जरासंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जरासंध हा महाभारत कालीन मगध देशाचा राजा व महाभारतातील कृष्णाचा प्रमुख शत्रू होता.

तो एक शक्तिशाली राजा असून त्याचे स्वप्न एक चक्रवती सम्राट बनण्याचे होते, परंतु तो अत्यंत क्रूर होता. अनेक देशांच्या राजांना त्याने आपल्या कारागृहात बंदी बनवुन ठेवले होते.

तो मथुरा नरेश कंस याचा परम मित्र होता. श्रीकृष्णाने केलेल्या कंस वधाचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याने १७ वेळा मथुरा राज्यावर चढ़ाई केली, पण प्रत्येक वेळी त्याला असफल व्हावे लागले. श्रीकृष्णाने भीमाच्या हातून याचा वध घडवुन आणला.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये