharashtra land & its people page 53-54)
  10. ^ ही Google च्या http://dharm.webduniaportals.co.in/2008/01/18/1200635640000.html ची कॅश आहे. 11 May 2009 18:46:54 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल. अधिक जाणून घ्या
  11. ^ ही Google च्या http://www.marathiworld.com/portal/?q=sanskruti/sanvar/sanvar7.htm ची कॅच आहे. 11 May 2009 18:35:34 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल.
  12. ^ Chitpavani dialect is found in Gazetteer of the Bombay Presidency- Ratnagiri and Sawantwadi Districts, which has been published in 1880.
  13. ^ (taken from From Ratnagiri Gazetteer published in 1880).
  14. ^ 'कोकण आणि कोकणस्थ' हे चिंतामणराव वैद्य यांनी लिहिलेले आहे.
  15. ^ ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल.
  16. ^ लिन्दा कॉकस या अमेरिकेतील विद्यर्थिनीने 'चित्पावन' या विषयावर एक प्रबंध पूर्ण केला आहे. २२ फेब्रुवारी १९७० च्या 'द इलस्टरेटेड वीकली ऑफ इंडिया'त तिचा एक लेख प्रकाशित झाला होता. त्याचा स्वैर अनुवाद आम्ही चित्पावन Author: म. श्री. दीक्षित Publisher: नीलकंठ प्रकाशन पुस्तकावरून.
  17. ^ आम्ही चित्पावन 'चित्पावन समाज दर्शन' या शीर्षकाचे प्रकरण Author: म. श्री. दीक्षीत Publisher: नीलकंठ प्रकाशन
  18. ^ ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  19. ^ Google's cache of http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2007_11_01_archive.html. It is a snapshot of the page as it appeared on 3 Jan 2010 04:42:11 GMT.
  20. ^ आम्ही चित्पावन Author: म. श्री. दीक्षीतPublisher: नीलकंठ प्रकाशन
  21. ^ आम्ही चित्पावन Author: म. श्री. दीक्षित Publisher: नीलकंठ प्रकाशन
  22. ^ ही Google च्या http://www.loksatta.com/daily/20050124/ch02.htm ची कॅश आहे. 7 Apr 2009 03:34:30 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल ’समानतेत स्त्रीवादही अनुस्यूत’-वासंती दामले लोकसत्ता चतुरंग शनिवार, २२ जानेवारी २००५
  23. ^ ही Google च्या http://mr.upakram.org/node/1781 ची कॅश आहे. 19 May 2009 22:07:40 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल. अधिक जाणून घ्या
  24. ^ ही Google च्या http://mr.upakram.org/node/1781 ची कॅश आहे. 19 May 2009 22:07:40 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल.
  25. ^ पानिपत १७६१ चे अभ्यासू लेखक श्री शेजवलकर यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चित्पावनांबाबत पुढील टिप्पणी केलीये -

इंग्रजी विकिपीडियात वापरले गेलेले संदर्भ

Londhe also found in "Malvi Sonar" In Vidharbha and Madhya Pradesh

नोंदी

by grant duff. a popular writer of history of Maratha. he wrote book "History of the Maharattas" in 1927 in England.

he wrote:- "Independant of two Maharatta division of Concanist & Deshist, there are in the Maharatta country eight classess of brahmins,who differs from each other in some of their usage, & present, to those accustomed to observe them, preceptible differences both of character & appearance."

  • वरच्या वाक्यातील "Concanist" (कोकणस्थ)या शब्दासाठी डफने पुढील तळटीप दिली आहे.

"The Peshwas who attained sovereign authority in the Maharatta Nation, were of this class......They are termed Chitpawan. Of all the Brahmins with whome I am acquainted, the Concanists are the most sensible & intelligent."

by 'Mr. Candy' रघुनाथराव परांजप्यांच्या अभिनंदनार्थ भरलेल्या मुंबई विद्यापीठाच्या एका सभेत बोलताना माजी न्यायाधीश आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु 'Mr. Candy' म्हणाले :- "There never has been any question as to an Indian being perfectly equal to an Englishman in intellect.....Indeed i should say that a Konkan brahman in acuteness of intellect is superior to the average Englishman.

बाह्य दुवे