इस्कॉन
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)[International Society for Krishna Consciousness ISKCON] किंवा हरे कृष्ण चळवळ ही एक वैष्णव संप्रदायाची धार्मिक संघटना आहे. ही संघटना १९६६ साली, संस्थापकाचार्य ए.सी.भक्तिवेदान्तस्वामी प्रभुपाद ह्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क ह्या महानगरात स्थापली. तिची तत्त्वे ही हिंदु संस्कृतीतील धार्मिक ग्रंथ श्रीमद भागवतम् व भगवदगीता ह्यावर आधारित असून ती हिंदु मान्यतेनुसार सुमारे ५००० वराहे जुनी आहेत. तिचे भारतातील मुख्यालय पश्चिम बंगाल मधील एक गाव मायापूर येथे आहे. कृष्ण हेच परम ईश्वर आहेत किंवा स्वयम भगवान आहेत व तेच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहेत अशी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची मान्यता आहे. भारतीय संस्कृती व वैदिक विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हा पंथ काम करतो.
इस्कॉन चा मूलमंत्र:
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे
अनुक्रमणिका |
प्रमुख तत्त्वे [संपादन]
- मांसाहार वर्ज्य
- जुगार वर्ज्य
- सर्व प्रकारची नशा वर्ज्य
कार्य [संपादन]
जगात हिंदू धर्माचे महत्त्व आणि आध्यात्मिक जीवनातील आनंद समजावण्याचे काम हरेकृष्ण संप्रदाय करत असतो. या धर्मप्रसाराची सुरुवात म्हणून कृष्णभक्ती आणि तत्त्वज्ञान समजावून दिले जाते. याद्वारे जास्तीत जास्त लोक याकडे आकर्षित होतील असे पाहिले जाते. त्यासाठी शहरातून भजनांच्या फेऱ्या काढल्या जातात. या मिशनने अनेक ठिकाणी खाद्यपदार्थाच्या सोई करून दिल्या आहेत. त्यासाठी फूड फॉर लाइफ ही वेगळी उपशाखा निर्माण करण्यात आली आहे. भारताबाहेर सुमारे शंभराहून अधिक देशांमध्ये या संस्थेने हिंदुधर्म प्रसाराचे महत्त्वाचे काम सुरू ठेवलेले आहे. आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थितीत राहणाऱ्या ११ लाख विद्यार्थ्यांना व मुलांना भारतात इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशन द्वारे दुपारचे जेवण देण्यात येत आहे. हे सर्व कार्य स्वयंसेवकांद्वारे विनामूल्य केले जाते.
जगातल्या काही प्रमुख संगीतकारांना हरेकृष्ण संप्रदाय आकर्षक वाटला आहे. जसे बीटल्स, जॉन लेनन, इ.
भारतातील मंदिरे [संपादन]
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ मंदिरे [संपादन]
- न्यूयॉर्क अमेरिका
- मेलबर्न ऑस्ट्रेलिया
- कॅनबेरा ऑस्ट्रेलिया
- सिडनी ऑस्ट्रेलिया
- अक्रा शहर घाना
- लोम शहर टोगो
- मोगोक ब्रह्मदेश
- अलामिनोस फिलिपाइन्स
- मॉस्को रशिया
- सारायेवो बोस्निया
- पॅरिस फ्रान्स
- बुडापेस्ट हंगेरी
- रॉटरडॅम नेदरलँड्स
- लंडन इंग्लंड
- अटलांटा अमेरिका
- बॉयझे इडाहो अमेरिका
चित्रदालन [संपादन]
-
संस्थापकाचार्य ए.सी.भक्तिवेदान्तस्वामी प्रभुपाद