अनुवंशशास्त्र
Jump to navigation
Jump to search
अनुवंशशास्त्र वंश सातत्याचा अभ्यास करणारी एक स्वतंत्र विज्ञानशाखा आहे. या शाखेचा विकास अठराव्या शतकानंतर झाला. चार्ल्स डार्विनयांच्या नैसर्गिक निवडीचे तत्त्व या संकल्पनेचे स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नात अनुवंशशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र यांचा विकास झाला असेही मानण्यात येते.
शास्त्रज्ञ[संपादन]
खालील शास्त्रज्ञांनी अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम शोधून काढले.
या सर्वांनी चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे तपासण्यासाठी वनस्पतींच्या लागवडी करून प्रयोग केले. त्यातूनच अनुवंशशास्त्र ही स्वतंत्र विज्ञानशाखा अस्तित्वात आली असे मानले जाते.
काही महत्त्वाचे विचार[संपादन]
- या याच संशोधनाची पुढील पायरी म्हणजे पेशीकेंद्रातील धाग्यांसारखे घटक हे आनुवंशिक गुणधर्म पुढं नेण्यास जबाबदार आहेत असा विचार मांडला गेला.
- या धाग्यांच्या जोड्या फुटतात व जुळतात.
- प्रत्येक प्राणिजातीमध्ये या धाग्यांची संख्या ठरावीक असते आणि ती कुठल्याही त्या जातीच्या प्राण्यात बदलत नाही.
- या धाग्यांचे मूलभूत घटक म्हणजे डी.एन.ए. यांची संरचना स्पष्ट झाली.
- आनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत कसे जातात हे डी.एन.ए. संरचनेमुळे स्पष्ट झाले.
जीन[संपादन]
पेशी केंद्रकातील गुणधर्मवाहकांना म्हणजे डीएनए रेणूंच्या गुच्छाला किंवा पुंजक्याला "जीन' म्हंटले जाते.