बिग बॉस मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बिग बॉस मराठी
Bigg Boss Marathi season 2 logo.jpg
निर्मिती संस्था एन्डेमॉल इंडिया प्रोडक्शन
सूत्रधार महेश मांजरेकर
आवाज रत्नाकर तारदाळकर
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
चालण्याचा वेळ दररोज रात्री ०९:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण १५ एप्रिल २०१८ – ०१ सप्टेंबर २०१९
अधिक माहिती
आधी सुखाच्या सरींनी हे मन बावरे

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचे प्रसारण कलर्स मराठी वाहिनीवर १५ एप्रिल २०१८ रोजी सुरु झाले होते. अभिनेते महेश मांजरेकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. मेघा धाडे हिने पहिल्या पर्वाची विजेती होण्याचा मान पटकावला. २६ मे २०१९ रोजी बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु झाले होते. शिव ठाकरे याने दुसऱ्या पर्वाचा विजेता होण्याचा मान पटकावला.[१]

आढावा[संपादन]

नियम[संपादन]

स्पर्धक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा परवानगीशिवाय उपयोग करू शकत नाही. ते कोणाबरोबर ही नामांकन प्रक्रियेवर चर्चा करू शकत नाही. दिवसा झोपू शकत नाही. तसेच त्यांना नेहमीच माइक घालणं आणि मराठी भाषेत बोलणं बंधनकारक आहे.

प्रसारण[संपादन]

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. दररोजच्या भागांमध्ये मागील दिवसाची मुख्य घटना असते. प्रत्येक शनिवार व रविवारचा भाग मुख्यतः सूत्रधाराद्वारे काढून टाकलेल्या स्पर्धकांच्या मुलाखतीवर केंद्रीत असतो.

बेदखल[संपादन]

प्रतिस्पर्धी त्यांच्या घरातील स्पर्धकांद्वारे दर आठवड्याला नामांकित होतात. दर्शक त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला मत देतात आणि ज्या स्पर्धकाला सर्वात कमी मते मिळतात तो स्पर्धक घराबाहेर पडतो.

कार्यक्रम[संपादन]

दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार
कार्यक्रम नामांकन साप्ताहिक कार्य लक्झरी बजेट कॅप्टनसी मुलाखत बेदखल

स्पर्धक[संपादन]

कंपू हंगाम १ हंगाम २
चित्रपट अभिनेते/अभिनेत्री मेघा धाडे किशोरी शहाणे
दिगंबर नाईक
पुष्कर जोग आरोह वेलणकर
भूषण कडू अभिजीत केळकर
राजेश श्रृंगारपुरे
रेशम टिपणीस नेहा शितोळे
सई लोकुर
स्मिता गोंदकर विद्याधर जोशी
सुशांत शेलार
विनीत भोंडे मैथिली जावकर
शर्मिष्ठा राऊत
नंदकिशोर चौघुले
दूरदर्शन अभिनेते/अभिनेत्री उषा नाडकर्णी वीणा जगताप
जुई गडकरी शिवानी सुर्वे
ऋतुजा धर्माधिकारी माधव देवचके
अस्ताद काळे रूपाली भोसले
गायक त्यागराज खाडिलकर वैशाली म्हाडे
पत्रकार अनिल थत्ते कोणीही नाही
आचारी कोणीही नाही पराग कान्हेरे
राजकारणी कोणीही नाही अभिजित बिचुकले
रिॲलिटी शो स्पर्धक कोणीही नाही शिव ठाकरे
डान्सर कोणीही नाही हीना पंचाल
कोणीही नाही सुरेखा पुणेकर
विजेते मेघा धाडे शिव ठाकरे
उपविजेते पुष्कर जोग नेहा शितोळे

मालिका तपशील[संपादन]

हंगाम सुत्रसंचालक पहिला भाग शेवटचा भाग दिवस स्पर्धक राशी विजेता उपविजेता
महेश मांजरेकर १४ एप्रिल २०१८ २२ जुलै २०१८ ९८ २० २५,००,००० मेघा धाडे पुष्कर जोग
२६ मे २०१९ १ सप्टेंबर २०१९ १७ शिव ठाकरे नेहा शितोळे

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Latest Big Boss Marathi News in Marathi | Big Boss Marathi Live Updates in Marathi | बिग बॉस मराठी बातम्या at Lokmat.com". http://www.lokmat.com/. 2019-07-04 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)