खापरी मेट्रो स्थानक
खापरी मेट्रो स्थानक खापरी मेट्रो स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता |
वर्धा रोड, खापरी रेल्वे स्थानकाजवळ, नागपूर भारत |
गुणक | 21°02′58″N 79°02′52″E / 21.049325°N 79.047742°E |
फलाट | २ |
मार्गिका | केशरी |
वाहनतळ | नाही |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | महामेट्रो |
आधीचे नाव | - |
स्थान | |
|
नागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण) |
---|
. |
खापरी मेट्रो स्थानक हे नागपूरच्या खापरी भागात नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[१] मेट्रो स्थानक आहे. या स्थानकाचे उदघाटन ८ मार्च २०१९ मध्ये झाले. हे स्थानक खापरी रेल्वे स्थानकाशी व वर्धा मार्गाशी पादचारी भूमिगत मार्गाने जोडले जाईल .नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (आता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) द्वारे जुलै २०१६ मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर लीझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएलएफएस)ला स्टेशन तयार करण्यासाठी करार देण्यात आला.[२] स्टेशनच्या बाह्य संरचनेची बांधकाम नोव्हेंबर २०१७ पर्यंत पूर्ण झाले आणि त्याच महिन्यात अंतर्गत काम सुरू झाले.[३][४] इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने स्टेशनला प्लॅटिनम रेटिंग (पर्यावरणीय प्रभावास कमी करणारी टिकाऊ बांधकाम पद्धतींसाठी सर्वोच्च रेटिंग) देऊन सन्मानित केले.हे स्थानक मूळतः उत्तर-दक्षिण (केशरी ) मार्गिकेचे दक्षिणेकडील टर्मिनस म्हणून प्रस्तावित करण्यात आले. मात्र २२ नोव्हेंबर २०१७ रोजी महामेट्रोने ३ किमीच्या दक्षिणेकडील विस्ताराची घोषणा केली ज्याने दोन नवीन स्टेशन - इकोपर्क आणि मेट्रो सिटी जोडले. मेट्रो सिटी नंतरचे दक्षिणी टर्मिनस बनले.[५]
रचना [संपादन]
या स्थानकाची रचना मुंबईतील व्हिक्टोरियन शैलीतल्या बांद्रा उपनगरीय रेल्वे स्थानकावर आधारित आहे .[६] बांद्रा स्थानकाप्रमाणेच खापरी स्थानकावर टेराकोटा टाईल, पांढऱ्या रंगाचे स्टील ट्रेस आणि घड्याळाचे टॉवर असलेले लाल छप्पर आहे. या इमारतीच्या छपरावर लागलेल्या सौर पॅनेल्स द्वारे ह्या स्थानकाची सुमारे ६५% वीजेची आवश्यकता पूर्ण होते.[७] नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र आणि भारत संस्कृतीचे चित्र, मुर्त्या आणि इतर कलांनी स्टेशनचे आतल्या भाग सुशोभित केले आहेत. या स्थानकात दुकाने आणि रेस्टॉरंट्स देखील आहेत जे एकूण १५००० स्क्वेअर फूटच्या व्यावसायिक जागेचा उपयोग करतात. इथे पार्किंगची सुविधा आहे ज्यामध्ये ३० कार आणि १०० दुचाकी वाहनांसाठी जागा उपलब्ध आहे.
संदर्भ[संपादन]
- ^ "नागपूर मेट्रोचा नकाशा".
- ^ https://www.metrorailnews.in/nagpur-metro-construction-of-10-metro-rail-stations-to-start-in-a-week/. Missing or empty
|title=
(सहाय्य)हरवलेले किंवा मोकळे|title=
(सहाय्य) - ^ https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/3-metro-stations-to-be-completed-this-month/articleshow/61426833.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य)हरवलेले किंवा मोकळे|title=
(सहाय्य) - ^ https://www.nagpurtoday.in/khapri-airport-metro-stations-to-be-completed-by-this-month/11021048. Missing or empty
|title=
(सहाय्य)हरवलेले किंवा मोकळे|title=
(सहाय्य) - ^ https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/2-new-stations-added-as-metro-goes-beyond-khapri/articleshow/61759241.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य)हरवलेले किंवा मोकळे|title=
(सहाय्य) - ^ http://themetrorailguy.com/2016/01/30/nmrcl-unveils-new-airport-khapri-stations-designs/. Missing or empty
|title=
(सहाय्य)हरवलेले किंवा मोकळे|title=
(सहाय्य) - ^ https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/get-ready-green-metro-stations-coming/articleshow/63837232.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य)हरवलेले किंवा मोकळे|title=
(सहाय्य)