Jump to content

बलुतं (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बलुतं या पानावरून पुनर्निर्देशित)

बलुतं (१९७८) हे दया पवार (दगडू मारुती पवार) यांचे आत्मकथन आहे. या कलाकृतीचे महत्त्व म्हणजे ते मराठी भाषेतील पहिले प्रकाशित दलित आत्मचरित्र आहे. या आत्मकथनाच्या माध्यमातून भारतीय समाजातील तळागाळातील दुर्लक्षित घटकाच्या अस्तित्त्वाची जाणीव होते. अशा प्रकारच्या आत्मकथनांतून सामाजिक इतिहासाचे वास्तव दर्शन होण्यास मदत होते. पु. ल. देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे स्वतःच्याच विश्वात मग्न असणाऱ्यांसाठी हे आत्मकथन म्हणजे एकप्रकारचा आरसाच आहे. फार काळापासुन भारतीय समाज हा जात, वर्ग व लिंगभेदाने बरबटलेला असून त्यात भांडवलशाहिने जणू भरच टाकलीय; अशा काळात मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणं सामान्य माणसासाठी अगदी दुरापास्त होऊन बसले आहे. ह्या सगळ्या खटाटोपींध्ये आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांचा सामना करावा लागतो याचं यथार्थ चित्रण बलुतंमधून बघायला मिळतं. बलुतं हे आत्मचरित्र दया पवार याचे आहे. हे मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्र आहे. दलित समाजातील हळूहळू होणारे बदल तसेच मुंबई शहर बद्दलची माहिती देखील आलेली आहे.


त्याचबरोबर मराठी भाषेच्या दडलेल्या प्रकाराची जाणीवसुद्धा बलुतं मधुन होते.