प्रज्ञा पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रज्ञा दया पवार (जन्म ११ फेब्रुवारी, १९६६), प्रज्ञा लोखंडे नावाने सुरुवातीचे लेखन, ह्या मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहेत. त्या पाक्षिक 'परिवर्तनाचा वाटसरू'च्या संपादक आहेत. त्या महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या सदस्या आहेत. मराठी साहित्यिक दया पवार हे त्यांचे वडील होत. अलीकडेच त्यांनी (म्हणजे कुणी?) देशातील असहिष्णुता आणि तिरस्काराच्या वाढत्या वातावरणाचा निषेध म्हणून त्यांचे साहित्य पुरस्कार राज्य सरकारला परत केले.

प्रज्ञा पवार यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • अंतःस्थ (कवितासंग्रह, १९९३, २००४)
 • अफवा खरी ठरावी म्हणून (कथासंग्रह) (२०१०)
 • अर्वाचीन आरण (संमिश्र गद्यलेख, २०२०)
 • आरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता) (२००९, २०१०)
 • उत्कट जीवघेण्या धगीवर (कवितासंग्रह,२००२)
 • केंद्र आणि परीघ (संग्रहित ललित सदरलेखन, २००४)
 • टेहलटिकोरी (संग्रहित ललित सदरलेखन, २०१६)
 • दिशा - महाविद्यालयीन कवी - कवयित्रींच्या कविता (२००७)
 • दृश्यांचा ढोबळ समुद्र (कवितासंग्रह) (२०१३)
 • धादांत खैरलांजी (नाटक, २००७)
 • मी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे - नामदेव ढसाळ यांची निवडक कविता (२००७)
 • मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा (कवितासंग्रह, २००७)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

प्रज्ञा दया पवार यांना मिळालेले सन्मान :

 • मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
 • बिरसा मुंडा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
 • महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार
 • शांता शेळके पुरस्कार
 • महाराष्ट्र राज्याचे केशवसुत पुरस्कार, बालकवी पुरस्कार, इंदिरा संत विशेष पुरस्कार आणि ग.ल. ठोकळ विशेष पुरस्कार.
 • बोधिवर्धन पुरस्कार
 • वनिता समाज गौरव पुरस्कार
 • औरंगाबाद येथे आयोजित गुणिजन संमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)
 • पाटण (सातारा जिल्हा) येथे आयोजित विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१५)
 • लातूर येथे आयोजित अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१७)
 • विरार (पालघर जिल्हा) येथे आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०२०)