कोर्ट (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोर्ट हा २०१७ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी घवघवीत यश संपादन केले त्यातही चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला.

न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले. हा चित्रपट १७ एप्रिल २०१५ ला प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटविणाऱ्या ‘कोर्ट’ या चित्रपटाने नंतर ‘आॅस्कर’चा उंबरठा गाठला. ‘आॅस्कर’ पुरस्कारासाठी भारतातर्फे या चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली. आॅस्करच्या ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या विभागासाठी ‘कोर्ट’ निवडला गेला होता .

या घटनेमुळे मायमराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला . या चित्रपटाचे चैतन्य ताम्हाणे या युवा दिग्दर्शकाने लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. विवेक गोम्बर या युवा निर्मात्याने निर्मिती केली असून, यात महत्त्वाची भूमिकाही साकारली आहे. आतापर्यंत कधीही कॅमेऱ्यासमोर न आलेले चळवळीतील कार्यकर्ते वीरा साथीदार यांनी यात प्रमुख भूमिका रंगवली आहे. गीतांजली कुलकर्णी या अभिनेत्रीचीही महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे. शाहीर संभाजी भगत यांनी यासाठी गीते लिहिली असून, त्यांनी चित्रपटाला संगीतही दिले आहे. नावाजलेले कलावंत नसतानाही आॅस्करमधील एन्ट्रीपर्यंत या चित्रपटाने गाठलेली उंची महत्त्वाची आहे.

  • कोर्ट’ या चित्रपटात एका लोककलाकाराचा प्रवास रेखाटला आहे. कार्यकर्त्याचे आयुष्य आणि लोककला यांची सांगड या चित्रपटात घातली आहे. एका कार्यकर्त्यावर त्याच्या ध्यानीमनी नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ येते. या अनुषंगाने या चित्रपटात भाष्य केले आहे. चित्रपट पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारा चित्रपट म्हणूनही ‘कोर्ट’चे नाव कोरले आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी ‘कोर्ट’च्या पूर्वी केवळ एक लघुपट आणि एक माहितीपट केला आहे. त्यांचे हे चित्रपट दिग्दर्शनातले पहिले पाऊल आहे. कोर्ट हा मराठी सिनेमा २०१६ मध्ये पॅरिस, फ्रांस येथेही प्रदर्शित करण्यात आला. मराठीच सिनेमा पण फ्रेंच तळटीपांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि पॅरिस मधील चित्रपट जाणकारांनी याला भरघोस प्रतिसाद दिला. सिनेमा माध्यमाला स्वतःची भाषा आहे. या भाषेचा चपखल उपयोग चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’मध्ये केला गेलाय, त्यामुळेच ‘कोर्ट’ची जागतिक स्तरावर स्तुती झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कोर्ट’ची दखल घेतली गेली. समीक्षक व चोखंदळ प्रेक्षकांनी ‘कोर्ट’ची वाहवा केली आहे. आणि भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असण्याचा सन्मानही त्याला मिळाला. आपल्या इथल्या सर्वसामान्य प्रेक्षकाला मात्र सिनेमाच्या या भाषेचा सराव झालेला नाही. त्यामुळेच खर्‍या अर्थाने सिनेमा असणार्‍या ‘कोर्ट’ला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
  • जे प्रसंग आपल्याला पडद्यावर दिसतात ते मुंबईत घडतात. यातील काही प्रमुख पात्रं मराठी आहेत व मराठी भाषा बोलतात, म्हणून त्याला मराठी सिनेमा म्हणायचं. अन्यथा ‘कोर्ट’ हा संवादाच्या पलीकडे जाणारा दृश्यात्मक आविष्कार आहे. या दृश्यप्रतिमांतून दिग्दर्शक केवळ भारतीय न्याय व्यवस्थेचं अस्सल स्वरूपच दाखवीत नाही, तर त्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या व त्यात अभावितपणे गुंतलेल्या माणसांच्या रोजच्या व्यवहाराचा व मानसिकतेचा वेध घेतो. त्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त असलेल्या सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक स्तराचं दर्शनही घडवतो.
  • दृश्यातून दिग्दर्शकाला जे अभिप्रेत आहे ते केवळ संवादातून नव्हे, तर तपशिलातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. अर्थात हे तपशील टिपण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. त्यासाठीच संभाजी भगतांच्या दोन गीतांपलीकडे या चित्रपटात पार्श्वसंगीत नाही. नैसर्गिक ध्वनीचा सुयोग्य वापर केल्यामुळे प्रत्येक प्रसंग ठसठशीतपणा घेऊन उभा राहतो. कोर्टाचे नियम, केसचे निकाल बरेचदा हास्यास्पद असतात, याचा प्रत्ययदेखील छोट्या छोट्या प्रसंगातून दिला गेलाय.

भारतीय चित्रपटांतून आजवर असंख्य वेळा न्यायालय व तिथे चालणारे खटले, यांचं अतिरंजित चित्रण आपण पाहिलंय. ‘ऑर्डर ऑर्डर’, ‘मिलॉर्ड, मैं गीता पे हाथ रख के कसम खाता हूॅं’, ‘तारीख पे तारीख’ असे संवाद आपल्याला अतिपरिचित झालेले आहेत. टोकाचे भ्रष्ट किंवा सत्शील वृत्तीचे न्यायाधीश आणि वकील यांच्या प्रतिमा भारतीय चित्रपटांनी आपल्या मनावर बिंबवल्या आहेत. ‘कोर्ट’मध्ये न्यायाधीश, वकील, आरोपी, साक्षीदार आणि न्यायालयीन कामकाज सर्वकाही आणि त्यापलीकडचं बरंच काही आहे. पण आपण चित्रपटाच्या माध्यमातून ते पाहिलेलं नाही. आणि हेच ‘कोर्ट’चं प्रमुख वैशिष्ट्य आहे.