सांवर
| सांवर |
|---|
|
|
सांवर किंवा काटेसांवर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा ज्येष्ठा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. हे एक मोठे झाड असूनही याचे खोडास काटे असतात. हे काटे जनावरांच्या पाठ घासण्यापासून वाचण्यासाठी असावेत. झाडाचे खोड बघून असे वाटते की यापासून चांगले लाकूड मिळू शकेल. परंतु, याचे लाकूड फारच नरम असते.
वर्णन
[संपादन]सांवर बॉम्बॅक्स कुळातील इतर झाडांप्रमाणेच,कापसाचे झाड म्हणूनच ओळखले जाते. या झाडाचे खोड सरळ व उंच असते.५ पाकळ्यांची लाल फुले लागणारे हे झाड आहे. हिवाळ्यात याची पाने गळतात व वसंत ऋतूमध्ये नव्या पालवीपूर्वी याला आधी फुले येतात, व नंतर फळे. पिकलेल्या फळांमध्ये कापसासारखे तंतू असतात.
- साताऱ्यातील सावरीचे फूल
लागवड
[संपादन]हे झाड मलाया देशात लावले जाते. इंडोनेशिया, दक्षिणचीन, हाँगकाँग व तैवान इत्यादी ठिकाणी हे आढळते. भारतात बंगालमध्ये आणि हिंदी भाषा भागात याला सेमल म्हणून ओळखतात. याच्या सुंदर दिसणाऱ्या फुलांमुळे हे अनेक ठिकाणी लावतात. हा वृक्ष ६० मीटर उंचीपर्यंतसुद्धा वाढू शकतो.
वापर
[संपादन]यातून निघणारा कापूस हा साध्या कापसास पर्याय म्हणून वापरता येतो. तो अत्यंत मऊ असतो. या झाडापासून काडेपेट्या तयार केल्या जातात. या झाडाचे संस्कृत नाव "शाल्मली" आहे. ऋग्वेदात, (ऋग्वेद-१०.८५.२०) यापासून रथ बनवीत असत असा उल्लेख आहे.
औषधी उपयोग
[संपादन]काटे सावरचे प्रमुख औषधी उपयोगत्वचेच्या समस्या, पचनाचे विकार, रक्त शुद्धीकरण आणि उष्णता, स्त्रियांच्या समस्या, संधिवात आणि हाडांचे आरोग्य, सर्दी आणि खोकला, पुरुषांचे आरोग्य याप्रमाणे आहेत.[१][२][३][४][५][६]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "काटेसावरची फुलं आठवतात का? जी खाल्ल्याने आरोग्याला मिळतात आश्चर्यकारक फायदे". २०२३-०४-०२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०३-०१ रोजी पाहिले.
- ↑ "Uses of Bombax ceiba L." nif.org.in (इंग्रजी भाषेत). २०२६-०३-०१ रोजी पाहिले.
- ↑ "What are the Health Benefits of Salmalia Malabarica (Silk Cotton Tree)?". planetayurveda.com (इंग्रजी भाषेत). २०२६-०३-०१ रोजी पाहिले.
- ↑ "Semal Tree benefits- Red Cotton Tree benefits". arogyayogaschool.com (इंग्रजी भाषेत). २०२६-०३-०१ रोजी पाहिले.
- ↑ "फुलांच्या विश्वात: काटेसावर". लोकसत्ता. २०२६-०३-०१ रोजी पाहिले.
- ↑ "Indian Silk Tree : काटेसावर - पचन संस्था, कांजिण्यावर उपयोगी". agrowon. २०२६-०३-०१ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत



