"जॉर्ज डब्ल्यू. बुश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ४६: ओळ ४६:
{{कॉमन्स|George W. Bush|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स|George W. Bush|{{लेखनाव}}}}


* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/georgewbush/ | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत चरित्र | भाषा = इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/georgewbush/ | title = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत चरित्र | भाषा = इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://georgewbush-whitehouse.archives.gov/ | शीर्षक = बुश अध्यक्षीय प्रशासनाच्या दस्तऐवजांचा व्हाइट हाउस संकेतस्थळावरील संग्रहित साठा | भाषा = इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://georgewbush-whitehouse.archives.gov/ | title = बुश अध्यक्षीय प्रशासनाच्या दस्तऐवजांचा व्हाइट हाउस संकेतस्थळावरील संग्रहित साठा | भाषा = इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://worldcat.org/identities/lccn-no95-49848 | शीर्षक = {{लेखनाव}} याचे किंवा याच्याशी संबंधित साहित्य | भाषा = इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://worldcat.org/identities/lccn-no95-49848 | title = {{लेखनाव}} याचे किंवा याच्याशी संबंधित साहित्य | भाषा = इंग्लिश}}


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१६:३३, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

जॉर्ज डब्ल्यू. बुश

कार्यकाळ
दिनांक २०-१-२००१ – ते २०-१-२००९
उपराष्ट्रपती डिक चेनी
मागील क्लिंटन
पुढील ओबामा

जन्म ६ जुलै, १९४६ (1946-07-06) (वय: ७७)
न्यू हेवन, कनेटिकट, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
पत्नी लॉरा बुश
गुरुकुल येल विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ
धर्म एपिस्कोपल (१९७७ पर्यंत), युनायटेड मेथोडिस्ट (१९७७ पासून)*
सही जॉर्ज डब्ल्यू. बुशयांची सही
एपिस्कोपल आणि युनायटेड मेथोडिस्ट हे दोन्ही ख्रिश्चन धर्माच्या प्रोटेस्टंट पंथाचे उपपंथ आहेत.

जॉर्ज वॉकर बुश, अर्थात जॉर्ज डब्ल्यू. बुश, (इंग्लिश: George Walker Bush ;) (६ जुलै, इ.स. १९४६; न्यू हॅवन, कनेक्टिकट, अमेरिका - हयात) हा अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी हा इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात टेक्सासाचा ४६वा गव्हर्नर होता. बुश रिपब्लिकन पक्षाचा सदस्य आहे.

अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश व त्याची पत्नी बार्बारा बुश यांच्या पोटी न्यू हॅवन, कनेक्टिकट येथे त्याचा जन्म झाला. माजी राष्ट्राध्यक्षाचा पुत्र असलेला हा दुसरा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहे. फ्लोरिडा संस्थानाचा ४३वा गव्हर्नर जेब बुश हा त्याचा भाऊ आहे.

जॉर्ज बुश इ.स. १९६८ साली येल विद्यापीठातून, तर इ.स. १९७५ साली हार्वर्ड बिझनेस स्कुलातून पदवी अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्याने काही काळ खनिज तेल उद्योग सांभाळला. टेक्सास संस्थानाच्या गव्हर्नरपदासाठी झालेल्या इ.स. १९९४ सालातल्या निवडणुकींत त्याने डेमोक्रॅट उमेदवार अ‍ॅन रिचर्ड्स हिच्यावर मात करत निवडणूक जिंकली. इ.स. २००० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अल गोर यास हरवत तो अध्यक्षपदावर निवडून आला.

बुश याच्या अध्यक्षीय कारकिर्दीचे अवघे आठ महिने झाले असताना सप्टेंबर ११, इ.स. २००१चे दहशतवादी हल्ले झाल्यामुळे बुश प्रशासनाने दहशतवादाचा सामना करण्यास प्राधान्य दिले. बुश प्रशासनाने दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्ध घोषित करून इ.स. २००१ साली इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप करत अफगाणिस्तानावर, तर इ.स. २००३ साली इराकावर आक्रमण केले. बुश याच्या दुसर्‍या अध्यक्षीय मुदतीत इ.स. २००८ सालातल्या मंदीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली. आर्थिक प्रश्न आणि इराक व अफगाणिस्तानातील लांबत गेलेल्या युद्धांची व्यवहार्यता, यांमुळे त्याची लोकप्रियता दुसर्‍या मुदतीत ओसरू लागली.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: