मिलार्ड फिलमोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिलार्ड फिलमोर

सही मिलार्ड फिलमोरयांची सही

मिलार्ड फिलमोर (इंग्लिश: Millard Fillmore ;) (७ जानेवारी, इ.स. १८०० - ८ मार्च, इ.स. १८७४) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा तेरावा अध्यक्ष होता. व्हिग पक्षाचा सदस्य असलेला तो अखेरचा राष्ट्राध्यक्ष होता. बारावा राष्ट्राध्यक्ष झकॅरी टेलर याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत उपराष्ट्राध्यक्ष असलेला फिलमोर टेलराच्या मृत्यूनंतर अध्यक्षपदी बसला. ९ जुलै, इ.स. १८५० ते ४ मार्च, इ.स. १८५३ या काळात त्याने अध्यक्षपद सांभाळले.

त्याने मेक्सिकन-अमेरिकन युद्धांती अमेरिकेस जोडल्या गेलेल्या दक्षिणेकडील प्रदेशांतून गुलामीचे उच्चाटन करण्याच्या प्रस्तावास दक्षिणेकडील गुलामी-समर्थकांची मर्जी सांभाळण्यासाठी विरोध केला व इ.स. १८५० च्या तडजोडीस पाठिंबा दिला.

फिलमोर बफेलो विद्यापीठाच्या सहसंस्थापकांपैकी एक होता.

बाह्य दुवे[संपादन]

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2009-01-15. 2011-06-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "मिलार्ड फिलमोर: अ रिसोर्स गाइड (मिलार्ड फिलमोर: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)