पेठ तालुका
पेठ तालुका हा एक सह्याद्रीच्या कड्याकपारीत व डोंगराळ भागात वसलेला तालुका आहे. नैसर्गिकदृष्ट्या साधन-संपतीने नटलेला प्रदेश आहे. या तालुक्याला निसर्गाशी खास देणगी लाभली आहे. निसर्गाच्या सानिध्यात अनेक वसाहत पाडा- वस्ती करुन राहत आहेत. निसर्गात अनमोल असे, वनऔषधी, सागवान लाकूड, महुची फुले, मिळत असून स्थानिक आदिवासी बांधवाना खास रोजगारही जंगलातून प्राप्त होते. तालुका हा १००% आदिवासी समाजाचा आहे. या ठिकाणी इतरही धर्माचे लोक वास्तव्यास असून गुण्या -गोविंदाने एकत्र राहतात. तालुक्यातील आदिवासी समाजाने शेतात पिकविलेला माल व जंगलातून मिळविलेल्नया वनऔषधी भाज्या करंजाळी,कोहोर, पेठ, जोगमोडी येथील आठवडे बाजारात सहज विकतो, व त्यातून मिळालेल्या पैशातून कुटूंबांच्या गरजा भागवितो. तालुक्यात रस्त्याची मोठी गैरसोय आहे. पेठ तालुक्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. तसेच पावसाचे प्रमाण पण खूप जास्त आहे
येथे भात शेतीला जास्त प्राधान्य आहे व इतर पारंपारिक पिके सुद्धा घेतली जातात.तसेच पेठ तालुका हा ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे . पेठचे भौगोलिक स्थान अक्षांश: 20 ° 15'29.9 "एन रेखांश: 73 ° 30'11.3 "ई. समुद्रसपाटीपासून उंची: 700 मीटर प्रादेशिक सेटिंग पेठ (किंवा पेंट) महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक शहर आहे. हे पश्चिम महाराष्ट्र विभागात आहे. तसेच
नाशिक विभाग आहे. हे नाशिक जिल्हा मुख्यालयया पासून उत्तर पश्चिम 52 किमी स्थित आहे. हे तालुक्याचे मुख्यालय आहे. पेठ तहसील महाराष्ट्र राज्य असून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवरती आहे. हा महाराष्ट्रातील आदिवासी तहसील आहे. कोकणा जमाती हे तहसीलमधील प्रमुख जमात आहे.पेठ पिन कोड 422208 आहे आणि पोस्टल प्रधान कार्यालय पेईट आहे.जवळील गावे(2 किमी),वांगणी,भरुना (3 किमी), 3 किमी), गंगोडबारी (3 किमी), कोटंबी जळे,शिराळे,झाडीपाडा (4 किमी), पेठच्या जवळपासचे गावे आहेत. गावांची यादी हाइपरलिंक्ड आहे - पेठ तालुक्यात गावांची यादी आसपासच्या तालुके दिंडोरी तालुका पूर्वेस, त्र्यंबक तालुका दक्षिणेस, सुरगाणा तालुक्यात उत्तरेकडे आणि दक्षिणेस पेठच्या दिशेने नाशिक तालुक्यात.जवळील शहर आहे. पेठ तालूक्यातील लोक हे उन्हाळ्यामध्ये कामाच्या शोधात नाशिक शहराकडे वळत असतात.पेठ तालुक्यातील जवळीक देव स्थाने :- १)रानदेवी लक्ष्मि मातामंदिर २संगमेश्वर दत्त मंदिर ३)महादरी शिव मंदिर येथे बाजीराव मसतानी याचा इतिहास आहे ४)तोंडवळ खंडोबा मंदिर पेठ तालुक्यातील पाण्याचा साठा असणारे धरणे असून तालुक्यापासून ४५ कि.मीटर अंतरावर चौकडाजवळ शेपूझरी महत्वाचे मंदिर दरवर्षी या ठिकाणी यात्रा भरते. व अनेक भाविक - भक्तांची मांदियाळी असते. पेठ तालुक्यातील पाण्याचा साठा असणारे धरणे १)शिराळे धरण २) हरणगाव धरण ३)आड बुद्रुक धरण ४)इनामबारी धरण ५)गावंध पाडा धरण(श्रीमंत धरण) ६) पाटे धरण (चोळमूखचे धरण असून ते पाटे गावी बांधले आहे. वा तालुक्यात छोटी-मोठी पाझर-तलावे, केटी बंधारे ,शेततळे बांधण्यात आली आहे.
पेठ तालुका पेठ तालुका | |
---|---|
राज्य |
महाराष्ट्र, ![]() |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | नाशिक उपविभाग |
मुख्यालय | पेठ |
क्षेत्रफळ | ५६० कि.मी.² |
प्रमुख शहरे/खेडी | कोहोर,जोगमोडी,करंजाळी,पेठ |
तहसीलदार | संदिप भोसले |
लोकसभा मतदारसंघ | दिंडोरी |
विधानसभा मतदारसंघ | पेठ-दिंडोरी |
आमदार | नराहरी झिरवाळ |
पर्जन्यमान | २२७८ मिमी |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
पेठ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.