Jump to content

आरोहण आणि अवरोहण (पूर्णयोग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आरोहण (ascent) आणि अवरोहण (descend) या श्रीअरविंद प्रणीत पूर्णयोगातील महत्त्वाच्या संकल्पना आहेत.

व्याख्या

[संपादन]

साधकाने उर्ध्वस्थित असणाऱ्या आत्म्याप्रत आणि दिव्य ईश्वरी प्रकाश, ज्ञान, शक्ती, शांती, आनंद यांच्याप्रत खुले होणे, उन्नत होणे म्हणजे आरोहण आणि त्या गोष्टी आपल्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये (म्हणजे मन, प्राण व शरीर यांमध्ये) आपल्या देहामध्ये अवतरित होणे म्हणजे अवरोहण.[]

इतर योगमार्गांमध्ये आरोहणाला (विशेषतः कुंडलिनीच्या) महत्त्व असते. परंतु पूर्णयोगामध्ये आरोहण ही केवळ पहिली पायरी असते. अधिक प्राधान्य दिलेले असते ते अवरोहणाला. ते पूर्णयोगाच्या साधनेचे वैशिष्ट्य आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ A.S.Dalal (2002). Emergence of the Psychic (Governance of Life by the Soul). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-688-7.
  2. ^ Sri Aurobindo. On himself, (Sri Aurobindo Birth Centenary Library). Pondicherry: Sri AurobindD Ashram Trust 1972. p. 109.