यजुर्वेद
| या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या. |
| हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
| वेद | |
|---|---|
| ऋग्वेद · यजुर्वेद | |
| सामवेद · अथर्ववेद | |
| वेद-विभाग | |
| संहिता · ब्राह्मणे | |
| आरण्यके · उपनिषदे | |
| उपनिषदे | |
| ऐतरेय · बृहदारण्यक | |
| ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
| केन · मुंडक | |
| मांडुक्य ·प्रश्न | |
| श्वेतश्वतर ·नारायण | |
| कठ | |
| वेदांग | |
| शिक्षा · चंड | |
| व्याकरण · निरुक्त | |
| ज्योतिष · कल्प | |
| इतिहास | |
| रामायण · महाभारत | |
| इतर ग्रंथ | |
| स्मृती · पुराणे | |
| भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
| पंचतंत्र · तंत्र | |
| स्तोत्रे ·सूक्ते | |
| मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
| शिक्षापत्री · वचनामृत | |
यजुर्वेद, (संस्कृत-यजुस्+वेदः=यजुर्वेदः) हा हिंदुंच्या चार वेदांपैकी तिसरा आहे.वेदांचे निर्माण ख्रिस्तपूर्व १,४०० ते १००० या काळात झाले, असा एक मतप्रवाह आहे.यजुर्वेदिय संहितेत,वैदिक काळातील, यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे. त्यांच्या प्रस्तुतीकरण व वापराच्या पध्दतीत ब्राह्मण्ये व श्रौतसुत्रांनी,त्यात मोलाची भर घातली.
अनुक्रमणिका |
शाखा [संपादन]
यजुर्वेदाच्या प्राथमिक अशा दोन संहिता आहेत - शुक्ल संहिता व कृष्ण संहिता.दोहोंमध्येही,धार्मिक अनुष्ठान करावयासाठीचे मंत्र आहेत.कृष्ण यजुर्वेदात,संहितेतच ब्राह्मण्ये गद्य स्वरुपात दिले आहे तर शुक्ल यजुर्वेदासाठी शतपथ ब्राह्मण वेगळे आहे.
शुक्ल यजुर्वेद [संपादन]
शुक्ल यजुर्वेदाच्या 'वाजसेनिय संहिता' म्हणून नाव असलेल्या (आणि बरेच साम्य असलेल्या)दोन शाखा आहेत.
- वाजसेनिय माध्यंदिन - मुळची, बिहार येथिल
- वाजसेनिय कण्व- मुळची, कोशल येथिल
वाजसेनिय माध्यंदिन ही शाखा उत्तर भारत , गुजरात , महाराष्ट्रातील नाशिकच्या उत्तरेकडील भागात प्रसिद्ध आहे. तर, कण्व ही शाखा नाशिकच्या दक्षिणेकडीलओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागात.
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
जगदगुरु आदि शंकराचार्य यांच्या चार प्रमुख् शिष्यांपैकी एक असणाऱ्या सुरेश्वराचार्य यांनी, कण्व शाखेचा स्विकार केला.त्यांच्या गुरुंनी आपस्तंभ कल्पसुत्रासहित तैत्तरीय शाखा अवलंबिली. म्हैसूरजवळ असलेल्या, भारतातील दुसऱ्या मोठ्या, श्रीरंगम येथील रंगनाथस्वामीच्या देवळात,कण्व शाखिय वैदिक पध्दतीने पूजा-अर्चा होते. रघुवंश,दशरथ, रामाने व त्याच्या वंशजांनी शुक्ल यजुर्वेदाचे अनुसरण केले.शुक्ल यजुर्वेदाशी दोन उपनिषदे संलग्न आहेत- ईशोपनिषद व बृहदारण्यकोपनिषद .त्यापैकी, 'बृहदारण्यक' हा सर्व उपनिषदात आकाराने सर्वात मोठा आहे.
वाजसेनिय संहितेत,खालील मंत्रांचे एकुण ४० अध्याय आहेत(ओरिसात-४१ अध्याय). ते असे -
अध्याय-
- १ व २ :नवीन व पुर्ण-चंद्र आहुत्या
- ३ :अग्नीहोत्र
- ४ ते ८ :सोमयज्ञ
- ९ व १० : वाजपेय व राजसुय - सोमयज्ञाचे दोन सुधार
- ११ ते १८ : अग्नीकायनासाठी विशेषकरुन - altars and hearths,[मराठी शब्द सुचवा]
- १९ ते २१ :सुत्रमणी,अती सोमपानाने होणाऱ्या असरावर उतार म्हणुन
- २२ ते २५ :अश्वमेध
- २६ ते २९ : वेगवेगळ्या धार्मिक प्रयोजनांसाठी पुरक मंत्र
- ३० व ३१ :पुरुषमेध
- ३२ ते ३४ :सर्वमेध
- ३५ : पितृयज्ञ
- ३६ ते ३९ : प्रवरयज्ञ
- ४० : हा शेवटला अध्याय हे प्रसिद्ध ईशोपनिषद आहे.
'वाजसेनीय संहिता' चे संपादन व प्रकाशन 'वेबर'(लंडन व बर्लिन,१८५२) आणि ईंग्रजीत भाषांतर, राल्फ टी.एच. ग्रिफिथ (बनारस,१८९९) यांनी केले.
कृष्ण यजुर्वेद [संपादन]
कृष्ण यजुर्वेदाच्या चार शाखा आहेत.
- तैत्तरीय संहिता - मुळची, पांचालची
- मैत्रयणी संहिता - मुळची,कुरुक्षेत्राच्या दक्षिणेकडील भागातली
- चरक कथा संहिता - मुळची, मद्र व कुरुक्षेत्र प्रांतातली
- कपिस्थल कथा संहिता - बाहिका,दक्षिण पंजाबातील
प्रत्येक शाखेसमवेत, ब्राह्मण्ये व बहुतेकांसमवेत, श्रौतसुत्रे, गृहसुत्रे, आरण्यके, उपनिषद व प्रतिशाख्य संलग्न होते.
तैत्तरीय शाखा :यापैकी प्रसिद्ध व चांगली जतन केलेली ही तैत्तरीय संहिता आहे,ज्याचे नाव 'यस्काचा' शिष्य 'तैत्तिरी' वरुन पदले.त्यात ७ पुस्तके /कांडांचा समावेश आहे.त्याची पुढे 'प्रपाठक' व नंतर 'अनुवाक्'म्हणुन विभागणी झाली आहे. त्यापैकी काहींनी हिंदू धर्मात मानाचे स्थान पटकावले आहे.उदाहरणार्थ : तै-४.५ व ४.७ ज्यात 'रुद्र चमक' आहे आणि १.८.६.i यात शैवैते त्र्यंबक मंत्र. र्भु ,भुवः,स्वः हे बीज ऋग्वेदातील सवितृ गायत्री मंत्रास जोडले असलेला मंत्र हा यजुर्वेदातील आहे. दक्षिण भारतात, कृष्ण यजुर्वेदाची तैत्तरीय पाठ्य असलेली शाखेचे सध्या प्रचलन आहे. या शाखेच्या लोकांत आपस्तंभ सुत्र हे सर्वमान्य आहे. तैत्तरीय शाखेत, तैत्तरीय संहीता(७ कांड), तैत्तरीय ब्राह्मण(३ कांड), तैत्तरीय आर्यंका (७ प्रश्न) तैत्तरीय उपनिषद(३ प्रश्नावली?)-(शिक्षावली, आनंदावली, भृगु आवली??) व महानारायण उपनिषद.
तैत्तरीय उपनिषद व महानारायण उपनिषद या दोहोत, आर्यंकातील सातवा,आठवा, नववा,व दहावा प्रश्न आहे.'प्रपाठक' व 'कांड' हे शब्द वेद-साहित्यात एकमेकास पर्यायवाची म्हणून वापरले जातात. प्रश्न व आवली हे शब्द आर्यंकाचे विभाग होत. यात, यापेक्षा वेगळा 'एकांगी कांड' म्हणून एक भाग आहे,ज्यात, लग्न व इतर विधींसाठी मंत्र आहेत. या सर्वांचे पाश्च्यात्यांनी भाषांतर व प्रकाशनही केले आहे.
आख्यायिका [संपादन]
'वैशंपायन ऋषी' कडून परंपरे नुसार, 'याज्ञवल्क' वेद शिकला. ते त्याचे मामा होते. त्याचा जन्म हा या कामासाठी देवदत्त होता.तो एकपाठी(एकसंधीग्रही) होता.त्यास एका शिकवण्यातच तो ते आत्मसात करू शकत असे.वेदांच्या निरुपणात(interpretation ) दोघांमध्ये तिव्र स्वरुपाचे मतभेद झाले.एका प्रसंगी,'वैशंपायन ऋषी' इतके संतापले की, त्यांनी, याज्ञवल्कास दिलेले ज्ञान परत मागितले. याज्ञवल्काने ते ओकुन टाकले. 'वैशंपायन ऋषी' च्या एका शिष्याने, जो ते ग्रहण करण्यास उत्सुक होता, तित्तिर पक्षाचे रूप घेउन ते खाउन टाकले. म्हणुन, यास 'तैत्तरीय संहिता' असे म्हणतात. गुरुने दिलेले सर्व ज्ञान ओकुन टाकल्यावर, याज्ञवल्काने सुर्याची आराधना केली व सुर्यनारायणाकडून थेट नवीन ज्ञान प्राप्त केले.त्यासाठी सुर्याने घोड्याचे रूप घेतले होते.
संदर्भ [संपादन]
साहित्य:
Ralph Thomas Hotchkin Griffith, The Texts of the White Yajurveda. Translated with a Popular Commentary (1899). Devi Chand, The Yajurveda. Sanskrit text with English translation. Third thoroughly revised and enlarged edition (1980). The Sanhitâ of the Black Yajur Veda with the Commentary of Mâdhava ‘Achârya, Calcutta (Bibl. Indica, 10 volumes, 1854-1899) Kumar, Pushpendra, Taittiriya Brahmanam (Krsnam Yajurveda), 3 vols., Delhi (1998).
हे ही बघा [संपादन]
- यज्ञ
- कल्प(वेदांग)
- शतपथ ब्राह्मण
- महिधर
- वेद
बाह्य दुवे [संपादन]
Sanskrit Web Freely downloadable, carefully edited Sanskrit texts of Taittiriya-Samhita, Taittiriya-Brahmana, Taittiriya-Aranyaka, Ekagni-Kanda etc. as well as English translations of the Taittiriya-Samhita etc. Albrecht Weber, Die Taittirîya-Samhita 1871 Ralph Griffith, The Texts of the White Yajurveda 1899, full text, (online at sacred-texts.com) A. Berridale Keith, The Yajur Veda - Taittiriya Sanhita 1914, full text, (online at sacred-texts.com) Retrieved from "http://en.wikipedia.org/wiki/Yajurveda"
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| वेद | |
|---|---|
| ऋग्वेद • यजुर्वेद •सामवेद • अथर्ववेद |