वैशाली माडे
वैशाली माडे | |
---|---|
वैशाली माडे | |
आयुष्य | |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | बौद्ध |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
वैशाली भैसने-माडे या दूरचित्रवाणीवरच्या सुगम संगीत गायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भैसने आणि सासरचे माडे आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे २४ ऑगस्ट १९८४ रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिने पार्श्वगायन केलेय. लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती चाहती आहे.[१]
माडे या दूरचित्रवाणीवर २००८ साली झालेल्या ’सारेगमप’ या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून विजेत्या ठरल्या. हिंदी सारेगमप या शोचीदेखील ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. तसेच वैशाली 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 'बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमातील 'पिंगा' हे तिनं गायलेले गाणं गाजले. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेय. तसेच तिने 'कलंक' या हिंदी सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' हे गाणं गायले आहे. मराठी सिनेमातही तिने अनेक गाणी तसेच भीम गीते गायली आहेत.
पुरस्कार
[संपादन]- सोलापूरच्या दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६)
संदर्भ
[संपादन]- ^ "गायिका वैशाली माडे लवकरच राजकारणात; 'या' पक्षात करणार प्रवेश". महाराष्ट्र टाइम्स. 2021-04-03 रोजी पाहिले.