बिधन चंद्र रॉय
बिधन चंद्र रॉय | |
कार्यकाळ २३ जानेवारी १९४८ – १ जुलै १९६२ | |
मागील | प्रफुल्लचंद्र घोष |
पुढील | राष्ट्रपती राजवट |
जन्म | १ जुलै, १८८२ पाटणा, बिहार, ब्रिटिश भारत |
मृत्यू | १ जुलै, १९६२ (वय ८०) कोलकाता, पश्चिम बंगाल |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | अविवाहित |
व्यवसाय | वैद्यकीय चिकित्सक स्वातंत्र्यसेनानी |
धर्म | हिंदू |
पुरस्कार | भारतरत्न |
बिधन चंद्र रॉय उर्फ डॉ. बी.सी. रॉय(बंगाली: বিধান চন্দ্র রায়, १ जुलै, १८८२ - १ जुलै, १९६२) हे एक निष्णात डॉक्टर होते. ते भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. बी.सी. रॉय एक आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी गांधींच्या सांगण्यावरून राजकारणामध्ये प्रवेश केला व १९४८ साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिरीपदाची शपथ घेतली. ह्या पदावर ते पुढील १४ वर्षे होते. १९६१ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १ जुलै १९६२ रोजी त्यांच्याच जन्मदिवशी रॉय ह्यांचे निधन झाले.
वैद्यकीय शास्त्रात केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी डॉ. बी.सी. रोय यांच्या नावाचा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१६ सालचा हा पुरस्कार मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.
इ.स. १९७६ सालापासून दिला जात असलेला हा वार्षिक पुरस्कार यापूर्वी भारतातील पहिली cochlear implantची शस्त्रक्रिया करणारे मिलिंद वसंत कीर्तने यांना २०१४ साली मिळाला आहे. त्यानंतर मराठी माणसाला पुरस्कार मिळायची ही दुसरी वेळ आहे.,