दालन:तमिळनाडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

__असंपादनक्षम__

 तमिळनाडु

TamilEmblem.JPG
India Tamil Nadu locator map.svg

"तमिळनाडु" (लिहिण्याची पद्धत) तमिळनाड् (स्थानिक उच्चार) (तमिळः தமிழ்நாடு) अर्थ: "तमिळ लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे.चेन्नै (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडु भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ ,वायव्येला कर्नाटक,दक्षिणेस हिंदी महासागरश्रीलंका,पूर्वेस बंगालचा उपसागर,तसेच केंद्रशासित प्रदेश पॉन्डिचरी (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्रप्रदेश अशा त्याच्या चतु:सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा,अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वेघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून हिंदी महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणार्‍या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडुचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. तमिळनाडु हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये(१०.५६ टक्के)असणारे राज्य म्हणून तमिळनाडुचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात.सर्वांगीण विकासात तमिळनाडु हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते.

संक्षिप्त सूची

तमिळ भाषा••तमिळ लिपी••तमिळ लोक••तमिळ दिनदर्शिका••तमिळ अन्नपदार्थ••तमिळ साहित्य••तमिळ सिनेमा

 विशेष लेख

मदुरै/किंवा स्थानिक भाषेत अनेकदा कूडल(कूडलनगर)ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. [तमिळःமதுரை इतर उच्चार : मदुराय] भारताच्या तामीळनाडू राज्यातील एक शहर आहे,तसेच मदुरै हे नगर भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले नगर म्हणुन देखील ओळखले जाते. मदुरै हे अत्यंत ऐतीहासिक आणि प्राचीन नगर असून ते वैगै ह्या नदीच्या काठी वसले आहे.मदुरै ला देउळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते,तसेच ते तमिळनाड राज्याची सांस्कृतीक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणुनही प्रसिद्ध आहे तसेच मल्लीगै मानगर(मोगरा(फुल) महानगर),तूंग महानगर (जागृत मानगर ),पुर्वेकडील अथेन्स (Athens of the East)अशा नावांनी मदुरैची ओळख आहे. हे महानगर मदुरै जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असून तमिळनाडुतील ते तीसरे मोठे महानगर आहे.मदुरै शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे.मदुरै महानगरात प्रामुख्याने तमिळ भाषा बोलली जाते तसेच येथील तमिळ भाषेला विशेष महत्व आहे.मदुरै ची तमिळ हि कोन्ग तमिळ,नेल्लै तमिळ,रामनाड तमिळ आणि चेन्नै तमिळ ह्या बोलींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपुर्ण आहे.इथल्या तमिळ बोलीला सर्वसाधारणपणे संपुर्ण राज्यात उत्कृष्ट असे प्रमाण मानण्यात आले आहे.तमिळ सोबतच इंग्रजी,तेलुगू,सौराष्ट्रउर्दु काही प्रमाणात बोलल्या जातात.परंतु इतर सर्वच भाषांमध्ये तमिळ शब्दांचा प्रभाव दिसुन येतो.

मीनाट्चीअम्मन कोविल/कोईल (मिनाक्षी आईचे देऊळ)
 • मीनाट्चीअम्मन कोविल/कोईल (मिनाक्षी आईचे देऊळ) भगवान शंकर(सुंदरेश्वर) व पार्वती (मिनाक्षी) देवीचे हे एक सुरेख असे धार्मिक स्थळ असून ते मिनाक्षी देवीच्या नावाने ओळखले जाते. मदुरै नगराची रचना हि प्रामुख्याने मिनाक्षी देवीच्या देवळाच्या आजुबाजूस विस्तारीत आहे,पुर्वी संपुर्ण नगराच्या मध्यस्थानी मिनाक्षी सुंदरेश्वराचे देऊळ दिसत असे.मिनाक्षी सुंदरेश्वराचे हे गोपुरम (एकुण १४ गोपुर) शैलीतील असे स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेले देऊळ आहे.हे देशातील प्रमुख शक्तीपिठांपैकी एक आहे. हे १६व्या शतकातील बांधकाम असून त्याचे क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मीटर इतके आहे.हजार खांबाचा मंडप हे इथल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.

मदुरैनगराच्या केंद्रस्थानी असणारे हे भगवान विष्णुंचे एक अतिशय सुंदर देऊळ आहे.इथे विष्णु "अळगर"(अर्थ:सुंदर असा) ह्या नावाने ओळखले जातात.हे विष्णुच्या १०८ दिव्यदेशम अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे.हे देऊळ देखील अतिशय प्राचीन असून हजारो भक्तगणांची इथे नेहमीच रेलचेल असते.

 तमिळनाडुतील जिल्हे

तमिळनाडूमधील जिल्हे

तमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांची नावे खाली यादीस्वरूपात दिली आहेत ज्यांचे क्रमांक उजवीकडील चित्रात त्यात्या जिल्ह्याचे ठिकाण दर्शवितात.

 1. अरियालूर
 2. चेन्नै
 3. कोईमतूर
 4. कडलूर
 5. धर्मपूरी
 6. दिण्डुक्कल
 7. ईरोडु
 8. कांचीपूरम
 9. कन्याकुमारी
 10. करूर
 11. कृष्णगिरी
 12. मदुरै
 13. नागपट्टिनम
 14. नामक्कल
 15. निलगिरी
 16. पेरंबळूर
 1. पुदुकोट्टै
 2. रामनादपूरम
 3. सेलम
 4. शिवगंगै
 5. तंजावुर
 6. तेनी
 7. तूतकुडी
 8. तिरूचिरापल्ली
 9. तिरूनेलवेली
 10. तिरूपूर
 11. तिरूवल्लूर
 12. तिरूवन्नमालै
 13. तिरूवरूवर
 14. वेल्लूर
 15. विलुप्पुरम
 16. विरूध नगर

साचा:तमिळनाडु

 विशेष दुवे