भगवद्गीता
| हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
| वेद | |
|---|---|
| ऋग्वेद · यजुर्वेद | |
| सामवेद · अथर्ववेद | |
| वेद-विभाग | |
| संहिता · ब्राह्मणे | |
| आरण्यके · उपनिषदे | |
| उपनिषदे | |
| ऐतरेय · बृहदारण्यक | |
| ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
| केन · मुंडक | |
| मांडुक्य ·प्रश्न | |
| श्वेतश्वतर ·नारायण | |
| कठ | |
| वेदांग | |
| शिक्षा · चंड | |
| व्याकरण · निरुक्त | |
| ज्योतिष · कल्प | |
| इतिहास | |
| रामायण · महाभारत | |
| इतर ग्रंथ | |
| स्मृती · पुराणे | |
| भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
| पंचतंत्र · तंत्र | |
| स्तोत्रे ·सूक्ते | |
| मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
| शिक्षापत्री · वचनामृत | |
भगवद्गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध.
त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
यात एकुण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.
हा हिंदू लोकांचा पवित्र धर्मग्रंथ आहे.
गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबध्द भाषांतर आहे.
‘ नाईट ’ ही बहुमानाची पदवी मिळवून इ. स. १७९३ मध्ये इंग्लंडहून भारतात आलेला सर विल्यम जोन्स जगप्रसिद्ध एशियाटिक सोसायटीचा संस्थापक आणि अध्यक्ष होता. रामलोचन पंडिताच्या सर्व अपमानास्पद अटी मान्य करून तो पौर्वात्य पद्धतीने संस्कृत शिकला. डायजेस्ट ऑफ हिंदू अण्ड मोहॅमिडन लॉज, एशियाटिक मिसेलेनी, हिंदूंची कालगणना, हिंदूंचे राशीचक्र, पर्शियन भाषेचे व्याकरण, पौर्वात्य हस्तलिखित ग्रंथांची सूची इत्यादी अनेक विद्वन्मान्य ग्रंथ त्याने लिहिले आहेत. भगवद्गीता, गरूडपुराण, मनुस्मृती, शाकुंतल, ऋतुसंहार, गीतगोविंद, हितोपदेश इत्यादी साहित्यकृतींचा हा पहिला भाषांतरकार आहे. भारतीय संस्कृतीची माहिती जगाला करून देणारा हा थोर पंडित होता.
भगवत् गीता हा हिंदू धर्मातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय महत्त्वाचा तत्त्वज्ञानावर आधारलेला संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहीलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली. हिंदू (वैदीक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.
सामान्यजनांमधे भगवत्-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते.
कुरूक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरूवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदांत यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशातले व विविध धर्मातले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
हिंदू धर्मामधे असे मानले गेले आहे की गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वत:चे विश्वरूप दर्शन दिले आणि त्याकरता अर्जुनाला दिव्यदृष्टि प्रदान केली.
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे.
अनुक्रमणिका |
गीतेचा कालावधी[संपादन]
महाभारतातल्या 'भीष्म पर्वा' मधे गीतेचा उल्लेख आढळतो. महाभारतातल्या २५ ते ४२ अध्यायांमधे लिहीलेल्या गीतेचे एकूण ७०० श्लोक आहेत. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायली' जाते.
उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहीती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता 'महर्षी व्यास' यांनी लिहिली असे मानले जाते.
छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली.
हिंदू धर्मातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसर्या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कीत्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते अध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही.
गीतेच्या विविध आवृत्ती व संबंधीत ग्रंथ संपदा[संपादन]
गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडात इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात भिक्षुगीता , रामगीता , कपिलगीता , गणेशगीता , शिवगीता , सूर्यगीता , ईश्वरगीता , हंसगीता , पराशरगीता इतकेच काय , पण यमगीताही लिहिली गेली. कूर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायात ईश्वरगीता तर पुढील अध्यायात व्यासगीता आहे. गणेशपुराणात शेवटच्या क्रीडा खंडात १३८ ते १४९ अध्यायात गणेशगीता आहे.[१]
- अध्याय १ - अर्जुनविषादयोग
- अध्याय २ - सांख्ययोग
- अध्याय ३ - कर्मयोग
- अध्याय ४ - ज्ञानसंन्यासयोग
- अध्याय ५ - कर्मसंन्यासयोग
- अध्याय ६ - आत्मसंयमयोग
- अध्याय ७ - ज्ञानविज्ञानयोग
- अध्याय ८ - अक्षरब्रह्मयोग
- अध्याय ९ - राजविद्याराजगुह्ययोग
- अध्याय १० - विभूतियोग
- अध्याय ११ - विश्वरूपदर्शनयोग
- अध्याय १२ - भक्तियोग
- अध्याय १३ - क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
- अध्याय १४ - गुणत्रयविभागयोग
- अध्याय १५ - पुरुषोत्तमयोग
- अध्याय १६ - दैवासुरसंपविभागयोग
- अध्याय १७ - श्रद्धात्रयविभागयोग
- अध्याय १८ - मोक्षसंन्यासयोग
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- भग्वद्गीता इन आउर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)
विकिपुस्तक[संपादन]
|
||||||||||||||
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |