राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, information list | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
प्रायोजक |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट हि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. चित्रपटांसाठी सादर केलेल्या पुरस्कारांपैकी हा एक गोल्डन लोटलस (स्वर्ण कमल) पुरस्कार आहे. हा पुरस्कार देशभरात, सर्व भारतीय भाषांमध्ये वर्षभरात तयार होणार्या चित्रपटांसाठी जाहीर केला जातो. २०१७ला या पुरस्कारात स्वर्ण कमल, प्रमाणपत्र आणि २,५०,००० रुपयाचे रोख पारितोषिकाचा समावेश होता. चित्रपटाच्या निर्माता व दिग्दर्शक यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले. २०१८ पर्यंत हा पुरस्कार वैशिष्ट्यीकृत चित्रपटासाठी सादर केलेल्या सहा स्वर्ण कमल पुरस्कारांपैकी एक आहे. पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा भारताचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समावेश होतो. केवळ कोणत्याही भारतीय भाषेमध्ये बनविलेले चित्रपट आणि मूक चित्रपट जे एकतर ३५मि.मी. वर वाइड गेज किंवा डिजिटल स्वरुपात शूट केले गेले असले पाहिके परंतु चित्रपट किंवा व्हिडिओ / डिजिटल स्वरूपात प्रदर्शित झाले आहेत आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने प्रमाणित केले असले पाहिजे.
उद्घाटन पुरस्कार हे "ऑल इंडिया बेस्ट फीचर फिल्मसाठी प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल" म्हणून प्रसिद्ध झाले आणि प्रल्हाद केशव अत्रे निर्मित आणि दिग्दर्शित श्यामची आई या मराठी चित्रपटाला देण्यात आला. हा पांडुरंग सदाशिव साने यांच्या मराठी कादंबरी, श्यामची आई, या वर आधारित आहे. २०१६ पर्यंत, सहासष्ठ चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला आहे. १९७८ मध्ये चित्रपटसृष्टीतील चेतन आनंद यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाने ऐंशी चित्रपटांची छाननी केली असली तरी या श्रेणीत कोणताही पुरस्कार देण्यात आला नव्हता. २०११ मध्ये दोन चित्रपटांनी पुरस्कार सामायिक केला; मराठी चित्रपट देऊळ आणि ब्यारी चित्रपट ब्यारी.
सत्यजित रे हे सर्वाधिक सन्मानित दिग्दर्शक आहे जिथे त्याच्या सहा चित्रपटांनी हा पुरस्कार जिंकला आहे. आदि शंकराचार्य (१९८३), संस्कृत भाषेत बनलेला पहिला चित्रपट,[१] आणि ब्यारी भाषेत बनलेला पहिला चित्रपट ब्यारी (२०११) यांनीही हा पुरस्कार जिंकला आहे.
विजेते[संपादन]
पुरस्कार प्राप्त चित्रपटविजेते खालील प्रमाणे आहेत.
संदर्भ[संपादन]
- ^ Somaaya, Bhawana (8 December 2016). Once Upon a Time in India: A Century of Indian Cinema. Random House Publishers India Pvt. Limited. p. 232. ISBN 978-93-85990-40-3.
- ^ ५४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द हिंदू, जून ११, २००८.