नेपाळी भाषा
Appearance
हा लेख नेपाळी भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नेपाळी.
नेपाळी | |
---|---|
नेपाली/खस कुरा/पर्वते भाषा | |
स्थानिक वापर | नेपाळ, भारत, भूतान, तिबेट, म्यानमार |
प्रदेश | दक्षिण आशिया |
लोकसंख्या | १,७०,००,००० |
क्रम | ६६ |
भाषाकुळ | |
लिपी | देवनागरी लिपी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
नेपाळ सिक्किम (भारत) पश्चिम बंगाल (भारत) |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | ne |
ISO ६३९-२ | nep |
ISO ६३९-३ | nep |
नेपाळी भाषा (नेपाळी: नेपाली भाषा; अन्य नावे: खस कुरा, गोरखाली भाषा वा पर्वतिया भाषा) ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील इंडो-आर्य शाखेतील भाषा आहे. ती नेपाळाची अधिकृत भाषा असून, तेथे बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांपैकी एक आहे. नेपाळाबाहेर ती भूतान, भारत व म्यानमार या जवळच्या देशांमध्येही काही प्रमाणात वापरली जाते. भारतातदेखील तिला अधिकृत भाषेचा घटनात्मक दर्जा आहे. पूर्वी सार्वभौम राष्ट्र असलेल्या व वर्तमानात भारतीय प्रजासत्ताकातील घटक राज्य असलेल्या सिक्किमात नेपाळीला अधिकृत भाषेचे स्थान आहे. नेपाली भाषा खस जातिच भाषा आहेत ।
लिपी
[संपादन]सध्या नेपाळी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते. ऐतिहासिक काळातील जुन्या नेपाळी दस्तऐवजांमध्ये ताकरी, भुजिमोल, रंजना या लिप्यादेखील वापरल्याचे आढळते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |