ज्यो बायडेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ज्यो बायडेन
Joe Biden
ज्यो बायडेन


अमेरिकेचा ४७वा उपराष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२० जानेवारी, २००९ – २० जानेवारी २०१७
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
मागील डिक चेनी
पुढील माइक पेन्स

कार्यकाळ
३ जानेवारी १९७३ – १५ जानेवारी २००९

जन्म २० नोव्हेंबर, १९४२ (1942-11-20) (वय: ७७)
स्क्रॅंटन, पेन्सिल्व्हेनिया
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक
पत्नी जिल जेकब्स
धर्म रोमन कॅथलिक

जोसेफ रॉबिनेट बायडेन, ज्युनियर (इंग्लिश: Joseph Robinette "Joe" Biden Jr., जन्म: २० नोव्हेंबर १९४२) हा एक अमेरिकन राजकारणी व देशाचा माजी उपराष्ट्राध्यक्ष आहे. २००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासोबत निवडून आल्यानंतर २०१२ साली ओबामा- बायडेनने विजय मिळवून सत्ता राखली. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी बायडेन १९७३ ते २००९ डेलावेर राज्यामधून अमेरिकेचा सेनेटर होता. सेनेटमधील आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत बायडेन अनेक समित्यांचा चेअरमन राहिला. १९९८ व २००८ साली बायडेनने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु दोन्ही वेळा तो अपयशी ठरला.

२०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी बायडेन रिंगणात उतरेल असा अंदाज बांधला जात होता. परंतु ऑक्टोबर २०१५ मध्ये बायडेनने आपण २०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूका लढवणार नसल्याचे जाहीर केले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: