सुरगाणा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुरगाणा तालुका
सुरगाणा तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा नाशिक जिल्हा
जिल्हा उप-विभाग कळवण उपविभाग
मुख्यालय सुरगाणा

क्षेत्रफळ ८४५ कि.मी.²
लोकसंख्या १,४५,१३५ (२००१)

तहसीलदार आर. पी. आहेर
लोकसभा मतदारसंघ दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ कळवण विधानसभा मतदारसंघ
आमदार जिवा पांडू गावित
पर्जन्यमान १८०८ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सुरगाणा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.

अनुक्रमणिका
1. इतिहास

2. विशेष 3. भूगोल

1.इतिहास:-

सुरगाणा तालुक्याचा इ .स .१७०० सालापासूनचा इतिहास आढळतो. एकेकाळी 'सुरगाणा' हे एक संस्थान होते. या संस्थानाच्या सरहद्दीपासून ५ ते ६ कि. मी. अंतरावर भदर हे आणखी एक छोटे संस्थान होते. तेही सुरगाणा संस्थानच्या अधिपत्याखाली होते. धार संस्थानच्या परमार घराण्यातील राजे श्रीमंत रविराव, शंकरराव, प्रतापराव, यशवंतराव आणि शेवटचे राजे श्रीमंत धेर्यशीलराव पवार हे सुरगाणा संस्थानचे राजे होऊन गेले आहेत, तर देशमुख घराण्यातील श्रीमंत माधवराव खंडेराव देशमुख, यशवंतराव देशमुख, आनंदराव देशमुख, आणि शेवटचे राजे नारायणराव देशमुख हे भदर संस्थानचे राजे होऊन गेले आहेत.

सुरगाणा संस्थानचा 'मोतीबाग राजवाडा' अजूनही अस्तित्वात आहे. या राजवाड्याआधी दुसरा एक मोठा राजवाडा होता. मात्र फार पूर्वी तो जळून खाक झाल्याने हा मोतीबागेतील राजवाडा बांधण्यात आला होता. प्रतापराव देशमुख यांच्या दरबारात एकदा गायनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी एका गायकाने एक गाणे अतिशय सुरात गायले. गाणे ऐकून त्यावेळचे राजे प्रतापराव बेहद्द खुश झाले. छान सुरात गायलांस म्हणून गायकाचे कौतुक केले आणि “निंबारघोडी” ऐवजी “सुरगाणा” अशी संस्थानची नवी ओळख निर्माण केली. सुरगाणा तालुक्यातील सातमाळाच्या रांगांमध्ये "हातगड" किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्यानंतर त्यांचा पहिला मुक्काम हा "हातगड " किल्ल्यावर होता ,अशी आख्यायिका आहे .

2.विशेष:-

सुरगाणा तालुका हा ९९ टक्के आदिवासी तालुका आहे.. या तालुक्याची भौगोलिक रचना दऱ्याखोऱ्यानी, सह्याद्री पर्वताच्या डोंगर रागांनी वेढलेली आहे. पूर्वी या तालुक्यात घनदाट जंगल होते. सर्वात जास्त पावसाची नोंद या तालुक्यात होत असे. पावसाळ्यात दुथडी, खळखळून वाहणाऱ्या नद्या असलेला हा तालुका निसर्गसौदर्यांने नटलेला होता. या तालुक्यात आदिवासींपैकी कोकणा ही जमात बहुसंख्येने आहे. त्याखालोखाल 'हिंदू महादेव कोळी ,वारली ,हरिजन व चारण' आदि जमाती गुण्यागोविंदाने राहत आहे. सुरगाणा, उंबरठाण, बोरगाव, बारे या गावात काही प्रमाणात व्यापारीहीहि स्थायिक झाले. पण तरीही शेती हा प्रमुख व्यवसाय होता. शेतीतून खरीप हंगामात पिके घेतली जायची. नागली,भात,वरी,वरई, तूर,उडीद व कुळीद ही प्रमुख पिके होती. येथील शेती व्यवसाय संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. लोकांना जागेची कमतरता असूनही येथील लोक कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. हे लोक दोन हंगामी उत्पन्ने घेतात.

3.भूगोल:-

सुरगाणा तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ८३७४६ चौरस किलोमीटर आहे. इ .स .२००१च्या शिरगणतीनुसार तालुक्याची एकूण लोकसंख्या १४५१३५ आहे. सुरगाण्याच्या पूर्वेकडे दिंडोरी व कळवण हे तालुके असून उत्तरेस व पश्चिमेस गुजरात राज्य आहे. तालुक्याच्या दक्षिणेस पेठ तालुका येतो. जवळच गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती 'सापुतारा' हे गुजरातच्या डांग जिल्ह्यातील प्रख्यात असे थंड हवेचे ठिकाण आहे. हे पर्यटन स्थळ हे सुरगाण्यापासून अवघ्या १८ कि मी अंतरावर आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमाळा रांग असे म्हणतात. या सातमाळा रांगेत काही गडकिल्ले आहेत. सुरगाणा तालुक्यातील केम या १५०० मीटर उंचीच्या डोंगरातून नार, पार, गिरणा ह्या प्रमुख नद्या उगम पावतात.

हेमाडपाडा हे गाव सुरगाणा येथून २० किलोमीटर अंतरावर आहे. सुरगाणा ते नाशिक हे अंतर ९० कि.मी. आहे.  

धार्मिक ठिकाणे[संपादन]

सुरगाणा तालुक्यातील माणी गावाजवळ बेलबारी तीर्थस्थळ आहे. तेथील माणकेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. येथे महाशिवरात्रीच्या दिवसी यात्रा भरते. पूर्वेला गिरजा मातेचे छोटे पण सुंदर मंदिर असून हजारो भाविक तिचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तालुक्यातील केळावण या गावी असलेला ५०० मीटर उंचीवरून पडणारा धबधबा बघण्यासाठी पर्यटक येत असतात. तालुक्यातील शिंदे या गावाजवळील केम डोंगरावर वर्षातून दोनदा, महाशिवरात्रीला व दीपावलीच्या सणाला यात्रा भरते. येथे महालक्ष्मी देवीचे दुर्मीळ मंदिर आहे.

बारे येथे जवळच भिवतास धबधबा आहे तो पावसाळयामधे खुप सुन्दर दिसतो.