Jump to content

इक्वेटोरीयल गिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इक्वेटोरियल गिनी या पानावरून पुनर्निर्देशित)
इक्वेटोरीयल गिनी
República de Guinea Ecuatorial (Spanish)
République de Guinée Équatoriale (French)
इक्वेटोरियल गिनीचे प्रजासत्ताक
इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज इक्वेटोरीयल गिनीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Unidad, Paz, Justicia" (स्पॅनिश)
"एकात्मता, शांतता, न्याय"
राष्ट्रगीत: Caminemos pisando las sendas de nuestra inmensa felicidad
इक्वेटोरीयल गिनीचे स्थान
इक्वेटोरीयल गिनीचे स्थान
इक्वेटोरीयल गिनीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मलाबो
अधिकृत भाषा स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो
 - पंतप्रधान व्हिसेंते एहाते तोमी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १२ ऑक्टोबर १९६८ (स्पेनपासून
क्षेत्रफळ
 - एकूण २८,०५० किमी (१४४वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १६,२२,००० (१५०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २४.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९.२८६ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  (२५,९२९वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.५५६ (मध्यम) (१४४ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक
आंतरराष्ट्रीय कालविभाग पश्चिम आफ्रिकन प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ GQ
आंतरजाल प्रत्यय .gq
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २४०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


इक्वेटोरीयल गिनीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Guinea Ecuatorial, फ्रेंच: République de Guinée équatoriale, पोर्तुगीज: República da Guiné Equatorial; भाषांतर: विषुववृत्तीय गिनी) हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखाताच्या किनाऱ्यावरील एक छोटा देश आहे. ह्या देशाचे दोन भाग आहेत: पहिला, कामेरूनच्या दक्षिणेला व गॅबनच्या वायव्येला असलेला खंडांतर्गत भाग, व दुसरा अटलांटिक महासागरातील अनेक लहान मोठी बेटे. इक्वेटोरियल गिनीची राजधानी व सर्वांत मोठे शहर मलाबो हे बियोको नावाच्या एका बेटावर वसले आहे. ह्या देशाच्या नावात जरी विषुववृत्त असले तरी देशाचा कोणताही भाग विषुववृत्तावर मोडत नाही.

इ.स. १७७८ ते इ.स. १९६८ दरम्यान स्पॅनिश गिनी नावाची स्पेनची वसाहत असलेल्या ह्या देशाला १२ ऑक्टोबर १९६८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्पॅनिश ही राष्ट्रभाषा असलेला इक्वेटोरीयल गिनी हा आफ्रिकेमधील एकमेव देश आहे. १९९० च्या दशकापासून इक्वेटोरीयल गिनी हा सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिका प्रदेशातील खनिज तेलाचा एक मोठा उत्पादक आहे. तेलाच्या निर्यातीमुळे हा देश सुबत्त बनला असून येथील वार्षिक सकल उत्पन्न जगात ६९व्या क्रमांकावर असून वार्षिक दरडोई उत्पन्न आफ्रिकेमध्ये सर्वाधिक आहे. तरीही येथे संपत्तीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विषमता असून फार थोड्या नागरिकांना ह्या अर्थव्यवस्थेमुळे फायदा झाला आहे. इक्वेटोरीयल गिनीमधील बहुसंख्य जनता दारिद्र्यामध्ये जीवन कंठत आहे. १९७९ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेला तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो हा आफ्रिकेमधील सर्वात वाईट हुकुमशहा समजला जातो. त्याच्या राजवटीखाली इक्वेटोरीयल गिनीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन जगात सर्वात चिंताजनक बनले आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: