ढोर समाज
Appearance
(ढोर या पानावरून पुनर्निर्देशित)
ढोर (इतर नावे : डोहर, कक्कय्या) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात या समाजाची संख्या ९०,२२६ होती. ढोर हे प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि राजस्थान राज्यांमध्ये आढळतात. लिंगायत समाजातील हे समाजबांधव ढोर, डोहर, आणि कक्कय्या अशा नावाने ओळखले जातात.
ढोर समाज हा प्रामुख्याने कातडी कमावणे हा व्यवसाय करतात. पण शिक्षणामुळे हा समाज खूप प्रगत झाला आहे. भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे हे या समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |