शैलजा रानडे
Appearance
प्रा. डाॅ. शैलजा मधुकर रानडे(२४ जानेवारी १९५१ - १३ जानेवारी, २०२२) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांचे यवतमाळला वास्तव्य होते.तेथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात त्या संस्कृतच्या अधिव्याख्यात्या होत्या. त्यांची काही पुस्तके संस्कृत साहित्यावर व व्याकरणावर आहेत.
शैक्षणिक कारकीर्द
[संपादन]एम.ए. (संस्कृत, राज्यशास्त्र), पीएच.डी. बी.एड. शैलजा रानडे या एम.ए. संस्कृतच्या परीक्षेत अमरावती विद्यापीठतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या त्या यवतमाळ शहरातील संस्कृतच्या पहिल्या पीएच.डी आहेत.
शैलजा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अभिज्ञान शाकुंतलम् पंचम अंक - एक रसग्रहण
- उपनिषदे सांगती कथा (बालसाहित्य)
- कथा दानवीरांच्या (बालसाहित्य)
- कालिदास कथा
- प्रार्थना
- भगवान परशुराम
- मधुसञ्चयः
- महाराष्ट्रातील प्रासंगिक कथा
- महाकवी भास विरचितम् स्वप्नवासवदत्तम् (भाषांतर व टीपांसह)
- रुद्राध्यायाचे अंतरंग
- संस्कृत निबंध ज्योत्स्ना
- संस्कृत व्याकरण-सुरभि
- संस्कृत साहित्यातील तीन नायिका
- सुभाषित रसस्वाद
- स्वर-माला (पुष्पमाला व स्वरसंधी-संस्कृत व्याकरणाचा भाग)
- ॐ हर्षचरितसारः (बाणभट्ट विरचित हर्षचरितसार)
संदर्भ
[संपादन]- विदुषी डॉ. शैलजा रानडे यांचे निधन Archived 2022-01-13 at the Wayback Machine.