Jump to content

गोविंद वल्लभ पंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोविंद वल्लभ पंतचा नैनीतालमधील पुतळा

गोविंद वल्लभ पंत ( सप्टेंबर १०, इ.स. १८८७, मृत्यू: मार्च ७, इ.स. १९६१) हे क्रांतिकारक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते होते. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ रोजी अल्मोड़ा जिल्ह्यात श्यामली या  पर्वतीय क्षेत्रातील खूंट या गावामध्ये मूळच्या महाराष्ट्रीय कऱ्हाड़े ब्राह्मण कुटुंबात झाला.त्यांचे मुळ घराणे कोकणातिल रत्‍नागिरी जिल्हा, तालुका राजापूर, कोतापुर गावातिल आहे. त्यांचे पुर्वीचे आडनाव पराडकर असे आहे.

महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच ते काँग्रेस स्वयंसेवक म्हणून काम करीत असत.डिसेंबर १९२१ मध्ये गांधीजींच्या आवाहनामुळे असहकार चळवळीच्या माध्यमातुन ते सक्रिय राजकारणात आले.

पंत हे उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री आणि भारताचे दुसरे गृहमंत्री होते. भारत सरकारने इ.स. १९५७ साली त्यांना भारतरत्न ने सन्मानीत केले.

भारतरत्न पुरस्कार वितरणास त्यांच्याच गृहमंत्री पदाच्या करकिर्दीत सुरुवात झाली. हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याबाबत ते विशेष आग्रही होते. जमिनदारी पद्धत समाप्त करण्यात व कूळ कायदा अस्तित्वात आणण्यात त्यांचे मुख्य योगदान होते.अल्पसंख्यकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कुमाऊउ परिषदेची स्थापना केली .

७ मार्च १९६१ रोजी त्यांचे निधन झाले. कोतापूर गावात त्यांचे कोणी वारस नाहीत. मात्र ज्या परिसरात त्यांच्या वारसांची घरे होती त्या परिसराला पराडकरांचा परिसर म्हणून ओळखले जाते. या परिसरात घरांचे ओसाड जोते पाहायला मिळतात.