बळवंत पांडुरंग किर्लोस्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बलवंत पांडुरंग किर्लोस्कर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जन्म बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
मार्च ३१, १८४३
गुर्लहोसूर, धारवाड जिल्हा, कर्नाटक
मृत्यू नोव्हेंबर २, १८८५
गुर्लहोसूर, धारवाड जिल्हा, कर्नाटक
इतर नावे अण्णासाहेब किर्लोस्कर
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र नाटक
भाषा मराठी, कानडी
प्रमुख नाटके संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र, संगीत रामराज्यवियोग

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर (मार्च ३१, १८४३ - नोव्हेंबर २, १८८५) मराठी भाषेतील पहिले संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक होते.

जीवन[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

मराठी भाषेतील पहिले संगीत नाटक "संगीत शाकुंतल" लिहून अण्णासाहेबांनी १८८० साली संगीत नाटकांची परंपरा सुरू केली. त्या नाटकात जवळपास १९८ पदे होती.

पुरस्कार[संपादन]

किर्लोस्करांच्या नावाने महाराष्ट्र सरकारतर्फे संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आजवर फैय्याज, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, कीर्ती शिलेदार, रजनी जोशी, चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर, निर्मला गोगटे आणि विनायक थोरात यांना प्रदान झाला आहे.

कार्य[संपादन]

अण्णासाहेब किर्लोस्करांनी एकूण पाच नाटके लिहिली. ती अशी :

नाटक प्रकार साल
अल्लाउद्दिनाची चितुरगडावरील स्वारी एकांकिका, अपूर्ण फार्स १८७३
शांकर दिग्विजय गद्य नाटक १८७३
संगीत शांकुतल कालिदासकृत 'अभिज्ञान शांकुंतलम' चे भाषांतर १८८०
संगीत सौभद्र सात अंकी संगीत नाटक १८७३
संगीत रामराज्यवियोग तीन अंकी - अपूर्ण संगीत नाटक १८८४, १८८८

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]