Jump to content

सुरगाणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुरगाणा. या पानावरून पुनर्निर्देशित)
सुरगाणा

२०.५६° उ. ७३.६४° पु.
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा नाशिक जिल्हा
जिल्हा उप-विभाग कळवण उपविभाग
मुख्यालय सुरगाणा

क्षेत्रफळ २७४६ कि.मी.²
लोकसंख्या २,०५,१३५ (२०११)
लोकसंख्या घनता ७५/किमी²
शहरी लोकसंख्या ४५२७९
साक्षरता दर ७५%
लिंग गुणोत्तर १०००/९५४ /

प्रमुख शहरे/खेडी बोरगाव, उंबरठाण, बाऱ्हे
तहसीलदार आर. पी. आहेर
लोकसभा मतदारसंघ दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ कळवण विधानसभा मतदारसंघ
आमदार नितीन अर्जुन पवार (२०१९)
पर्जन्यमान १५०० - २००० मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


सुरगाणा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.

भौगोलिक परिस्थिती

[संपादन]

नाशिकपासून सुरगाणा ९० कि.मी. अंतरावर आहे. सुरगाणा तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २७४६ चौरस किलोमीटर असुन या प्रदेशात १५०० ते २००० मिमी पर्यंत पर्जन्यवृष्टी होते. इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची एकूण लोकसंख्या २०५१३५ आहे. सुरगाण्याच्या पूर्वेस कळवण तालुक्याची सीमा, आग्नेयेस दिंडोरी तालुक्याची सीमा तर दक्षिणेस पेठ तालुक्याची सीमा आहे. उत्तरेस व पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा आहे.