सुनीता विल्यम्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सुनीता विल्यम्स (सप्टेंबर १९, इ.स. १९६५ - हयात) ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे.
शिक्षण [संपादन]
• नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३.
• बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७.
• एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- नासा संस्थेच्या संकेतस्थळावरील सुनीता विल्यम्स हिचे अल्पचरित्र (इंग्लिश मजकूर)