रामेश्वरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रामेश्वरम
அரக்கோணம்
भारतामधील शहर

Rameswaram montage image.jpg
वरून खाली: रामनाथस्वामी मंदिर, पांबन पूल व समुद्रकिनारा
रामेश्वरम is located in तमिळनाडू
रामेश्वरम
रामेश्वरम
रामेश्वरमचे तमिळनाडूमधील स्थान

गुणक: 9°17′17″N 79°18′47″E / 9.28806°N 79.31306°E / 9.28806; 79.31306

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
जिल्हा रामनाथपुरम जिल्हा
क्षेत्रफळ ५३ चौ. किमी (२० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३० फूट (९.१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४४,८५६
  - घनता ८५० /चौ. किमी (२,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये स्थित असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. रामेश्वरम श्रीलंकेच्या मन्नार द्वीपासून ५० किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर स्थित आहे. ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते.

रामायणामध्ये भगवान श्रीरामांनी रामेश्वरममधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती. सध्या ह्या सेतूचे केवळ अवशेष शिल्लक असून एकेकाळी हा सेतू भारतीय उपखंडाला श्रीलंका बेटासोबत जोडणारा अखंड दुवा होता हे सिद्ध झाले आहे.

रामेश्वरम रेल्वे स्थानक दक्षिण रेल्वेचे एक टर्मिनस असून चेन्नईमदुराईहून येणारे रेल्वेमार्ग येथे संपतात.