काठीपाडा
?काठीपाडा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सुरगाणा |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड |
• 422211 |
काठीपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]तान नदीपासून जवळच असलेल्या टेकडीवर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव सुरगाणा या गावापासून साधारण १८ कि.मी. अंतरावर आहे. काठीपाडा गावाच्या उत्तरेस खांदुर्डी, ईशान्येस जामुनपाडा, पुर्वेस कोठुळा व दात्रिचापाडा, दक्षिणेस तोरणडोंगरी व बाफळुण, नैऋत्येस कृष्णनगर व खडकीपाडा, पश्चिमेस रानविहिर तर वायव्येस उंबरपाडा ही गावे आहेत.
हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]हे गाव पुर्णतः आदिवासी भागात आहे त्यामुळे आदिवासी समाजाचे सण उत्सव साजरे केले जातात. शेती हा प्रमुख व्यवसाय आहे त्याचबरोबर थोडाफार कामगार व कर्मचारी वर्ग आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांवर शेतमजूर, कामगार म्हणून दुसऱ्या भागात कामाला जाण्याची वेळ येते.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]तान नदीच्या काठी असलेले तानकेश्वर महादेवाचे मंदिर दर्शनासाठी प्रसिद्ध आहे.
नागरी सुविधा
[संपादन]दहावी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस आहे.