पठाणकोट जिल्हा
Appearance
पठाणकोट जिल्हा ਪਠਾਣਕੋਟ ਜ਼ਿਲ੍ਹਾ | |
पंजाब राज्यातील जिल्हा | |
पंजाब मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | पंजाब |
मुख्यालय | पठाणकोट |
तालुके | २ |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ९२९ चौरस किमी (३५९ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ६,२६,१५४ (२०११) |
-लोकसंख्या घनता | ६७० प्रति चौरस किमी (१,७०० /चौ. मैल) |
-लिंग गुणोत्तर | ८५८ ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | गुरदासपुर |
संकेतस्थळ |
पठाणकोट जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २७ जुलै २०११ रोजी गुरदासपुर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. पठाणकोट जिल्हा पंजाबच्या उत्तर भागात हिमालयाच्या पायथ्याशी वसला असून त्याच्या उत्तरेस जम्मू आणि काश्मीर तर पूर्वेस हिमाचल प्रदेश ही राज्ये आहेत. बियास व रावी ह्या पठाणकोट जिल्ह्यामधून वाहणाऱ्या दोन प्रमुख नद्या आहेत. उत्तर भारताचे प्रवेशद्वार मानले जाणाऱ्या पठाणकोटमधून राष्ट्रीय महामार्ग १ ए व राष्ट्रीय महामार्ग १५ हे दोन प्रमुख महामार्ग जातात तसेच दिल्ली-जम्मू लोहमार्ग देखील येथूनच धावतो.
२०११ साली पठाणकोट जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ६.२६ लाख होती.
बाह्य दुवे
[संपादन]