जिमी कार्टर
जिमी कार्टर | |
कार्यकाळ २० जानेवारी १९७७ – २० जानेवारी १९८१ | |
उपराष्ट्रपती | वॉल्टर मॉन्डेल |
मागील | जेराल्ड फोर्ड |
पुढील | रॉनल्ड रेगन |
जन्म | १ ऑक्टोबर, १९२४ प्लेन्स जॉर्जिया, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | डेमोक्रॅटिक पक्ष |
पत्नी | रोस्लीन स्मिथ कार्टर |
गुरुकुल | जॉर्जिया प्रौद्योगीकी संस्था |
धर्म | ख्रिश्चन |
सही |
जेम्स अर्ल कार्टर, कनिष्ठ (इंग्लिश: James Earl Carter, Jr., जेम्स अर्ल कार्टर, ज्यूनियर), ऊर्फ जिमी कार्टर (इंग्लिश: Jimmy Carter) (१ ऑक्टोबर, इ.स. १९२४ - हयात) हा अमेरिकेचा ३९वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९७७ ते २० जानेवारी, इ.स. १९८१ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. याला इ.स. २००२ सालातला नोबेल शांतता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षीय कारकिर्दीनंतर नोबेल पुरस्कार मिळवणारा हा एकमेव माजी राष्ट्राध्यक्ष आहे. पेशाने भुईमुगाचा शेतकरी व अमेरिकी नौदलातील अधिकारी असलेला कार्टर अध्यक्षपदाअगोदर हा इ.स. १९६३ ते इ.स. १९६७ या कालखंडात जॉर्जियाच्या संस्थानी सेनेटेचा सदस्य, तर इ.स. १९७१ ते इ.स. १९७५ या काळात जॉर्जियाचा ७६वा गव्हर्नर होता.
अध्यक्षीय कारकिर्दीत कार्टराने ऊर्जा व शिक्षण, अशी दोन नवी कॅबिनेटस्तरीय खाती निर्मिली. कार्टर प्रशासनाने पर्यावरणरक्षण, वाढते दर व नवीन तंत्रज्ञान इत्यदी बाबींचा विचार करून राष्ट्रीय ऊर्जा धोरण बनवले. परराष्ट्रीय आघाडीवर कार्टर प्रशासनाने इस्राएल व इजिप्त यांच्यादरम्यान कॅंप डेव्हिड वाटाघाटी घडवून आणल्या, पनाम्याशी पनामा कालवा तह केला. इ.स. १९८० च्या सुमारास कार्टराची लोकप्रियता उतरणीला लागली. इ.स. १९८० च्या अध्यक्षीय निवडणुकींत डेमोक्रॅटिक पक्षाचे नामांकन मिळवून तो दुसऱ्यांदा उभा रहिला, मात्र रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार रोनाल्ड रेगन याच्याविरुद्ध त्याला हार पत्करावी लागली.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2009-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |