आयुर्वेदातील विविध संज्ञा
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन-
- अग्निदीपक - भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
- अनुपान - औषधसेवनास सहाय्यीभूत पदार्थ, तरल पदार्थ अथवा दुसरे औषध.
- अपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
- अवलेह - साखरेचा गुळाचा पातळ पाक.
- आसव/अरिष्ट -
- कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
- काढा - काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे.
- कुपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
- केश्य - केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध.
- चूर्ण - सुकलेल्या वनस्पती कुटून मग त्या गाळून तयार झालेला बारीक वस्त्रगाळ पदार्थ.
- ज्वरघ्न - तापाचे हनन करणारे पदार्थ किंवा औषध.
- दाहकारक -आतड्यात / पोटात जळजळ उत्पन्न करणारे, मसालेदार, तिखट पदार्थ अथवा औषध.
- पथ्य - शरीरास/आरोग्यास हितकारक
- प्राणिज - प्राण्याच्या अवयवापासून अथवा दूध, अस्थी, मूत्र, मल इत्यादींपासून उत्पन्न झालेले किंवा उत्पादित केलेले.
- पित्तशामक - वाढलेले पित्त कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
- पित्तहारक - शरीरात पित्त वाढले असता ते कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
- फांट - घटकद्रव्याच्या वजनाच्या चौपट पाणी घालून चांगले उकळवून तयार केलेले द्रावण.
- भस्म - एखादा औषधी पदार्थावर जाळण्याची/उष्णतेची प्रक्रिया करून उपलब्ध झालेली राख.
- मारण - धातूंचे भस्म तयार करण्याचा एक नियंत्रित विधी.
- मूत्रल - शरीरातील दोष लघवीवाटे निघून जावे्त यासाठी मूत्राचे प्रमाण वाढविणारे औषध.
- रेचक - ज्या औषधाने रेच/जुलाब होतात असे औषध.
- लेप - शरीराचे कोणत्याही अंगावर ज्याचे लेपन केले जाते तो.
- वटिका - गोळ्या
- वांतिकारक - सेवन केल्यास उलटी होईल असे पदार्थ किंवा औषध.
- वायुकारक - वायू वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
- शोधन - शुद्ध करणे
- स्नेहन - वंगणासारखे काम करणारे, चोपडेपणा आणणारे पदार्थ किंवा औषध.
- स्वरस - अंगरस. ओल्या वनस्पतीस अथवा पानांना कुटून व स्वच्छ फडक्याने गाळून जो रस निघतो त्या रसाला स्वरस म्हणतात.
- स्वेदन / स्वेदजनन - घाम आणणारे पदार्थ किंवा औषध किंवा उपाययोजना.
- हिम /शीतकषाय - घटकद्रव्याच्या वजनाच्या सहापट पाणी घालून व रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून घेतल्यावर तयार होणारे औषध.
- हीनवीर्य - ज्यात कस उरला नाही असे पदार्थ किंवा औषध.
- वामक - उलटी करवणारे.
- श्लेष्मल - श्लेमा वाढविणारे
- दाह - जळजळ
- शोथ -
- आनुलोमिक -
- कासहर - खोकला दूर करणारे
- विषहर - विषाचा प्रभाव कमी/दूर करणारे
- काढा
- पाचक - पचनास मदत करणारे औषध अथवा पदार्थ.
हे सुद्धा पहा
[संपादन].