बिल क्लिंटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बिल क्लिंटन

विल्यम जेफरसन क्लिंटन (इंग्लिश: William Jefferson Clinton), ऊर्फ बिल क्लिंटन (इंग्लिश: Bill Clinton) (ऑगस्ट १९, इ.स. १९४६; होप, आर्कान्सा, अमेरिका - हयात) हा अमेरिकन राजकारणी असून अमेरिकेचा ४२वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९९३ ते २० जानेवारी, इ.स. २००१ या कालखंडात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. शीतयुद्धाच्या अखेरच्या कालखंडात याने अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. तत्पूर्वी हा इ.स. १९७९-८१ व इ.स. १९८३-९२, अश्या दोन मुदतींसाठी आर्कान्सा राज्याचा गव्हर्नर होता.

अमेरिकी इतिहासामध्ये दीर्घकाळ शांतता नांदलेल्या व भरभराटीचा कालखंडात क्लिंटनाची अध्यक्षीय कारकीर्द झाली. त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्याने उत्तर अमेरिकी मुक्त व्यापार करारावर सही केली, सर्वसाधारण आरोग्यसेवा व बालकांसाठीच्या शासकीय आरोग्य विमा कार्यक्रमात सुधारणा घडवल्या. मॉनिका लेविन्स्की प्रकरणात न्यायालयात खोटा कबुलीजबाब दिल्याबद्दल त्याच्यावर महाभियोग चालवला गेला, मात्र अमेरिकी सेनेटेने त्याला मुभा दिल्यामुळे त्याला अध्यक्षपदाची मुदत पुरी करता आली.

क्लिंटन अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य आहे. त्याची पत्नी हिलरी क्लिंटन हीदेखील डेमोक्रॅट राजकारणी असून ती २१ जानेवारी, इ.स. २००९पासून इ.स. २०१२ पर्यंत अमेरिकेची परराष्ट्रसचिव होती.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील परिचय" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)[मृत दुवा]
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ४, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "क्लिंटन अध्यक्षीय प्रशासनाच्या दस्तऐवजांचा समग्र संग्रह" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "क्लिंटन अध्यक्षीय प्रशासनाच्या संदर्भांचे ग्रंथालय व संग्रहालय" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.