दलित वाङ्मय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

दलित वाङ्मयाचा उदय १९६० नंतर झाला. चीड आणि बंड ही चळवळीची दोन प्रमुख वैशिष्टये होती.


हिंदु समाज व्यवस्थेमध्ये माणसाला माणूस म्हणून स्थान न देता, त्यांच्यात अमानुष अशी विषमता निर्माण करून ठेवली आहे. 'दलितत्व' हे या विषमतेचे अपत्य आहे. त्यांच्यावर या विषमतावादी समाजव्यवस्थेने पिढ्यांपिढ्या अन्याय केला. तेव्हा या अत्याचाराला विरोध करण्यासाठी शब्द आणि साहित्यकलेला शस्त्र बनविले आहे. म्हणून दलित साहित्यिकांची जबाबदारी प्रकट करताना अण्णाभाऊ साठे यांनी सांगितले आहे, "आम्ही दलित साहित्यिकांनी दलितांना वास्तव जगण्याच्या सर्व जुलुमातून मुक्त करणारे साहित्य निर्माण केले पाहिजे.


शत्रुंवर मात करण्यासाठी आयुधापेक्षा विचार व्यक्त करून समाजमनावर बिंबवणारे शब्दबळ हे फार मोठे शस्त्र आहे. ही इतिहासाची साक्ष असून डॉ. बाबासाहेबांनीदेखील रक्तपातविरहित समाज परिवर्तनासाठी शब्दशास्त्रांचाच वापर करुन, आपल्या तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्यावर भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणले. अण्णाभाऊ साठे यांनी त्याच शब्दसामर्थ्याची जाणीव ठेवून समाजप्रबोधनासाठी लेखनमाध्यम उपयुक्त असल्याचे दलित साहित्यिकांना सांगितले. त्याचप्रमाणे स्वतःही लेखन केले. कथेच्या बाबतीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

दलित लेखनाचे प्रकार[संपादन]

आत्मकथन[संपादन]

मराठीमध्ये दलित आत्मकथने हा प्रकार इ.स.१९६० नंतरच्या काळात मराठीत विशेष लोकप्रिय झालेला असून दलित साहित्यालाच नव्हे तर मराठी साहित्याला समृद्ध केलेले आहे. आत्मकथनांमुळे मराठी साहित्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे. बलुतं- दया पवार, आठवणींचे पक्षी- प्र.ई. सोनकांबळे, उपरा- लक्ष्मण माने, मुक्काम पोष्ट देवाचे गोठणे- माधव कोंडविलकर, जिणं आमुचं- बेबी कांबळे, मला उध्वस्त व्हायचंय- मल्लिका अमरशेख, माझ्या जल्माची चित्तरकथा-शांताबाई कांबळे, उचल्या- लक्ष्मण गायकवाड, कोल्हाट्याचं पोर- किशोर शांताबाई काळे, अक्करमाशी- शरणकुमार निंबाळे, बेरड- भिमराव गस्ती, काट्यावरची पोटं- उत्तम बंडू तुपे, आमचा बा आन् मी- नरेंद्र जाधव, अंत:स्फोट- कुमुद पावडे, तराळ अंतराळ - शंकरराव खरात, ढोर - भगवान इंगळे ही मराठीतील काही गाजलेली दलित आत्मकथने आहेत.

                                                                                          -वासुदेव

कथा[संपादन]

कादंबऱ्या[संपादन]

नाटके[संपादन]

वैचारीक लेख[संपादन]

नाटके[संपादन]

 • सन १९८२मध्ये पहिला दलित नाट्यमहोत्सव.


संदर्भ पुस्तके[संपादन]

 • समकालिन दलित कथा : एक अभ्यास - डॉ. मनोहर सुरवाडे.