रामोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेरड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

रामोशी ही महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील एक जात आहे. शिवाजी महाराजांच्या राजवटीत अनेक गड किल्ल्यांची जबाबदारी या समाजाकडे होती. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेच्या यशाचा मानकरी बहिर्जी नाईक या जातीतील होता. विश्वासू, प्रामाणिक आणि शूर म्हणून या जमातीची इतिहासात नोंद आढळते. उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम या जमातीनेच इंग्रज राजवटीविरुद्ध बंड केल्याची नोंद आहे. भारतात फाशी दिले गेलेले उमाजी नाईक हे आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. ही जमात कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणात बेरड अथवा बेडर, तलवार, नायका किंवा नाईक नावानेही ओळखली जाते. दक्षिणेतील मध्युयगीन काळातील विजयनगर साम्राज्यातील नायका राजा या जमातीतीलच होता. महाराष्ट्रात रामोशी, बेरड अथवा बेडर जमातीचे प्राबल्य प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आढळते.

        रामोशी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळत

असले तरी " ही कानडी-बेरडांची शाखा असावी.हे लोक आपल्याला रामवंशी म्हणवितात. त्यावरुन त्यांचे 'रामोशी' असे जातीनाम बनले असावे. हे लोक स्वत:ला क्षत्रिय समजतात." (संदर्भ- भारतीय संस्कृती कोश- खंड- ८, पान क्र.११९ ) रामोशी शरीराने , बळकट, आणि उंचे-पुरे, बांधेसुद व राकट असे असतात.त्यांचा वर्ण काळा असतो (काहीं अपवाद ) "ते कानात कर्णफुले घालत. " निजामाच्या प्रदेशातील शोरापुरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत.आपल्या नावापुढे ते ' नाईक' असे नमाभिधान लावतात. पुणे प्रांतात रामोशामध्ये चव्हाण आणि जाधव अशा दोन आडना्वे हमखास आढ- ळतात. ( संदर्भ- आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास-१८१८- १९६०, डॉ. दिनेश मोरे, के.एस. पब्ली. २०१८ आ.द्वितीय- पान क्र.१२८ )

   दरोडे घालणे ,चो-या करणे इ. त्यांचे एकेकाळी प्रमुख व्यवसाय ठरले होते. परंतु तरीही सर्वच रामोशी दरोडे घालत नसत.अनेकजन शेती करणे,पशुपालन करणे ,किल्ल्यांचा बंदोबस्त करणे, वाड्यावर पहारेक-या

चे काम , वगैरे कामे करीत असत. बाँम्बे प्रेसिडेंसीच्या गँझिटियरमध्ये नमूद आहे की " त्यांच्या शूरपणामुळे व विश्वासू स्वभावामुळे काही किल्ल्याच्या बंदोबस्ताचे काम त्यांच्याकडे सोपविण्याची पद्धत असे.ठराविक गावांचा महसुल गोळा करण्याचा त्यांना अधिकार असे. (संदर्भ- Gazetted of the Bombay Presidency- -Vol - Xvii- Part-lll , Poona 1885- pp. 37)

        रामोशी जातीचा इतिहास खरेतर लढाऊ

बाण्याचाच आहे.शिवकाळात बहिर्जी नाईक मोठ्या आणि महत्वाच्या पदावर होता.पेशवाईत मात्र त्यांची दयनिय अवस्था झाली " दुस-या बाजीराव् पेशव्याने रामोशी लोंकाची वतने, सनदा,,ईनामे, हलक, जमिनी जप्त करुन टाकल्या होत्या. त्यामुळे....त्यांनी या परिसरात धुमाकुळ घालायला सुरुवात केली. शेवटी ऊमाजी नाईकाने (१७९१- १८३४ ) सर्व रामोशी जमातीची समजुत काढून त्यांचा धुमाकूळ बंद कर - ण्यास बाध्य केले ( संदर्भ- स्वातंत्र्य संग्रामातील समिधा- -मांडे प्रमोद मारोती- प्रफुल्ल प्रका. पुणे , आ.प्रथम , १९९८- पान- २,३ ) परंतु इतक्या सहजासहजी रामोशी शांत झाले नाहीत. पेशव्यांना त्यांची वतने,जमिनी काही प्रमाणात परत कराव्याच लागल्या.पुढे " इंग्रजी राजवटीत त्यांना कामावरून कमी करण्यात आले व त्यांची इनामेही जप्त करण्यात आली त्यामुळे हे लोक दरोडे घालू लागले." ( संदर्भ- महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास- -१८१८-१९६०, डाँ दिनेश मोरे, के. एस. पब्ली.२०१८, आ.द्वितीय, पान क्र.१२८)

  आद्यक्रांतिकारी-उमाजी नाईक :- –------------------------------------------

पुरंदर मधील "भिवंडी "गावात इ.स.१७९१मध्ये उमाजी यांचा जन्म झाला.त्यांचे वडील दादाजी प्रसिध्द 'दरोडेखोर ' होते असे संदर्भ आहेत.मँकिटाँश यांच्या मते "दादाजीने अनेक दरोडे घातले...सदाशिव आठवले लिहीतात की, उमाजी आकरा वर्षाचा असतांनाच दादाजी मरण पावला त्यामुळे पित्याकडून उमाजीला या संबधाने फारसे काही शिक्षण मिळाले असेल किवां त्यांचा काही विशेष प्रभाव पुत्रावर पडलेलाअसेल असे दिसत नाही. ( संदर्भ- आठवले सदाशिव, उमाजीराजे मुक्कम पोस्ट डोंगर- पान १७ )

    उमाजी वडीलांच्या काळापासुनच पुरंदर किल्ल्या-

च्या बंदोबस्तात होता. रामोशी लोक त्यावेळी नोकरी सांभाळून डाके टाकीत असत.प्रस्थापित व्यवस्थेला धक्के देण्याची ती तत्कालीन पद्धत असावी. भोर जवळील 'विंग' या गावात इ.स.१८१८साली दरोडा टाकीत असतांना उमाजी प्रथमच पकडला गेला. त्याला तुरूंगात टाकले. शिक्षा भोगत असतानाच उमाजीने आक्षर ओळख करुन घेतली.(संदर्भ- आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास १८१८- १९६०,डॉ. दिनेश मोरे , के. एस. पब्ली.औ. बाद, आ.२०१८ - पान १२९ )

       उमाजीच्या आगोदर 'संतु नाईक रामोशाच्या'

पुढारपणाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता. संतुच्या नेतृत्वाखालीउमाजी व त्याचा भाऊ आम्रूता याने भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला.ही उमाजीच्या दहशतीची पहीलीच चुणूक होती. " संतु नाईकाच्या-

मरणानंतर सर्व रामोशी जमातचे पुढारपण उमाजीकडे

चालून आले.( संदर्भ- मांडे प्र. मा. पुर्वोक्त - पान ३ )

      अगदी याच वर्षी उमाजीनेसात दरोडे आणि

आठ वाटमा-या घडवुन आणल्या.अनेक धनिकांना लुटले. त्यातुन पटवर्धन आणि निंबाळकरांसारखे सरदारही सुटले नाहीत. अखेर इंग्रजांनी उमाजीच्या विरुद्ध (१८२६)साली पहीला जाहिरनामा काढला. त्यामध्ये उमाजी व त्याचा साथीदार पांडूजी यांना धरुन देणा-यास १०० रुपयाचे बक्षिस जाहीर केले परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही.म्हणुन इंग्रजांनी असा निष्कर्ष काढला की,लोक उमाजीच्या बाजूने आहेत त्याला मदत करतात.इंग्रजांनी दुसरा जाहिरनामा काढला आणि त्यात म्हटले की "जे कोणी दरोडेखोराना साथ देतीलत्यांना ठार केले जाईल. " परंतु या देखील घोषणेचा उपयोग झाला नाही.उलट रामोशांच्या कारवाया वाढतच गेल्या.

  "  इ.स.१८२६ सालापासून इंग्रजा विरुद्ध पूणे जिल्ह्यात रामोशी लढू लागले. "(संदर्भ- विसाव्या शतकातील महाराष्ट्र, खंड १, पान २२) जेजुरी,परिंचे,

सासवड,भिवरी, किकवी या भागात उमाजीने प्रचंड लुटालूट करुनसरकारला जेरीस आणले. आता उमाजी रामोशाला पकडल्या शिवाय कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणारच नाही अशी जाणीव झाल्यावरच इंग्रज सरकारने विशेष घोडदळ तयार करून मोक्याच्या ठिकाणी चौक्या बसविल्या.परंतु फायदा झाला नाही. ( संदर्भ- डॉ. दिनेश मोरे -पूर्वोक्त- पान क्र.१२९ )

       उमाजीला सरकारच्या हालचालीची खडानखडा माहिती मिळत असे.इंग्रजांनी ओळखले की 

उमाजीला गावातील प्रतिष्ठित लोकांचा पाठिंबा असलाच पाहिजे. एका अहवालात इंग्रज अधिका-याने लिहिले होते की " वाई व पुणे येथील ब्राम्हण लोक उमाजीला अनुकूल असल्याचे दिसतात. भोरच्या पंत सचिवाचे आणि उमाजीचे वैर असूनही सचिवाचा कारभारी 'दामाजी' हा उमाजीला अनुकूल आहे,आणि भोर येथील सर्व बातम्या सांगतो. "(सदर्भ:- डॉ. दिनेश मोरे - उपरोक्त , पान क्र.१३०) उमाजी रामोशांच्या आडून पुण्याचे ब्राम्हण लोक पेशवाईच्या पुनरूज्जीवनाचे स्वप्न पहात आहेत, अशी शंका इंग्रजांना आल्यास नवल नव्हते. कारण इ.स १८७५ मध्ये डॉ. जाँन विल्सन यांनी एक विधान केले होते की " महाराष्ट्रात ब्राह्मणाचे राज्य प्रस्थापित व्हावे अशी महाराष्ट्रातील ब्राह्मणाची फार दिवसाची महत्वकाक्षां- आहे "(संदर्भ:- एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना, वाळींबे वि. स. - पान क्र.९०)

     पुण्याचा कलेक्टर राँबर्टसन रामोशांच्या उठावा

संबधाने मुबंई गव्हर्नरला लिहितो की " युरोपियना विषयी असंतोष, तिरस्कार उत्पन्न करणे व नंतर त्यांना देशातून घालवून देण्यासमदत करणे असा या लोकांचा मानस दिसतो. पुण्यातील लोक ऊघड बोलतात की 'कुठे आहे इंग्रजाचे राज्य? समरांगणावर ते लढतीत, पण रामोशांच्या पुढे त्यांचा निभाव लागणार नाही. कुणी सांगांव उद्या हा उम्याच शिवाजी सारखा बंडखोर होउन पुन्हा मराठी राज्य चालू करणार नाही कशावरुन ? देवाच्या मनात असेल तर काय होणार नाही."(संदर्भ;- महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे -खोबरेकर वि. गो.-पान ४३)

   तिस-या जाहीरनाम्यात उमाजीला इंग्रजांनी " दरोडे-

-खोर "असा शब्द वापरला नाही तर " बंडवाला "असे म्हटले.उमाजीच्या कार्याचा उद्देश आता त्यांच्या लक्षात आला होता .कँ. मँकिटाँश म्हणतो " उमाजी हा काही भटक्या वा दरोडेखोर नव्हे, त्याच्यापुढे शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी प्रमाणेच आपणही मोठे व्हावे राज्य कमवावे अशी त्याची जिद्द होती."(संदर्भ:- कथा स्वातंत्र्यांची - पान क्र. २) उमाजीने स्वत:ला "राजे " म्हणवुन घेण्यास सुरुवात केली होती. कुठल्या तरी डोंगर कपारीत लोक जमत,तोच त्यांचा दरबार असे. गोर-गरिबांना दक्षिणा देणे, दान देणे असे कृत्य तो करु लागला. विशेष म्हणजे त्याच्या सोबत परदेशी, कुणबी, मुसलमान व इतर जातीतले लोक असत. (संदर्भ:-डॉ. दिनेश मोरे, पुर्वोक्त पान. क्र १३०)


  -

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.