अपरांत (संस्था)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काही उत्साही पुणेकर चित्पावन मंडळींनी सुरू केलेला हा एक उपक्रम आहे. ही सर्व मंडळी प्रथम पुण्यामधे नळ स्टॉप जवळ भेटायची परंतु नंतर सदस्यसंख्या जशी वाढू लागली तशी ही मंडळी 'स्वीकार' या खाद्यगृहात भेटू लागली. एप्रिल २००३नंतर ही मंडळी पुण्यातल्या लाॅकाॅलेज रोडवरील डी-मेक सभागृह येथे दर रविवारी सकाळी १० वाजता भेटू लागली. दर रविवारी साधरणत: ३०-३५ सभासद या साप्ताहिक भेटींना उपस्थिती लावतात.

बऱ्याच चर्चेतून मग शेवटी 'अपरांत' हे नाव मान्य करण्यात आले. ह्या शब्दाचा अर्थ असा आहे - अपर = पश्चिम + अंत = शेवट म्हणजेच कोकण भूमी! ही स्वयंसेवी संस्था चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण मंडळींनी सुरू केलेली आहे .

अपरांत ह्या नावाने ऑर्कुट ह्या संकेतस्थळावर एक कम्युनिटीसुद्धा चालविली जाते. सद्यस्थितीमध्ये यामध्ये एकूण ७५० च्या आसपास सदस्य आहेत. पुण्याप्रमाणेच मुंबईमध्येही काही ठिकाणी अश्या प्रकारे काही संस्था चालवल्या जातात. अपरांत काही वेळेला पुणे चित्पावन संघाबरोबर काही उपक्रमांमध्ये भाग घेते. त्याचप्रमाणे 'याहू' या संकेतस्थळावरील अशाच समविचारी सभासदांसह ते काही उपक्रम राबवतात.

उपक्रम[संपादन]

शिष्यवृत्ती[संपादन]

कोकणातल्या होतकरू परंतु घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यात अडचणी येत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. अशा शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय आणि त्यांना अर्धवेळ नोकरीची संधी उपलब्ध करून देणे. यासाठी मुंबईतील एका सभासदाने विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह सुरू केले आहे. याच धर्तीवर 'अपरांत'चा गरजू विद्यार्थ्यांकरीता पुणे व मुंबई येथे वसतिगृह सुरू करण्याचा मानस आहे.

अपरांतच्या सभासदांसाठीही हेच काम केले जाते.

सामाजिक जबाबदारी[संपादन]

सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पूर अथवा इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये आर्थिक आणि वस्तु स्वरूपात मदत करणे. २००५ साली पश्चिम महराष्ट्रातल्या पूरपरीस्थितीच्या संकटामधे अपरांतच्या सभासदांनी कोकणातल्या काही गावांमधे कपडे, अन्नपदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली होती. त्याचप्रमाणे पूर ओसरल्यानंतरही पुस्तके आणि आर्थिक स्वरूपात मदत पोचविली. यासाठी गावपातळीवर काम करण्याऱ्या स्वंयसेवी संस्थांची मदत घेण्यात आली होती.

अमित्रजीत[संपादन]

संस्था 'अमित्रजीत' नावाचे एक त्रैमासिक चालवते. संस्थेच्या सभासदांच्या लेखनकौशल्याला वाव देणे आणि त्यांना त्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देणे हा त्यामागील उद्देश आहे.

दीपरंजनी[संपादन]

संस्था दरवर्षी दिवाळी आसपास दीपरंजनी नावाचा कार्यक्रम आयोजित करते.

पहा : ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था

संकेतस्थळ[संपादन]